महिलांचे संरक्षण आणि स्वाभिमानासाठी काम करीत असलेले राज्य महिला आयोग आता प्रज्वला योजनेच्या माध्यमातून महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आले असून, बचत गटातील महिलांना नियोजनबद्ध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन, स्थानिक संसाधनांच्या उपलब्धते नुसार जिल्हा निहाय उद्योग-व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण करून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे सांगताना, महिलांच्या उत्थानामध्ये अग्रेसर असलेल्या प्रवरा परिसर आणि साईंची पुण्यभुमी असलेला अहमदनगर जिल्हा बचतगटांच्या उत्पादित मालाला व्यापक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रज्वला योजनेअंतर्गत.जनसेवा फाउंडेशन आणि राहता तालुका पंचायत समितीयांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात बचतगटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर बोलत होत्या. या प्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, सभापती सौ. हिराताई कातोरे, उपसभापती बबलू म्हस्के, प.स सदस्य संतोष ब्राम्हणे,उमेश जपे, सुवर्ण तेलोरे, सौ. मनीसध्दा आहेर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचे सह पंच्यात समितीचे सदस्य ,विविध गावचे सरपंच, महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थत होत्या. शामकुमार कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अडव्होकेट स्मिता देशमुख यांनी महिला संरक्षणाच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले तर, मंजुषा धिवर यांनी हि मार्गदर्शन केले.
विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या कि, जेथे महिला राहतात तेथे साक्षात देव वास करतो असे म्हटले जाते इतका सन्मान महिलांना मिळतो. असे असले तरी महिलांच्या अनेक समस्या असतात. आणि त्या समस्याची सहसा वाच्यता माहेर सोडून कुठे केली जात नाही. राज्य महिला अयोग्य हे महिलांचे दुसरे माहेरचं असून, महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. परनु त्याची माहिती महिलांना नसते . हेच काम महिला आयोगामार्फत केले जात असून आता प्रज्वला योजनेंतर्गत सरकारच्या महिलांच्या उत्थानासाठी असलेल्या योजनांच्या माध्यमातून या योजनेतून बचत गटातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने केले जाईल. राज्यभरात ही योजना राबविताना जिल्ह्यातील स्थानिक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन उद्योग व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण केले जातील. प्रज्वला बाजारच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे त्या म्हणाल्या .
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या . सूत्रसंचालन दिनेश भाने यांनी केले.
चौकट :- सौ. धनश्रीताई विखे :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून मोट्या प्रमाणावर जिल्ह्यातील महिलांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले असून , ना विखे पाटील यांच्या माध्यमातून राज्यातील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रातील महिलांसाठी असलेल्या योजना राबविण्याचे काम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविताना महिलांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी निर्माण केली जाईल असे सौ. धनश्रीताई विखे यांनी सांगितले सांगितले.
फोटो कॅप्शन :- प्रवरानगर येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती आयोजित महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनें अंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्रीताई विखे पाटील, प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे।सरपंच मनीषा आहेर