प्रवरा अभियांत्रिकी मध्ये शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य नोकरी भरती मेळावा.

मुलाखतीमध्ये  सहभागी होण्यासाठी  पदवीधरांनी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे – प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने 

 लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य  नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन, चाळीसपेक्षा जास्त नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुलाखतीमध्ये  सहभागी होण्यासाठी  कोणत्याही शाखेतील पदवीधरांनी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन  प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.आहे. 
          या मेगा नोकर भरतीसाठी व्हिआरडिई, इपिटोम,  इटॉन टेक्नॉलॉजी,सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज,सिद्धि फोर्ज ,ओमेपूल टेक्नॉलॉजी, महिंद्रा केप्लास्ट, होल्मकेके, व्हेरॉक इंजिनिअरींग, इके इलेक्ट्रॉनिक्स, बर्खार्ड कॉम्प्रेशन,एल अॅण्ड टी, एन एन नागा, यासारख्या  चाळीसहून अधिक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय  अशा कंपन्या सहभागी होणार आहेत. या बाबत अधिक माहीती देताना व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले कि, हा भरती मेळावा कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेल्या सर्व  विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेगा नोकरी भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखतीसाठी समक्ष  हजर रहाणे आवश्यक आहे.  ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/Ri5fb3V7xDttfHTm8 या लिंकचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष व  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदार संघ , प्रवरा परिसर व अहमदनगर जिल्ह्यातील  सर्व  पदवी घेतलेल्या विदयार्थी -विद्यार्थिंनीना नोकरी मिळावी या साठी या महाभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
             बोर्ड ऑफ  अँप्रेन्टीसशिप  ट्रेनिंग (BOAT) पश्चिम विभाग मुंबईचे भारत सरकार यांच्या  सहकार्यांनी होत असलेल्या या मेळाव्यासाठो (BOAT) डेप्युटी डायरेक्टर एन. एन. वडोदे उपस्थित राहणार असून या प्रसंगी लार्सन एंड टूब्रोचे जनरल मॅनेजर श्री अरविंद पारगावकर , विखे पाटील पॉलिटेक्निचे माजी विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद डिस्टिलरी वालचंदनगरचे डायरेक्टर श्री कारण यादव ,अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि वारले कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. अनिता गुजर  आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 
        आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे तसेच यावर्षी संस्थेतील विविध महाविद्यालयामधील सुमारे  १ हजार ६२० विद्यार्थ्यांना निकालीपूर्वी नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.व या पुढेही महाविद्यालय त्यासाठी काम करत राहणार आहे. अशी माहिती  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे स्किल डेव्हलपमेंट व ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
         या मेळाव्याच्या आयोजनासाठी व यशस्वी होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, . खासदार डॉ . सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक  डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक संचालक व एसव्हीआयटी सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. के टी व्ही रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी  प्रवरा तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. विजयकुमार राठी,  डॉ. प्रदीप दिघे, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर,  संस्थेचे सर्व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे परिश्रम घेत आहेत.