शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील ३१ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.
यामध्ये सृजन बायोटेक निफाड, नाशिक मध्ये चामवड पंढरीनाथ, हिवारे वैभव, मांटे विशाल, अगवान मुकुंद, सोनवणे चंदन, चौधरी अभिजित, खेडेकर प्रदीप, भालेराव प्रकाश, भिडे हरीश तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर मध्ये शिंदे शुभम, भोसके सौरभ, शिंदे मेघराज, मिटकॉन बायोफर्मा सेंटर, पुणे मध्ये कु.भवारी हर्षदा, कु.भोसले पूजा, राज्य स्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र म.फु.कृ.वि, राहुरी मध्ये कलांगडे महेश, खंडागळे विकास,थोरात बाबासाहेब,बरबडे शुभम,कु.आंधळे मोनिका तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये वाघमारे मयुरी, बागले अस्मिता, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे मध्ये यंदे प्रेषिता, खरसे शितल, जगताप मृणाली, जाधव मैथिली, अभंग प्रतीक्षा, राख शुभम. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे मध्ये बोरसे श्रद्धा. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी गोरे पल्लवी, प. डॉ. वि. पा. सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर,
चोपडे संकेत आणि सौरभ केदार, जैवतंत्रज्ञान विभाग, डॉ. एम. पी. एस. कॉलेज, आग्रा, दिल्ली अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हे सर्व विद्यार्थी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समितीस मांडणार आहेत. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान घेऊन शिकता येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात हा कार्यानुभव उपयोगी पडणार आहे सहा. समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, महासंचालकांच्या कार्यकारी सहायक सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण व आस्थापना संचालक प्रा.. दिगंबर खर्डे, डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. विजय आहेर, प्रा. धनंजय आहेर,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस व प्राचार्य ऋषिकेश औताडे, तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, प्रा. अमोल सावंत, प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.