राज्य शहरी आणि ग्रामीन जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जनसेवा फाउंडेशन लोणी आणि पंचायत समिती राहता यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ११ ते १५ डिसेंबर दरम्यान लोणी येथे राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव २०१९ (स्वयंसिध्दा यात्रा) चे आयोजन करण्यात आले असून महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २.३० व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या उदघाटन कार्यक्रमासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,खासदार सदाशिव लोखंडे, महात्मा फुलेकृषी विद्यापीठाचे प्रा. जितेंद्र मेटकर,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील,जी.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन शिंदे आदी मान्यवर उपस्तित राहणार आहेत.
शंभर पेक्षा जास्त गटांच्या सहभाग असलेल्या या स्वयंसिध्दा यात्रातील स्टॊल ना सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत भेटी देऊन स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन सभापती सौ. हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के,बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजीराव जगताप,जी प. सदस्या सौ. कविताताई लहारे, पुष्पाताई रोहम,दिनेश बर्डे, शाम माळी,प. स सदस्य उमेश जपे, भारत अंत्रे,संतोष ब्राह्मणे, काळू राजपूत,सौ. अर्चनाताई आहेर, शोभाताई जेजुरकर,सौ.नंदाताई तांबे,सौ.सुवर्णाताई तेलोरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारीडॉ. बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बु;चे सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच अनिल विखे, लोणीखुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर, उपसरपंच सौ. सुवर्ण घोगरे, जनसेवा फाउंडेशनचे सचिव डॉ. हरिभाऊ आहेर, प्रकल्प संचालिका सौ. रुपाली लोंढे यांनी केले आहे.