विज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. – डॉ. यशवंत थोरात

विज्ञानामध्ये केवळ दुसऱ्याचे विचार प्रमाण मानून पुढे जाता येत नाही. तर, त्या साठी स्वतःला काही तरी नाविन्यपूर्ण आणि ठोस वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे. असे सांगताना,भारताने केवळ वैज्ञानिक सामर्थ्यावरच चांद्रयान(२) मोहीम यशस्वी केली.म्हणूनच  जगातील प्रत्येक सजीवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. असे प्रतिपादन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक आणि यांनी केले.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करताना डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे ,संस्थेचे  शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रामदास बोरसे यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. थोरात यावेळी म्हणालेकी, विज्ञानाशिवाय मानवाची प्रगती शक्य नाही.  उसने ज्ञान घेऊन मानवाला प्रगती करता येणार नाही त्यासाठी खडतर परिश्राम घ्यावे लागतात . म्हणूनच विज्ञान हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असल्याचे ते म्हणाले.

दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी डॉ. महेश खर्डे,डॉ. अनिल वाबळे,डॉ. बाळासाहेब मुंढे यांच्यासह सहकारी प्राध्यापक विशेष परिश्राम घेत आहे.

फोटो कॅप्शन ;-लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करताना नाबार्डचे माजी चेअरमन डॉ.यशवंत  थोरात. समवेत  प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे ,प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. रामदास बोरसे, डॉ. महेश खर्डे,डॉ. अनिल वाबळे,डॉ. बाळासाहेब मुंढे आणि विद्यार्थी.