विद्यार्थ्यांना नोकरीची संधी


विखे पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे,प्राचार्य डॉ.विजय राठी, प्रा.धनंजय आहेर, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी… छाया- दत्ता विखे

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक मधून २०१८-१९ या वर्षभरामध्ये एकवीस कंपन्यांतून परिसर मुलाखतीद्वारे शेवटच्या वर्षातील शिक्षण पूर्ण होत असतानाच सुमारे ३०९ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असल्याने पालक वर्गात समाधानाचे वातावरण आसल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय राठी यांनी दिली

संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत परिसर मुलाखतींचे आयोजन केले जात असून त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी होत आहे. टाटा मोटर्स लिमिटेड पुणे, मित्सुबिशी इलेक्ट्रिक भोसरी, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड मुंबई, सिपला फर्मा कुरकुंभ पुणे, धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद जय हिंद इंडस्ट्रीज लिमिटेड आकुर्डी, टेक्नॉलॉजी चिंचवड पुणे, पॅगो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडबारामती, घरडा केमिकल्स लोटे परशुराम, कारगिल लिमिटेड कुरकुंभ, रिंडीट इंडिया प्रायव्हेटलिमिटेड वडोदरा गुजरात आदींसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या परिसर मुलाखती विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या. यामध्ये ३०९ विद्यार्थ्यांची नोकरीची संधी उपलब्ध झाली असून चांगले पॅकेज देखील मिळाले असल्याचे प्राचार्य डॉ. राठी यांनी सांगितले

संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने मुलाखती, प्रशिक्षण, शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जात असल्याने मुलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होत आहे. ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट संचालक प्रा.धनंजय आहेर, प्रा.राजेंद्र निंबाळकर यांनी यासाठी परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण संचालक प्रा दिगंबर खर्डे , सर्व प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले