विविध स्पर्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने युवावर्गाचे व्यक्तिमत्व घडत असतानाही आज ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेण्याचा कल वाढत आहे, तर, समाज मनावर परिणाम करणाऱ्या माध्यमांचा युगातही विविध चॅनेल्स द्वारे अनावश्यक विषयांवरच चर्चा होताना दिसत आहे.परंतु, खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन शिक्षणचं करू शकत असल्याने, आता. महाविद्यालयांनीही युवकांना काय अपेक्षित आहे. हे समजून घेऊन सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतील असे शिक्षण युवा पिढीला दयावे लागेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येच्या उदघाट्न प्रसंगी आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून नाशिक येथील सौ प्रसिद्ध कवियत्री सौ. सुरेखा बोऱ्हाडे,जेष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे,शिक्षणधकिकारी प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. राजेंद्र सलालकर “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय असलेल्या या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण करणारे डॉ. उज्वला भोर, डॉ. अशोक लिंबेकर,प्रा. ओंकार रसाळ आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्ताविक केले तर,सातत्याने ३९ वर्ष, देश आणि जागतिकस्तरावरील एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी सांगितले.
आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, कालांतराने स्पर्धा या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. कितीही बदल झाले तरी, आदर्श नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन स्तरावरच होणार असल्याने होणाऱ्या स्पर्धा किंवा कार्यक्रम हे आपल्यासाठी होत असल्याचा विश्वास युवावर्गाला देण्यासाठी आता महाविद्यालयांनीच पुढाकार घेऊन युवकांच्या अपेक्षा विचारात घेऊन स्पर्धांची आखणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार बाळ बोठे यांनी मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्याचे सांगताना भविष्यात वर पसंतीहि मुलीच करतील या विनोदावर आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरेतील मुले आणि मुली हे सर्वच बाबतीत आणि क्षेत्रात आघाडीवर असल्याने मुला-मुलींमध्ये तुलना करणे चुकीचे ठरेल असे सांगितले.
“२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! या विषयाचा धागा पकडून बाळ ज. बोठे म्हणाले कि, आजची स्त्री ही जोखडातून मुक्त होऊन लढाऊ वैमाणिक होण्यापर्यंत आजच्या स्त्रीयांनी मजल मारली आहे. अत्याचार हे पूर्वी पासूनच होत असले तरी, आज माध्यमांमुळे जागरुकता वाढली आहे. सोशल मीडियामध्ये तरुण गुंतत चालला मात्र मुली मौलांच्या पुढे जाताना दिसतात भविष्यात तर मुली इतक्या पुध्ये जातील कि, वर परिक्षा या मुलीच घेतील कि, काय असी परिस्थिती निर्माण झाली तर,आश्चर्य वाटण्याचे कारण नाही .असे ते म्हणाले.
सौ. सुरेखा बोऱ्हाडे,मध्यमयुगा पासून १८३० ते १९१५ या कालखंडामध्ये स्रियांच्या उन्नतीच्या दिशेने काम झाले असले आणि स्वातन्त्रतोत्तर काळात राज्यघटनेद्वारे स्त्रीयाच्या सौरक्षणासाठी नियम आणि कायदे होत असले तरी, दुर्दैवाने आजही बलात्कारासारख्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. प्रा. छाया गलांडे यांनी आभार तर, प्रा. संगीत धिमते आणि डॉ. वैशाली मुरादे यांनी सूत्रसंचालन केले.