“२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे!” या प्रस्तावावर यंदाच्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा

राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या  वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणारी ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा” ७ आणि ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली असून लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या’रौप्य करंडक वादविवाद स्पर्धे’साठी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय ठेवण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन दि. ७ जानेवारी रोजी नाशिक येथील सौ सुरेखा बोऱ्हाडे यांच्या हस्ते होणार असून , या वेळी आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर ८ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या समारोप समारंभासाठी नाशिक येथील अपूर्वा जाखडी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जगामध्ये वादाची परंपरा फार फार जुनी तरी, आशा स्पर्धे मध्ये तिथे हार-जीत नसते.वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आणि बरोबर आहे हे दिलेल्या वेळामध्ये परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते.एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे हे ३९ वे. वर्ष आहे.

या वादविवाद स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सोमवार दि ६ जानेवारी २०२० असून,या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्यासंघास फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात येईल.तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे ७,१०१/-रू, ५१०१/-रू,आणि ३,१०१/-रू व उत्तेजनार्थ १५००/- रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालय गटातील गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे २,५०१/-रू,२,१०१/-रू,आणि १,५०१/-रू व उत्तेजनार्थ ७०१/- अशी पारितोषिके देण्यात येतील. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना एक्का बाजुचा प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ७ जानेवारी २०२० रोजी संद्याकाळी ५;३० नंतर महाविद्यालयाच्या बस ने मोफत शिर्डी येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित केला असून राज्यातील महाविद्यालयांमधून दोन्ही गटासाठी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, संयोजन समितीचे प्रा.यु ओ येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.ए.जी गाढवे, डॉ, व्ही. डी मुरादे,डॉ. बी.डी रणपिसे यांनी केले आहे.