‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावरील व्याखान


प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. के. बी. लिंगे, संचालक कर्नल डॉ. के.जगन्नाथन, प्राचार्य सयाराम शेळके आदी.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शिस्त आणि संस्काराची खरी रुजवणूक हि शालेय जीवनातच होत असल्याने प्रवरा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्लबच्या माध्यामातून विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संचालक कर्नल डॉ. के.जगन्नाथन यांनी दिली.

शिक्षण प्रक्रिया ही ज्ञानरचनावादी आणि उपक्रमशील आसली पाहिजे म्हणूनच शिक्षणक्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचे स्वागत करताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरची माहिती होऊन आपल्या आवडीच्या कलेची जोपासना करता यावी या साठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये विविध उपक्रम राबविले जात असून याचाच एक भाग म्हणून,संस्थेचे अध्यक्ष ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपांना बरोबरच इंग्रजी निबंध स्पर्धा आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. के. बी. लिंगे यांचे ‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावरील व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेत सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्लबच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना नवीन वातावरणामध्ये समायोजन कसे करावे, शालेय जीवनापासून वेगवेगळ्या समस्यांना संयमाने सामोरे जाता यावे,दुसऱ्यावर अवलंबून ना राहता स्वावलंबीवृत्ती निर्माण होणे, विचारांची देवाण घेवाण होऊन सृजनशीलता या मुल्यांची रूजवणूक होणे, नवीन मित्र तयार करणे,या साठी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणे का या उपक्रमामागचा खरा उदेश असल्याचे प्राचार्य सयाराम शेळके या वेळी म्हणाले.