खगोलीय माहिती, वैज्ञानिक प्रयोग आणि संकल्पनांची विविध माध्यमांद्वारे सर्वंकष पद्धतीने ओळख ही शालेय जीवनातच व्हावी यासाठी,प्रवरानगर येथील ‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन ब्रिलीयंट बर्ड स्कुलच्या संचालीका सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरानगर येथे लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक कमिशन महाराष्ट्र राज्य यांच्या सुक्त विद्यमाने सन २०१५ मध्ये जिल्ह्यातील एकमेव असलेल्या हे ‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ सुरु झाले. विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना विज्ञानातील विविध तत्वांची ओळख व्हावी, काही वैज्ञानिक खेळातील आनंद स्वत:लाही लुटता यावा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून काही उत्सुकतावर्धक अशा विज्ञान विषयी माहिती व्हावी या उदेशाने लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी या सायन्स सेंटरची स्थापना केली होती. सौ. धनाश्रीताई विखे पाटील यांनी या सेंटरला भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.यावेळी सैनिक स्कुलचे कमांडण्ट कर्नल डॉ.भरत कुमार, सायन्स सेंटरचे समन्वयक प्राचार्य सुधीर मोरे, सुदाम तुपे यावेळी उपस्थित होते.
प्राचार्य सुधीर मोरे यांनी या वेळी सांगितले कि, २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिवस या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो.वर्षभर सुट्या वगळता सकाळी ९ ते ५ हे सायन्स सेन्टर विद्यार्थ्यांसाठी खुले असते.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश दिला जातो. नगर सह नाशिक जिल्हयातील विद्यार्थीही या ठकाणी भेट देण्यासाठी येत असतात. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून काही उत्सुकतावर्धक अशा विज्ञान खेळांची माहिती या ठिकाणी दिली जाते.अनेक उपकरणे,चिल्ड्रेन्स पार्क,इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी प्रयोगशाळा आणि काही वैज्ञानिक खेळातील आनंद याठिकाणी लुटता येतो. बहुतांश विज्ञान चमत्कार समोर असलेल्या फलकावरील माहिती वाचून त्याचा अनुभव घेता येतो. शेवटी असे का घडले? याची माहिती देणारा तक्ताही प्रत्येक उपकरणासमोर असल्याने या उपकारानाकडे विज्ञानाच्या नजरेने पाहतानाच प्रत्येकजण कुतूहल आणि जिज्ञासेपोटी तो खेळ खेळतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामुळे खूप फायदा होत आहे. अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी येथे अनेक प्रकल्प उपलब्ध असल्याचे प्राचार्य मोरे यांनी सांगितले.
विद्यानाची अनुभूती घेण्यासाठी प्रवरानगर येथील भव्य अस्या सायन्स सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भेट द्यावी व मनोरंजनातून विज्ञान समजून घ्यावे, त्या साठी सुदाम तुपे ९५११२१६१६६ यांचे संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य मोरे यांनी केले.
चौकट:-प्रवरानगर येथील सायन्स सेन्टर विद्यार्थ्यांना आनंददाई विज्ञानाची अनुभूती देण्यासाठी कृतीयुक्त्त अध्ययन आणि प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी वेगवेळ्या चार विभागात उपलब्ध आहे.
*इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी क्लब – या विभागात विविध शास्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध,आणि प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी असून रोबोटिक्स,मायक्रोप्रोसर,इलेक्ट्रोनिक्सया विषयावरही कृतियुक्त प्रयोग करण्याची संधी मिळते. या ठिकाणी तोड-फोड-जोड हि संकल्पना विद्यार्थी काबाड से जुगाड वर आधारित करतात.
*बहुदेशीय हॉल- विविध शास्त्रज्ञांचे शोध, जीवनचरित्र पुस्तकांचे ग्रंथालय ,एल सी.डी प्रोजेक्ट सुविधा.
*खेळातून विज्ञान- विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी ग्राव्हिटी लेव्हल,मोरी प्याटर्न.क्रेझी मेझं,प्लाझ्मा ग्लोब,जम्पिंग डिस्क,कुरी पॉईंट,लेझी कॉईन अँट्रोब्याटीक स्टिक विविध उपकरणे.
*बाल विज्ञान उदयान- सीसॉ, मुझीकाल ट्युब,सिम्पाथेटीकस्विंग, कॅमेरा ऑब्सकुश,पुली लिफ्ट लोड, एक्शन रिएक्शन इत्यादी खेळांचे उपकरणे द्वारे विद्यार्थ्यांना आनद लुटता येतो