माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येणारा बालदिवस मुलांविषयी वाटणार्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग असून, देशाची भावी पिढी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न होण्यासाठी बालदिनासारखे उपक्रम नेहमीच साजरे व्हावेत असी अपेक्षा ब्रिलियंन बर्ड स्कुलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादनकार्यक्रम प्रसंगी सौ. धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. या प्रसंगी संस्थेचे सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,प्रा. विजय आहेर, एकनाथ सरोदे,बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. धनश्रीताई विखे म्हणाल्याकी, देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणा.या प्रमुख महापुरूषांमधे पंडित जवाहरलाल नेहरू हे एक महत्वाचे नेते होते. ज्यांना आपण चाचा नेहरू या नावांनी देखील ओळखतो. स्वतंत्र भारतामध्ये भावी नागरिक होणाऱ्या बालकांनाही आपल्या आयुष्याचा आनंद घेण्याचा आणि मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि या मुलांमधूनच देशाचे भावी नागरिक तयार होणार आहेत. म्हणूनच बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो असे त्या म्हणाल्या.
फोटो कॅप्शन: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याजयंती निमित्त अभीवादन करताना ब्रिलियंन बर्ड स्कुलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील, संस्थेचे सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,प्रा. विजय आहेर, एकनाथ सरोदे,बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड आदी