लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून वाणिज्य महोत्सल आयोजन करण्यात आले. त्यात विविध स्वरूपाचे ४० स्टॉल विद्यार्थ्यांनी थाटले. या स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ५३ हजार रुपयांची कमाई केली. अवघ्या तीन तासांमध्ये खाद्य संस्कृती, कृषी संस्कृती, व्यापार व व्यवसाय तसेच इलेक्ट्रॉनिक साधने, फॅशनेबल ड्रेस, ज्ञान- विज्ञान व मनोरंजनपर उपक्रम याबरोबरच विविध स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्केटिंग कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे ज्ञान मिळाले. अतिशय कमी कालावधीमध्ये या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक आगळावेगळा उपक्रम यानिमित्ताने महाविद्यालय संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
वाणिज्य विभागाच्या वतीने झालेल्या या महोत्सवास संस्थेचे संचालक अण्णासाहेब भोसले,अलकाताई दिघे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे आदी उपस्थित होते. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ ज्वेलरी, फॅशनेबल कपडे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक वाहने यांचे स्टॉल अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने सजविले होते. महाविद्यालयात संपन्न झालेल्या या खाद्य संस्कृतीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. व यानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम सर्वांनीच अनुभवला. यासाठी वाणिज्य विभागातील डॉ. विजय खर्डे, डॉ. विजय निर्मळ, डॉ. विजय शिंदे प्रा. ताजने, प्रा. गोपाळे, प्रा. ठोके, प्रा.रंजना दिघे यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्राचार्य प्रदीप दिघे, उपप्राचार्य आर. जी.रसाळ, उपप्राचार्य वाबळे ए.एस. उपप्राचार्या छाया गलांडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धेत प्रवरेच्या कन्या विद्या मंदीरचे यश.
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाने घेतलेल्या “सक्षम : राष्ट्रीय निबंध, पेंटिंग व प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२” मधील “हरित और स्वच्छ उर्जा अपनाएँ, आजादी का अमृत महोत्सव मनाएँ” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १० वीमध्ये शिकणाऱ्या कु. स्नेहल व तेजल सूर्यभान तांबे या भगिणीनी “सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पेंटिंग” हा पुरस्कार प्राप्त केला. अशी माहीती प्राचार्या दिप्ती आॅडेप यांनी दिली.
या विजयी स्पर्धेत रुपये चार हजार रोख आणि उपलब्धी प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणांसोबतचं विविध स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले जाते.यामुळे प्रवरेतील विद्यार्थी कायमचं विविध स्पर्धेत विजयी ठरत असतात. या स्पर्धेतील सर्व विद्यार्थिनींना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार, श्री. जितेंद्र बोरा, श्री. सुरेश गोडगे, कु. पल्लवी पवार, कु. सोनाली मेढे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.
सात्रळ महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम
शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर…….. सागर भाले
शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर आहे.ग्रामीण मुले ही सर्वच क्षेञात आघाडीवर असले तरी प्रवरेत वेळोवेळी होणारे व्यक्तीमहत्व प्रशिक्षणे आणि कौशल्य आधारीत प्रशिक्षणांमुळे प्रवरेचा विद्यार्थी हा हर्व गुणसंपन्न आहे असे प्रतिपादन रुबीकॉन स्किलचे संचालक सागर भाले यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आणि रुबीकॉन स्किल प्रायव्हेट लिमिटेड ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सागर भाले बोलत होते.
प्रशिक्षण कर्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख कशी करून द्यावी,मुलाखतीस जातांना तसेच मुलाखतीपूर्वीची तयारी, मुलाखती दरम्यान द्यावयाची उत्तरे, संभाव्य प्रश्न , मुलाखतीनंतर काय करावे, या सर्वांची तयारी, स्वतःचे ज्ञान आणि अज्ञान कसे ओळखावे आणि त्याचा आपल्या भविष्यासाठी वापर कसा करावा तसेच वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांतून मुलांकडून या सर्व गोष्टींची तयारी करून घेतली.खाजगी क्षेञामध्ये काम करतांना आपली वागणूक कशी असावी या सर्व गोष्टींचे विद्यार्थ्यांना प्रशिशक श्री हंजला खान आणि श्री सागर भाले यांनी तयारी करून घेतली. या चार दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन प्रत्येक गोष्ट शिकून घेतली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे चार दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम पार पडला.या ट्रेनिंग साठी ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या समन्वयक सौ. छाया कार्ले यांनी चार दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. . या प्रसंगी कु. पुनम गागरे, पांडुरंग मुसमाडे, कु .सायली हारदे, सचिन मुसमाडे, तृतीय वर्ष विज्ञान, अनिकेत बेलकर, अश्विनकुमार सजगुरे, कु.मन्सुरी जैनाब, कु. मोहिनी ढेपे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ , शिक्षण संचालक डॉ. पी एम दिघे , संस्थेचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. मनोज परजणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे उपप्राचार्य डॉ.जयश्री सिनगर , डॉ.दिपक घोलप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या समन्वयक सौ. छाया कार्ले, प्रा. स्वाती कडू, प्रा.प्रियांका तांबे, प्रा. गौरी क्षिरसागर ,प्रा.हरी दिवेकर, प्रा. देविदास हारदे ,प्रा. तुषार कडस्कर , प्रा.सुधीर वाघे ,प्रा. राहुल कडू यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कु. प्रांजल शिंगोटे आणि कु. मयुरी नांगरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आभार प्रा. स्वाती कडू यांनी आभार मानले.
गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हेच प्रवरेचे ध्येय – सौ. विखे
प्रवरेच्या १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनी निवड
गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हाच प्रवरेचा ध्यास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करतांना आत्मविश्वासाने पुढे जावे असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. यावर्षी १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनीत झालेली निवड हा प्रवरा परीवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाने आयोजित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाल्यालेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभात सौ. विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तञ निकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही आर. राठी, औषध निर्माणशास्त्रज्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर, डॉ रविंद्र जाधव, गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, आय. टी. आयचे प्राचार्य अर्जुन आहेर, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. मनोज परजणे आदीसह निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ विखे पाटील म्हणाल्या सामान्य जनतेच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे. शिक्षणातून त्यांची प्रगती व्हावी. हा पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा प्रयत्न होता आज संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणासोबत नोकरीची उपलब्धता हे धोरण आहे. आज संस्थेची १८४२ विद्यार्थ्यांची निवड हा मोठा आनंद असून हेच स्वप्न पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे होते. मुलांनी बाहेर जावून नोकरी करावी यासाठी आई-वडीलांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. निवड झालेल्या क्षेत्रात अनुभव घेत पुढे जा असा संदेश देतानाच संस्थेचे आणि आपल्या परिवारांचे नांव मोठे करा असे ही सांगितले.
यावेळी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी प्लेसमेंट विभागाचे कार्य हे गौरव प्राप्त आहे. विविध सेवा सुविधा, करिअर मार्गदर्शन यामुळे प्रवरेचा प्लेसमेंट विभाग आघाडीवर असल्याचे सांगितले. प्रारंभी प्राचार्य अर्जुन आहेर यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय. टी. आय, गृह विज्ञान महाविद्यालय, औषधनिर्माण महाविद्यालय यांतून नोकरी प्राप्त २०२२- २०२३ च्या आढावा घेतला. कार्यक्रमाचे आभार डाॅ.संजय भवर यांनी मानले.
कोट……
पालकांनो मुलांची काळजी करु नका प्रवरा
शैक्षणिक संकुलातून आदर्श विद्यार्थी घडत असतो.मुलांसोबत मुलीही नोकरी मिळविण्यात आघाडीवर आहेत. आपल्या मुलांना पाठबळ देण्यासाठी विखे पाटील परिवार त्यांच्या सोबत आहे. नोकरी सोबतचं स्वता: ची कंपनी स्थापना करा. देशात आणि परदेशात संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचे मार्गदर्शन घेऊन पुढे जातांना आत्मविश्वास कायम ठेवा हा संदेश सौ.विखे पाटील यांनी दिला.
जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांचा त्याग आणि कष्ट मुलांनी विसरु नये सौ. शालीनीताई विखे पाटील
विखे महाविद्यालयात माता कॉलेजच्या दारी उपक्रम
आई-वडील मुलांना घडवितात तर शिक्षणांतून आत्मविश्वास मिळत असतो.जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांनी केलेला त्याग,कष्ट मुलांनी विसरु नये. संस्कारांची शिदोरी जपा असे संदेश जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्याना दिला.
लोकनेते पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
पद्मश्री डॉ. विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने”माता कॉलेजच्या दारी”आणि रक्त तापणसी शिबीर,शाररिक आरोग्य तपासणी शिबीर आणि कोविड लसीकरण मोहीम तपासणी शिबीराचे त्यांच बरोबर खास मातासाठी सास्कृतिक कार्यक्रम आणि विविध फनी गेमच्या उदघाटन सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दिघे,गृह विज्ञान महाविद्यालयांच्या प्राचार्या डाॅ.अनुश्रश्री खैरे,पी एम टीच्या डाॅ.वसुंधरा पाटील,आरोग्य सल्लागार समिना पठाण,उमा खरे,उप- प्राचार्या प्रा. छाया गलांडे,डाॅ.कल्पना पलघडमल,डाॅ.वैशाली मुरादे आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, शिक्षणातून मुलाच्या पंखात बळ मिळते. आपल्या अनुभवातूनच ज्ञान मिळते. आई-वडीलांचा नावलौकीक वाढवा त्याच्या कष्टाची जाणीव ठेवा त्याच्या कष्टाची तुलना कशानेही होणार नाही असे मुलांना सांगून आईने मुलांशी बोलतांना त्यांना समजून घ्या, त्यांना आत्मविश्वास द्या. मुलांनी आपली ओळख निर्माण करतांना आई-वडीलांचा सन्मान करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असतानाच सामान्य ज्ञान मिळवा. स्वता:ला वेळ द्या आरोग्यदायी आहार घ्या असे आवाहन केले.
महीलांच्या आरोग्याविषयी माहीती देतांना डॉ. वसुंधरा पाटील यांनी एच. बी. पी. सी. ओ.डी. गर्भपिशवीचा कॅन्सर याविषयी मार्गदर्शन करतांना आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करा असा सल्ला दिला. यावेळी संध्या गिधाड, नितीन गागरे, पुजा खेडकर या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकांमध्ये प्रा. छाया गलांडे यांनी महाविद्यालयाचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी, प्रा. हर्षल खर्डे, प्रा. तन्वी चिटणीस यांनीकेले. आभार डॉ. जी आर पांढरे यांनी मानले.
कोट….
आम्ही जन्म दिला पण या महाविद्यालयाने मुलांना आदर्श संस्कार दिले. केवळ मार्गदर्शन केल्यामुळे मुलांने नांव मोठं केल अशी भावनिक प्रतिक्रिया वाद-विवाद स्पर्धेत विजयी झालेल्या संध्याच्या आई मंदा गिधाड यांनी दिली.
महीलांनी एकमेकीनां नांवे ठेऊ नका.
बचत गटातून टाकाऊ पासून टिकाऊ हा संदेश पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिला आहे. यांतून स्वयंरोजगार करा. विधवा महीलांनाही सन्मान द्या. घर तोडण्यापेक्षा घर जोडा. घटस्फोट वाढले आहेत हे गांभीर्याने घ्या. अन्नाची सार्वजनिक कार्यक्रमात होणारी नासाडी होवू देवू नका असा सल्ला सौ. विखे पाटील यांनी दिला.