जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांचा त्याग आणि कष्ट मुलांनी विसरु नये सौ. शालीनीताई विखे पाटील

विखे महाविद्यालयात माता कॉलेजच्या दारी उपक्रम

आई-वडील मुलांना घडवितात तर शिक्षणांतून आत्मविश्वास मिळत असतो.जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांनी केलेला त्याग,कष्ट मुलांनी विसरु नये. संस्कारांची शिदोरी जपा असे संदेश जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्याना दिला.

लोकनेते पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
पद्मश्री डॉ. विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने”माता कॉलेजच्या दारी”आणि रक्त तापणसी शिबीर,शाररिक आरोग्य तपासणी शिबीर आणि कोविड लसीकरण मोहीम तपासणी शिबीराचे त्यांच बरोबर खास मातासाठी सास्कृतिक कार्यक्रम आणि विविध फनी गेमच्या उदघाटन सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दिघे,गृह विज्ञान महाविद्यालयांच्या प्राचार्या डाॅ.अनुश्रश्री खैरे,पी एम टीच्या डाॅ.वसुंधरा पाटील,आरोग्य सल्लागार समिना पठाण,उमा खरे,उप- प्राचार्या प्रा. छाया गलांडे,डाॅ.कल्पना पलघडमल,डाॅ.वैशाली मुरादे आदी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, शिक्षणातून मुलाच्या पंखात बळ मिळते. आपल्या अनुभवातूनच ज्ञान मिळते. आई-वडीलांचा नावलौकीक वाढवा त्याच्या कष्टाची जाणीव ठेवा त्याच्या कष्टाची तुलना कशानेही होणार नाही असे मुलांना सांगून आईने मुलांशी बोलतांना त्यांना समजून घ्या, त्यांना आत्मविश्वास द्या. मुलांनी आपली ओळख निर्माण करतांना आई-वडीलांचा सन्मान करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असतानाच सामान्य ज्ञान मिळवा. स्वता:ला वेळ द्या आरोग्यदायी आहार घ्या असे आवाहन केले.

महीलांच्या आरोग्याविषयी माहीती देतांना डॉ. वसुंधरा पाटील यांनी एच. बी. पी. सी. ओ.डी. गर्भपिशवीचा कॅन्सर याविषयी मार्गदर्शन करतांना आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करा असा सल्ला दिला. यावेळी संध्या गिधाड, नितीन गागरे, पुजा खेडकर या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकांमध्ये प्रा. छाया गलांडे यांनी महाविद्यालयाचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी, प्रा. हर्षल खर्डे, प्रा. तन्वी चिटणीस यांनीकेले. आभार डॉ. जी आर पांढरे यांनी मानले.

कोट….
आम्ही जन्म दिला पण या महाविद्यालयाने मुलांना आदर्श संस्कार दिले. केवळ मार्गदर्शन केल्यामुळे मुलांने नांव मोठं केल अशी भावनिक प्रतिक्रिया वाद-विवाद स्पर्धेत विजयी झालेल्या संध्याच्या आई मंदा गिधाड यांनी दिली.

महीलांनी एकमेकीनां नांवे ठेऊ नका.
बचत गटातून टाकाऊ पासून टिकाऊ हा संदेश पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिला आहे. यांतून स्वयंरोजगार करा. विधवा महीलांनाही सन्मान द्या. घर तोडण्यापेक्षा घर जोडा. घटस्फोट वाढले आहेत हे गांभीर्याने घ्या. अन्नाची सार्वजनिक कार्यक्रमात होणारी नासाडी होवू देवू नका असा सल्ला सौ. विखे पाटील यांनी दिला.