गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हेच प्रवरेचे ध्येय – सौ. विखे

प्रवरेच्या १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनी निवड

गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हाच प्रवरेचा ध्यास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करतांना आत्मविश्वासाने पुढे जावे असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. यावर्षी १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनीत झालेली निवड हा प्रवरा परीवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाने आयोजित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाल्यालेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभात सौ. विखे पाटील बोलत होत्या.

यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तञ निकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही आर. राठी, औषध निर्माणशास्त्रज्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर, डॉ रविंद्र जाधव, गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, आय. टी. आयचे प्राचार्य अर्जुन आहेर, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. मनोज परजणे आदीसह निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ विखे पाटील म्हणाल्या सामान्य जनतेच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे. शिक्षणातून त्यांची प्रगती व्हावी. हा पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा प्रयत्न होता आज संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणासोबत नोकरीची उपलब्धता हे धोरण आहे. आज संस्थेची १८४२ विद्यार्थ्यांची निवड हा मोठा आनंद असून हेच स्वप्न पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे होते. मुलांनी बाहेर जावून नोकरी करावी यासाठी आई-वडीलांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. निवड झालेल्या क्षेत्रात अनुभव घेत पुढे जा असा संदेश देतानाच संस्थेचे आणि आपल्या परिवारांचे नांव मोठे करा असे ही सांगितले.

यावेळी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी प्लेसमेंट विभागाचे कार्य हे गौरव प्राप्त आहे. विविध सेवा सुविधा, करिअर मार्गदर्शन यामुळे प्रवरेचा प्लेसमेंट विभाग आघाडीवर असल्याचे सांगितले. प्रारंभी प्राचार्य अर्जुन आहेर यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय. टी. आय, गृह विज्ञान महाविद्यालय, औषधनिर्माण महाविद्यालय यांतून नोकरी प्राप्त २०२२- २०२३ च्या आढावा घेतला. कार्यक्रमाचे आभार डाॅ.संजय भवर यांनी मानले.

कोट……
पालकांनो मुलांची काळजी करु नका प्रवरा
शैक्षणिक संकुलातून आदर्श विद्यार्थी घडत असतो.मुलांसोबत मुलीही नोकरी मिळविण्यात आघाडीवर आहेत. आपल्या मुलांना पाठबळ देण्यासाठी विखे पाटील परिवार त्यांच्या सोबत आहे. नोकरी सोबतचं स्वता: ची कंपनी स्थापना करा. देशात आणि परदेशात संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचे मार्गदर्शन घेऊन पुढे जातांना आत्मविश्वास कायम ठेवा हा संदेश सौ.विखे पाटील यांनी दिला.