पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी… प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे

राज्याचे महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील व शेतकऱ्याच्या मुलांना रोजगाराच्या जास्तीत- जास्त संधी कशा उपलब्ध होतील या भूमिकेतून सातत्याने त्यांचा आग्रह असतो. यासाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था नेहमी अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून नुकतेच मैकलियोड फार्मास्युटिकल्स प्रा.ली आणि आयटी या कंपन्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कॅम्पस इंटरव्यू श्री अमित खानबार व श्री पटेल घेतला.व त्यातून मैकलियोड फार्मास्युटिकल्स प्रा.ली या कंपनीने ५५ विद्यार्थ्यांची निवड केली; तर आयटी कंपनीचे श्री रोहित खरात व श्री सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचा कॅम्पस इंटरव्यू व त्यातून त्यांनी ०५ विद्यार्थ्यांची निवड केली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
महाविद्यालयात जास्तीत-जास्त मुलाखातींचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे सह सचिव श्री.भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ आदीचे सातत्याने मार्गदर्शन लाभत असते. प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मनोज परजणे, डॉ. हरिभाऊ दुबे व प्लेसमेंट सेलचे श्री आप्पासाहेब शेळके हे सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील हे पाहत असतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.