पालकांनी मुलांच्या कलेला संधी देण्याचे काम करावे… सौ.शालिनीताई विखे पाटील

पालकांनी मुलांच्या कलेला संधी देण्याचे काम करावे. आपली स्वप्ने त्यांच्यावर न आदला त्यांना करिअरसाठी प्रोत्साहन द्या कलेतून ही चांगले करीअर घडू शकले. प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सुप्त संधीना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते असे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळसाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था,लोणी आणि कला अध्यापक संघ यांच्या वतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त आयोजित भव्य ललित कला स्पर्धा 2022 च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या.यावेळी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्या भारती देशमुख, डॉ. अण्णासाहेब तांबे, श्री.विद्या घोरपडे,श्री.गिरीश सोनार,संयोजन समितीचे श्री.एम. डी. जरे, श्री.एस. बी. मोरे, श्री.जे पी बोरा, श्री.बी टी वडतिके आदीसह स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि पालक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, कला शिक्षक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ विखे पाटील म्हणाल्या, ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम प्रवरेच्या शैक्षणिक संकुहाकडून होत आहे. आपल्याकडे असलेली कला हे देखिल चांगले करीअर आहे. त्याचा योग्य रित्या वापर करतांना त्यामध्ये नवीन गोष्टी शिकत पुढे जा शिक्षणात स्पर्धा असली तरी या स्पर्धेला समोरे जातांना आपले ध्येय, चिकाटी आणि परिश्रम यांतून यश नक्की मिळले असे सांगून यश-पराजयाची चिंता न करता स्पर्धेत सहभागी होत रहा असा संदेश दिला.
यावर्षाच्या स्पर्धेत ७० विविध शाळेतून १२ हजार विद्यार्थ्यांनी चित्रकला, रंगभरण, हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग नोंदविला.याशिवाय गुणवंत शिक्षकांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर. टी. चासकर आणि किशोर आहेर यांनी तर आभार आर. पी. को-हाळे यांनी मानले.