लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती महाविद्यालचे प्रचार्य डाॅ.संजय भवर यांनी दिली. या सामंजस्य कराराचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना व्हावा आणि त्यांना नवीन औषधे मार्केट मध्ये येण्यापूर्वी ती मनुष्य वापरासाठी कशी गुणकारी व सुरक्षित आहेत याचा अभ्यास व्हावा या साठी हा समंजस्या करार फायद्याचा ठरणार आहे. तसेच आजच्या या कोरोना कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना औषधे गुणवत्ता सुधारणा बद्द्ल प्रक्षिक्षण मिळावे या उद्देशाने हा सामंजस्य करार करत असल्याचे कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष राजपूत यांनी सांगितले. या सामंजस्य करारानुसार महाविद्यालय व कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. या मध्ये विविध विद्यार्थी गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम होणार असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या मध्ये प्रामुख्याने नवीन औषधांवरील संशोधन, मानवीय औषधी चाचणी, त्यांची सुरक्षतता तपासणी प्रशिक्षण आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत . प्रवरा औषधीनिर्मानशास्त्र महाविद्यालयात असे विविध सामंजस्या करार करण्यात आले असून सध्य परिस्थिती मध्ये औषध कंपनी मध्ये चालणाऱ्या विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा शिक्षक- विद्यार्थ्यांना या मार्फत मोफत मिळत आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट चे प्रमुख प्रा.सोमेश्वर मनकर यांनी हा सामंजस्य करार करण्यात विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे