सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते म्हणूनच खेळ जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तुकाराम पाटील बेंद्रे यांनी केले.
बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ विठ्ठल राव एकनाथराव विखे पाटील विद्यालयात पावसाळी शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन तुकाराम पाटील बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले त्या विखे ते बोलत होते. या प्रसंगी मारुती गोरे , क्रिडा शिक्षक श्री सुनिल गागरे, श्री टावरे सर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री प्रा बाबा वाणी,सचिव श्री बेंद्रे सर उपाध्यक्ष श्री मगर सर राष्ट्रीय पंच श्री बबन सातकर,श्री सुनील आहेर,अरूण झुराळे,राहुल काळे,संदिप हारदे,संदिप निबे, सय्यद सर,रोहकले सर,अंत्रे सर घोलप सर व प्रमोद देशमुख आदी उपस्तित होते.प्राचार्य श्री डेंगळे सर यांनी प्रास्ताविक केले.
या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजूरी मुलांच्या संघाने मिळवला.व 17वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक प डॉ वि ए विखे पाटील विद्यालय, बाभळेश्वर मुलांच्या संघाने मिळवला.19वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक पि.व्हि.पी.ज्युनियर महाविद्यालयातील मुंलाच्या संघाने मिळवून राहता तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. मुलीच्या खो खो स्पर्धेत 14 व 17 वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक इंग्लिश मिडीयम स्कूल लोणी संघाने मिळवला. तसेच 19 वर्ष मुलींच्या वयोगटातील प्रथम क्रमांक श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,राजूरी सघांने मिळवला.
श्री तुकाराम पाटील बेंद्रे यांनी या वेळी खेळाचे जीवनात अन्यन साधारण महत्त्व आहे हे स्पष्ट केले, तसेच जे मुले खेळात सहभागी होतात ती मूले जीवनात आनंद निर्माण करतात व यशस्वी होतात व निरोगी जीवन जगतात हे स्पष्ट केले .
फोटो कॅप्शन;- बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ विठ्ठल राव एकनाथराव विखे पाटील विद्यालयात पावसाळी शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी तुकाराम पाटील बेंद्रे ,संचालक मारुती गोरे, क्रिडा शिक्षक श्री सुनिल गागरे, श्री टावरे सर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री प्रा बाबा वाणी,सचिव श्री बेंद्रे सर उपाध्यक्ष श्री मगर सर राष्ट्रीय पंच श्री बबन सातकर,श्री सुनील आहेर,अरूण झुराळे,राहुल काळे,संदिप हारदे,संदिप निबे, सय्यद सर,रोहकले सर,अंत्रे सर घोलप सर व प्रमोद देशमुख आदी.