चैतन्य कुलकर्णी याने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करताना प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक

गोंदिया येथे घेण्यात आलेल्या 13 व्या महाराष्ट्र राज्य पॅरालंपिक जलतरण स्पर्धेमध्ये लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी येथील कला वाणिज्य विज्ञान व संगणक महाविद्यालयातील  दिव्यांग असणारा चैतन्य कुलकर्णी याने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करताना प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले. त्याची नॅशनल स्विमिंग चॅम्पीयमसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धे मध्ये महाराष्ट्रातून विविध  २५ जिल्ह्यातील  दिव्यांग स्पर्धक सहभागी  झाले होते. या मध्ये नगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवला गेला होता, राहाता तालुका येथील दिव्यांग असणारा चैतन्य कुलकर्णी याने अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व केले. चोख कामगिरी बजावत बेस्ट स्ट्रोक १०० मीटर या ईव्हेट मध्ये  घेत प्रथम  क्रमांकाचेसुवर्ण पदक त्याने पटकवून अभिमानास्पद कामगिरी बजावली.. तसेच  फ्री स्टाईल मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पुन्हा एकदा चैतन्य कुलकर्णी याने   बेस्ट स्ट्रोक मध्ये परत प्रथम क्रमांचे पारितोषिक मिळवून नगर जिल्ह्याचे  राहाता तालुक्याचे नाव रोषण करत विक्रम नोंदवला.चे सर्व अहमदनगर जिल्ह्यातुन कौतुक होत आहे. चैतन्य याला विलास दावणे यांचे मार्गदर्शन लाभले.

दाढ येथील गरीब कुटुंबातील असलेल्या चैतन्य कुलकर्णी या विद्यार्थ्याला विविध स्पर्ध्ये मध्ये सहभाग घेता यावा यासाठी गृहनिर्माण मंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या तीन महिन्यानपासुन  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील जलतरण तलावामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी विना शुल्क परवानगी दिली होती. त्यामुळे त्याचा अत्मविश्वास वाढला असुन त्याने हे यश संपादन केले असल्याचे चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच त्याचे  मामा नरेंद्र पोळ, मोठा भाऊ अक्षय कुलकर्णी, संचालक देवीदास भारत पा.तांबे, प्रताप सखाहारी तांबे, कोच शिवाजी महागोविंद व सैनिकी स्कुल येथील श्री शेख, श्री  चेचरे , समीर  विखे,क्रीडा शिक्षक  प्रा प्रमोद विखे आणि परिसरातील नागरिकांचे यांचेही सहकार्य लाभले. चैतन्य ची  नॅशनल स्विमिंग चॅम्पीयमसाठी देखील निवड करण्यात आली आहे व हि स्पर्धा झाल्यानंतर त्याचा  मेड़ल व सर्टीफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.