जोतीरावांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाईं फुले यांनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल ही आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होती. असे प्रतिपादन संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे यांनी केले.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यकर्तमात श्री घोगरे बोलत होते. प्रवरा एव्हीएशनच्या संचालिका सुश्मिता विखे पाटील, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,सौ. लीलावती सरोदे , विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेपाळ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
श्री भारत घोगरे,म्हणाले कि, समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना सनातनी गुंड त्रास देत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.पण त्यांनी शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले,. जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्याचे ते म्हणाले.
फोटो कॅप्शन :- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यकर्तमात श्री घोगरे बोलत होते. प्रवरा एव्हीएशनच्या संचालिका सुश्मिता विखे पाटील, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेपाळ आदी