जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रम

पूर्वीच्या काळी मुलींना शिक्षण देणे क्षम्य नव्हते मात्र,समाजधुरिणांनी खूष खस्ता खाऊन निर्माण केलेल्या सुविधांचा उपयोग करून घेणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञाचा योग्य वापर करावा असे सांगताना वर्तमान जगताना भूतकाळ आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी वाचन करा असा सल्ला यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि कवयत्री अरुणा ढेरे यांनी प्रवरेतील विद्यार्थ्यांना दिला. 

प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह पुरस्कृत आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय आयोजित सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेबरोबरच विविध प्रवेश परीक्षांमध्ये विषेश गुण  संपादन केलेल्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रमात अरुणा ढेरे बोलत होत्या. या प्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, कार्यकारी संचालक श्री ढोणे ,भारत घोगरे,बन्सी पाटील तांबे,आप्पासाहेब दिघे,किशोर नावंदर,डॉ. अशोक कोल्हे, प्रा. दिगंबर खर्डे,डॉ. प्रदीप दिघे,डॉ. रामचंद्र रसाळ,प्रा. दत्तात्रय थोरात,  डॉ. अण्णासाहेब तांबे ,कर्नल भरत कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. 

अरुणा ढेरे म्हणाल्या कि, पद्मश्री विखे पाटील यांनी शिक्षणासाठी निर्माण केलेल्या सुविधांचा उपयोग करून घेताना तंत्रज्ञानाच्या साथीने चांगले ज्ञान आत्मसात करताना विचार आणि दिशा पुस्तकांच्या बाजूने वळवा  असे सांगितले.

यावेळी  पद्मश्री विखे पाटील विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये ९५. ६० टक्के गुण प्रथम आलेल्या संचित खेमणर, प्रवरा पब्लिक स्कुल मधील कु. साक्षी शिरसाठ ९५. ४० टक्के ,प्रवरा सेंटरला पब्लिक स्कुल मधील ओम वैद्य  ९५. टक्के,तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये प्रवरा पब्लिक स्कुल मधील कु. ख़ुशी देसरडा ९०. ४६ टक्के, पाथरे येथील श्री छत्रपतीशिवाजी विद्यालयातील कु. श्रद्धा घोलप ८७. ६९ टक्के, आश्वी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनची कु. तेजाळ गायकवाड ८५.३८ टक्के,आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवरा पब्लिक स्कुल मधील यश पवार ९०.३१ टक्के, शुभम कोरडे ८८.७७ टक्के, आणि पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील अथर्व मिसा८४.९२ टक्के, तसेच एम एच टी- सी इ टी परीक्षेमध्ये  प्रवरा परिसरामधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल काळे ९९.७०, मयूर घोरपडे ९९.५३,योगेश कुमकर ९९.३८ आणि जे.इ.इ परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रवरा परिसरातील प्रवरा पब्लिक स्कूल खुषी देसरडा ९०. ३५,यश पवार ९०. १७ आणि राहता येथील कला,विज्ञान  व वाणिज्य   कनिष्ठ महाविद्यालयातील ऋषिकेश मोरे ८८.०० , नीट परीक्षे मध्ये ४१५ गुण मिळविलेल्या विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. प्रज्ञा यालमामे ,४०८ गुण  मिळविलेल्या प्रवरा पब्लिक स्कुल मधील शुभम कोरडे आणि ३८७ गुण मिळविलेल्या कु. या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वैष्णवी हिंदोळे या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. या वेळी अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोस्थाहन मिळावे या साठी सुरु करण्यात आलेल्या पद्मभूषण मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील अपंग शिष्यवृत्ती मध्ये दिक्षा रोकडे, प्रतीक्षा आगाशे ,शुभम बोऱ्हाडे ,निकिता कापकर,आदित्य कांदळकर,रवींद्र पगारे, नितीन तिखे,रोहिणी साळवे या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यात आली. 

आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले कि, प्रवरा परिसरामध्ये दर ५ कि.मी च्या आत माध्यमिक मविद्यालय सुरु झाल्या मुळेच ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षणापर्यंत पोहचवू शकल्या . आज तांत्रिक शिक्षणाचे मोठे दालन प्रवरे मध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

 फोटो कॅप्शन :-  प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह पुरस्कृत आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय आयोजित सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेबरोबरच विविध प्रवेश परीक्षांमध्ये विषेश गुण  संपादन केलेल्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण  प्रसंगी अरुणा ढेरे समवेत माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, कार्यकारी संचालक श्री ढोणे ,भारत घोगरे,बन्सी पाटील तांबे,आप्पासाहेब दिघे,किशोर नावंदर,डॉ. अशोक कोल्हे, प्रा. दिगंबर खर्डे,डॉ. प्रदीप दिघे,डॉ. रामचंद्र रसाळ,प्रा. दत्तात्रय थोरात कर्नल भरत कुमार आदी.