प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत कॅम्पसइंटरव्हयुव मध्ये वार्षिक सात लाख रुपयांचे पॅकेजची नोकरी

शैक्षणिक प्रगतीत सतत उत्तम कामगिरी करतअसलेल्या व विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट संदर्भात नेहमीच अग्रेसरअसलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील  कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागात सध्याच्या २०१९-२० बॅचच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या अपेक्षा आहेर, मेघना देव्हारे, प्राजक्ता बेंद्रे व  विकास खेमनर यांना(टीआयएए) ग्लोबल बिझनेस सर्विसेस या बहुराष्ट्रीयनामांकित कंपनी मध्ये सात लाखांचे (७.०० लाख) भरघोस पॅकजसह तर इन्फॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगविभागाच्या विशाखा शेडगे हीची ब्ल्युपाईन्याप्पलया  बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये ३.६० लाखाच्यापॅकेजसह निवड झाली आहे. संस्थेचे संस्थापक पद्म डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंतीच्या दिवशी ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री  मा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अशी माहिती प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.  ह्या विद्यार्थांनी या यशाचे श्रेयप्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिले. त्यांना ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफीसर, प्रा. राजेंद्र निंबाळकर, डॉ. सचीन कोरडे व प्रा. दिपक साळुंके सहकार्य  लाभले.

या प्रसंगी प्रा. धनंजय आहेर यांनी सांगितले   संस्थेचेअध्यक्ष  व  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील मा. नामदार राधाकृष्ण विखेपाटील यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवराग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुलांच्याप्लेसमेंटसाठी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वविकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतोज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनानोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालयविद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारेकौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत. तसेच महाविद्यालयाने या वर्षी अनेकराष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार केला असल्याने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना  याचा नोकरीमिळण्यासाठी फायदा होणार आहे.या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरइंजिनियरींग व इन्फॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगविभागाच्या सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा   ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाम. सौ. शालिनीताई विखे पाटील,  खासदार सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीणशिक्षण संस्थेचे डायरेक्टर जनरल मा.डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, तांत्रिक संचालक वएसव्हीआयटी सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. के टी व्ही रेड्डी, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर,  ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे, प्रा. राजेंद्र निंबाळकर, कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. शरद रोकडे,इन्फॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी  विभागाच्या विभागप्रमुख प्रा. स्वाती राऊत, डॉ. सचीन कोरडे, प्रा. दिपकसाळुंके, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.