प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथे वार्षिक अंतर कुलिन जलतरण स्पर्धा मध्ये १२, १४ व १७ या विविध वयोगटातील ११० विद्यार्थ्यांनी  सहभाग घेऊन या स्पर्धा . मोठ्या उत्साहात पार पडल्या. असल्याची माहिती प्राचार्य सुशील शिंदे यांनी दिली.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा अभिमत विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी डॉ.  सुनील बुलार उपस्थित होते. यामध्ये  पेशवा सदन विजयी घोषीत झाला तर द्वितीय स्थानाचे मानकरी मोरया सदन ठरले. वैयक्तिक  स्पर्धेत विररुद्रप्रताप  आहेर, धीरज खराटे ,चंद्रकांत पाटील यांनी विविध वयोगटात प्रथम स्थान पटकावले. यावेळी शाळेचे डायरेक्टर डॉक्टर के जगन्नाथन, उपप्राचार्या हेमांगी कसरेकर, निमसे सर, सदनिका प्रमुख सचिन सर, श्री आर डी शिंदे, निलेश उमक, अरुण बोधक, मनोज मांजरे,सौ. संगिता पलाल, श्रद्धा  विखे ,जब्बीन  शेख क्रीडाशिक्षक रवींद्र भणगे, राजू तांबे, स्विमिंग कोच श्रीशैल जेवरे उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन :-प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या  वार्षिक अंतर कुलिन जलतरण स्पर्धा विजयी संघासोबत  डायरेक्टर डॉ.  के जगन्नाथन प्राचार्य सुशील शिंदे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी डॉ.  सुनील बुलार, उपप्राचार्या हेमांगी कसरेकर विजयी जलतरणपटू विररुद्रप्रताप  आहेर, धीरज खराटे ,चंद्रकांत पाटील,सोबत  निमसे सर, सदनिका प्रमुख सचिन सर, श्री आर डी शिंदे, निलेश उमक, अरुण बोधक, मनोज मांजरे,सौ. संगिता पलाल, श्रद्धा  विखे ,जब्बीन  शेख क्रीडाशिक्षक रवींद्र भणगे, राजू तांबे, स्विमिंग कोच श्रीशैल जेवरे आदी.