परदेशामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

बालवयात असताना जीवनाविषयी ठरविलेल्या ध्येय्याबाबत महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर सुरवातीच्या काळात काहीशी गोंधळली स्थिती तरी,प्रवरेतील सुविधा,शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नवीन जोडलेल्या मित्रपरिवाराचे सहकार्य या मुळेच जीवनाला वेगळी दिशा मिळाल्याचे सांगताना. अमेरिकेतील ‘आयलोन फार्म्स” मध्ये उद्यान विद्या विभागात निवड झालेल्या सुनील कोकणे या विद्यार्थाने लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगून ध्येय्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन केले. लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील सुनील कोकणे या माजी विद्यार्थ्यांची अमेरिकेतील ‘आयलोन फार्म्स” मध्ये उद्यान विद्या विभागात उच्च शिक्षण व व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण;विक्री व पुरवठा व्यवस्थापन, आशियाई फळे व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणा साठी, गणेश आहेर या विद्यार्थांची दुबई येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून निवड झाल्याने तसेच, अमित शिंदे या विद्यार्थ्यांची न्यूयार्क अमेरिका येथे ओल्ड बेस्टबरी गार्डन. मध्ये प्रशिक्षणासाठी आणि प्रवीण लोंढे या विद्यार्थ्यांची नेदरलँड्स (बेजारलँड्स) येथील डॉयलवायक बी.वी याकंपनीमध्ये सेंद्रिय शेतीवर आधारीत नकदी पिकांचे उत्पादन या विषयातील प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांचा महाविद्यालयाच्या सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विविध ठिकाणी निवड झालेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या वाटचालीबद्दल आलेले अनुभव सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सांगून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भारत घोगरे,अॅल्युमिनी रिलेशनच्या संचालिका डॉ. प्रिया राव,कृषिसंलग्नीत महाविद्यालयाचे संचालक डॉ मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या सौ. अरुण थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर यांनी प्रास्तविक केले. प्रा. धिरज कार्ले यांनी आभार व्यक्त केले. फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील सुनील कोकणे (अमेरिका), गणेश आहेर (दुबई) अमित शिंदे. (न्यूयार्क अमेरिका) आणि प्रवीण लोंढे या विद्यार्थ्यांची नेदरलँड्स (बेजारलँड्स) येथील प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार कार्यक्रम प्रसंगी सचिव भारत घोगरे, डॉ. प्रिया राव, डॉ मधुकर खेतमाळस, प्राचार्य रोहित उंबरकर,प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्या सौ. अरुण थोरात प्रा. धिरज कार्ले आदी…