पारंपरिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये कला. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अंतिम वर्षातील आणि पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आय सी. आय सी बकनक (पुणे ) च्या वतीने आयोजित केलेल्या भरती मेळाव्यामध्ये सुमारे ८४ विद्यार्थ्यांची निवड केली निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत आय.सी आय बँकेचे एच आर मेनेजर श्री रामप्रसाद ,अक्षरी निरंजन मोहिते ,सौ,अनुश्री जोशी ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर,प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे,उप्राचार्य प्रा. दत्तात्रय थोरात,प्रा. आप्पासाहेब शेळके आदी.

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये कला. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अंतिम वर्षातील आणि पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुबई येथील मॅक्लाइड फार्मासुटिकल कंपनीने आयोजित केलेल्या भरती मेळाव्यामध्ये सुमारे ३२ विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेतएकाच मॅनेजर पार्थो, ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर,प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे,संजय मिसाळ ,प्रा. आप्पासाहेब शेळके आदी.

प्रवरा शैक्षणिक संकुलामधून शिक्षणाच्या परिपूर्ण सुविधा निर्माण करतानाच, नवनवीन तंत्रज्ञान आणि जागतिक स्थरावर जलदगतीने होणाऱ्या बदलाबाबतचे अतिरिक्त ज्ञान ऊपलब्ध करून दिले जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्पर्धेच्या सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.म्हणूनच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यां प्रमाणेच कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेतुन शिक्षण घेतलेल्या प्रवरेच्या विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर नोकऱ्यांची संधी मिळत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिली.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये कला. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अंतिम वर्षातील आणि पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. २० मे २०१९ रोजी मुंबई तारापूर येथील मच्लेओद्स फार्मासुटिकल या कंपनीने मुलाखती घेऊन ३२ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सिलेक्शन झाल्याचे पत्र दिले. तर, दि. २३ मे २०१९ रोजी पुणे येथील आय सी आय सी बँके ने घेतलेल्या कंपास मुलाखती मध्ये ८४ विद्यार्थ्यांची निवड केलीअसल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघें यांनी सांगितले.

तसेच मार्च महिन्यामध्ये औरंगाबाद येथिल धूत ट्रान्समिशन प्राव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या वतीनेही आयोजित केलेल्या भरती मेळाव्यामध्ये कला ,वाणिज्य विज्ञान शाखेतील सुमारे १५८ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली होती. ग्रामीण भागातील मुला-मुलींना पदवी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लागेचचं नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातत्याने देश विदेशातील नामांकित कंपन्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात येते. अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पदवीची परीक्षा देण्यापूर्वीच अनेक कंपन्यांनी मुलाखती घेऊन नेमणुकीचे पत्र दिले आहे. ग्रामीण भागातील मुले हुशार असूनही केवळ मुलाखतीमध्ये व्यक्त होऊ शकत नाहीत. म्हणूनच असी मुले-मुली नोकरीच्या संधी पासून दूर राहू नये यासाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधून शिक्षणाबरोबरच त्या त्या विषयातील कौशल्याचे प्रशिक्षण देऊन औद्योगिक कंपन्यांना अपेक्षित असलेले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी, कंपन्यांना पाहिजे असलेले कौशल्य या मूला-मुलींमध्ये निर्माण केले जात आहे. त्यामुळेच आजपर्यंत ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय औदयोगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्याप्राप्त झाल्या आहेत या बाबत ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर यांनी यांनी समाधान व्यक्त केले. प्लेसमेंट विभागाचे प्रा. आप्पासाहेब शेळके यांनी या मुलाखती उत्कृष्ठ नियोजन केले होते. या विद्यार्थ्यांचे या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील,महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. रेड्डी ,प्रा. दिगंबर खर्डे, डॉ.हरिभाऊ आहेर आदींनी अभिनंदन केले. चौकट :-गेल्या तींन महिन्यात २७५ विद्यार्थ्यांना नोकऱ्या – अभ्यासक्रमाबरोबर अतिरिक्त ज्ञान उपलब्ध केल्या मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याने गेल्या तींन महिन्यात कला. वाणिज्य विज्ञान या पारंपरिक शाखेतून शिक्षण घेतलेल्या प्रवरेच्या सुमारे २७५ विद्यार्थ्यांना नोकऱ्या