विद्यार्थ्यांची अमेरिकेत कौशल्य प्रशिक्षणा साठी निवड

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सुनील कोकणे व प्रशांत बोरस्ते यांची अमेरिका येथील आयलोन फार्म्स मध्ये उद्यान विद्या विभागात उच्च तंत्रज्ञान व व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य.रोहित उंबरकर यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हे विद्यार्थी अमेरिकेतील आयलोन फार्म्स मध्ये उद्यान विद्या विभागात उद्यानविद्या व्यवस्थापन कौशल्य, आशियाई फळे व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, विक्री व पुरवठा व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री .राधाकृष्ण विखे पाटील, ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील , युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.