लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती प्राचार्य  ऋषिकेश औताडे यांनी दिली.              

या कार्यक्रमात  तृतीय वर्षातील विद्यार्थी व रा.से.यो.स्वयंसेवक  विक्रमसिंह पासले याने दोन्ही महापुरुषांचे देशप्रेम, दुरदृष्टी व त्याग आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांसमोर मांडला.तर केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती व शिवजयंती व गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना एकोपा निर्माण करण्याचे काम केले तर चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी प्राण पणाला लावले असे प्रतिपादन स्वयंसेवक सचिन वाघ याने केले.यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे, रा.सो.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे , शिक्षक  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अवंतिका सानप हिने केले तर आभार दिप्ती शेळके हीने मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक ओमप्रकाश शेटे,सचिन वाघ,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया मध्ये  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करताना संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे,  प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे ,  अवंतिका सानप  दिप्ती शेळके ओमप्रकाश शेटे,सचिन वाघ,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे आदी.

पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा

अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकाचे कौशल्यज्ञान महत्वाचे आहे. कोणत्याही एका कौशल्यावर आपले पुढील करीयरची दिशा ठरते. जिद्द व मेहनत घेतल्यास यश हमखास मिळत असल्याचे मत अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे यांनी व्यक्त केले.       

पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वियार्थ्यांना मार्गदर्शन करतान ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक बन्सी तांबे पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा.धनंजय आहेर, उपप्राचार्य प्रा.नामदेव गरड, प्रा. सोमनाथ लव्हाटे, विभाग प्रमुख राजेंद्र साबळे, विभाग प्रमुख प्रा.डी.के.शिरसाठ, प्रा. इ.आर.घोगरे, प्रा.आर.व्ही.लावरे, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.         

बन्सी पाटील तांबे म्हणाले की, प्रवरेत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारानेच प्रवरेची घोडदौड सुरू असून संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नविन उपक्रम सुरू आहेत. प्रवरेतील विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक महत्वांच्या पदांवरती कार्यरत आहेत. देशातील अग्रगण्य संस्था म्हणून प्रवरेचे नाव आहे.       

प्राचार्य डॉ. विजय राठी म्हणाले की, उत्कृष्ठ अभियंता होण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान देखील मिळविणे गरजेचे आहे. या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व क्षेत्रात परिपुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध कंपन्यामधून विद्यार्थ्यांना दरवर्षी भेटी व प्रशिक्षण दिले जात असल्याने मुलाखतीच्यावेळी विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कँम्पस मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.       

यावेळी प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.रवींद्र काकडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.सोमनाथ लव्हाटे यांनी आभार मानले.      

फोटोकॅप्शन – पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थी व पालकमेळाव्यात मार्गदर्शन करताना अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे, समवेत प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी.

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

लोणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली. 

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी प्रा. राहुल विखे यांनी लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र व  त्यांची स्वातंत्र्यासाठीची चळवळ  या विषयी माहिती दिली तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले. 

फोटो कॅप्शन :-लेणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक  कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले.

जल शक्ति अभियान

 लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी  महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी दिली.      

प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये   राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काॅॅॅलेज कॅॅॅॅम्पस दिवस साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थीनी महाविद्यालयातील उत्तर परिसर ते दक्षिण परिसर या या दरम्यान वृक्ष दिंडी काढण्यात आली होतीं या वृक्ष दिंडीची सांगता महाविद्यालयात करण्यात आली  महाविद्यालयातील स्थापत्य विभागाच्या विद्यार्थीनी पर्यावरणावर आधारित जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले वाढती वृक्षतोड, पर्यावरणाचे असंतुलन त्यामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जल है तो कल है यासाठी पाणी बचतीचे महत्व,वृक्ष संवर्धन आदि विषयावर विद्यार्थीनी या पथनाट्याद्वारे जनजागृती केली या पथनाट्याचा उद्देश सृष्टी भाबड या विद्यार्थीनीने मांडला तर पथनाट्याचा शेवट तुकाराम पवार व गौरी विखे यांनी केला    

अभियांत्रिकी महाविद्यालयालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांनी वृक्ष दिंडीचा समारोप करताना सांगितले की दिवसेंदिवस पर्यावरणाचा ह्रास वाढत असल्याने त्याचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे भविष्यत पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थीनी शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करण्याचे त्यांनी आवहान करीत पथनाट्याचे कौतुक केले   

 स्थापत्य विभागाचे प्रमुख आर पी आमले,प्रा एल के लहामगे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले शेवटी प्रा एन ए कापसे यांनी सर्वांचे अभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले      

फोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आदी  .

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातविविध कार्यक्रमाचे आयोजन करून  गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

     महाविद्यालयातील पदवीच्या शेवटच्या वर्षातील  विद्यार्थ्यांनी या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन एक आगळा वेगळा सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली  मनोगते  व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित करत, गुरु – शिष्याची चालत आलेली परंपरा यावर विचार मांडले, सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये  गुरुपोर्णिने निम्मित आयोजित कार्यक्रम प्रसंगी  प्राचार्या डॉ. प्रिया राव, प्रा. नचिकेत दिघे, प्रा संजय भवर, प्रा सुनयना विखे,प्रा रवींद्र जाधव आणि विद्यार्थी. 

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची  माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.    

या कार्यकर्माचे  महाविद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले व महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली  मनोगते  व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, लोकमान्य टिळकांचे समाजकार्य तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अधोरेखित केले तसेच थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्यासंघर्षमय काळातील त्यांची कायदेभंगाची चळवळीतील सहभाग अश्या अनेक प्रमुख बाबींना उजाळा दिला , सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  साजरीकरताना  प्राचार्या डॉ. प्रिया राव समवेत शिक्षक आणि विद्यार्थी 

जलशक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. 
   महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे केडेट्स आणि  विद्यार्थ्यांनी प्रथम गावामधून वृक्ष दिंडी आयोजित केली. या कार्यक्रमाचे उदघाटन लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचेजल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी  आस्थापना संचालक डॉ हरिभाऊ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात  राष्ट्रीय सेवा योजनेचे १३५ स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे८५  केडेट्स यांनी सहभाग घेतला. वृक्ष दिंडीनंतर जनजागृती अंतर्गत पर्यावरणशास्र विभागाचे प्रमुख डॉ. गोरक्षनाथ पोंधे यांनी मार्गदर्शन केले. या नंतर झालेल्या परिसंवादात स्वयंसेवक आणि कॅडेट्स यांनी आपले विचार व्यक्त केले.  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ डी. एस तांबे,यांनी प्रास्तविक केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले . महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे,राष्ट्रीय सेवा योजनेच्या  कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. 
 फोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे , उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे, डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख  डॉ. गोरक्षनाथ पोंधे, डॉ डी. एस तांबे, डॉ. राजेंद्र पवार आदी..

प्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा


युवकांच्या  हाताला काम मिळावे या साठी  विशेष कौशल्याचे प्रशिक्षण- प्रा. धनंजय आहेर. 

भविष्यातील रोजगार संधी ओळखून तरुणांमधील उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी प्रवरेतील विविध महाविद्यालयांमधील प्रत्येक  युवक-युवतींना  उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम  राबविण्यात येत असून, ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक  युवकांच्या  हाताला काम मिळावे या साठी  विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम  राबविण्यात येत असल्याची माहिती  प्रवरा कौश्यल्य विकास  विभागाचे संचालक प्रा धनंजय आहेर यांनी दिली. 
         लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील  आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा करण्यात आला.  प्रा. धनंजय आहेर बोलत होते. या प्रसंगी  प्रा. ए.एच. अन्सारी सर, शैलेश कुलधरण व संस्थेचे विविध शाखेतील सर्व समन्वयक उपस्थित होते .या वेळी प्रा. आहेर  यांनी  कौशल्य काळाची कशी गरज आहे व ते विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कशी पोहचेल या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच. प्रा. अन्सारी यांनी   कौशल्य विकास मध्ये असणारे विविध योजना बद्दल माहिती सांगून त्या योजनेचे फायदे सांगितले.व सर्वाना कौशल्य विकास दिनाच्या शुभेच्या दिल्या

प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणीच्या ९ विद्यार्थांची नामांकीत कृषी कंपन्यामध्ये निवड

प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणी महाविद्यालयात झालेल्या बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनी चे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले यामध्ये कृषी तंत्रनिकेतन च्या पाच  विद्यार्थ्यांचे फिल्ड ऑफिसर या पदावर नोकरीसाठी निवड झाली तसेच च्यार  विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा.  धनंजय आहेर यांनी दिली.         

यासाठी प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर.आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.       

विद्यार्थ्यांच्या  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,संचालक कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालये डॉ.मधुकर खेतमाळस,विद्यालयाच्या प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिंनदन केले.    

फोटो कॅप्शन :- प्रवरा कृषी तंत्रनिकेतन  महाविद्यालयातील  पाच  विद्यार्थ्यांची  बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये  आणि  च्यार  विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली.  त्यांच्या समवेत डॉ.मधुकर खेतमाळस, प्रा.  धनंजय आहेर,प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड,प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर आदी …

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी निवड

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक  प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी  निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना क्रिडा मार्गदर्शक प्रा. खुरंगे ,प्रा.  सुनिल गागरे, सुनिल आहेर सर, भाऊसाहेब बेंद्रे सर,हनुमंत  गिरी आदी .

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉक कार्यक्रमात स्टुडन्ट पार्टनर द्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

शिकत असतानाच अनुभव व पैसे कमवण्याची विद्यार्थ्यांना संधी- इंटरशालाचा उपक्रम 

प्रोत्साहितया संस्थेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी काम उपलब्ध करून देताना विशिष्ठ मोबदल्या बरोबरच अनुभव प्राप्त केलेल्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी “इंटर्नशीप टॉक” द्वारे जुनिअर विद्यार्थ्यांना  इंटर्नशालाची  इंटर्नशीप करण्याबाबत प्रोत्साहित केले.  

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये  विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून  महाविद्यालयात इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय आहेर याने केले.                  

इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर विक्रमसिंह पासले,भालेराव, मेघना गुरव व प्रशांत बटुळे यांनी अतिशय सुलभपणे समजावून सांगितले.या विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती.त्याचाच एक भाग म्हणून या इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते.आदित्य जोंधळे याने   आभार व्यक्त केले. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या विक्रमसिंह पासले,कु. ऋतुजा भालेराव, कु. मेघना गुरव व प्रशांत बटुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना .सोबत शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे आणि विद्यार्थी.

महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

महिलांचे संरक्षण आणि स्वाभिमानासाठी  काम करीत असलेले राज्य महिला आयोग  आता प्रज्वला योजनेच्या माध्यमातून महिलाच्या  आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आले असून, बचत गटातील महिलांना नियोजनबद्ध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन, स्थानिक संसाधनांच्या  उपलब्धते  नुसार   जिल्हा निहाय उद्योग-व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण करून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे सांगताना, महिलांच्या उत्थानामध्ये अग्रेसर असलेल्या प्रवरा परिसर आणि साईंची पुण्यभुमी असलेला अहमदनगर जिल्हा बचतगटांच्या उत्पादित मालाला व्यापक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.            

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या  प्रज्वला योजनेअंतर्गत.जनसेवा फाउंडेशन आणि राहता तालुका पंचायत समितीयांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात बचतगटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या  प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर बोलत होत्या. या प्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, सभापती सौ. हिराताई कातोरे, उपसभापती बबलू म्हस्के, प.स सदस्य संतोष ब्राम्हणे,उमेश जपे, सुवर्ण तेलोरे, सौ. मनीसध्दा आहेर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचे सह पंच्यात समितीचे सदस्य ,विविध गावचे सरपंच, महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थत होत्या. शामकुमार कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अडव्होकेट स्मिता देशमुख यांनी महिला संरक्षणाच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले तर, मंजुषा धिवर  यांनी हि मार्गदर्शन केले.        

विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या कि, जेथे महिला राहतात तेथे साक्षात देव वास करतो असे म्हटले जाते इतका सन्मान महिलांना मिळतो. असे असले तरी महिलांच्या अनेक समस्या असतात. आणि त्या समस्याची सहसा वाच्यता माहेर सोडून कुठे केली जात नाही. राज्य महिला अयोग्य हे महिलांचे दुसरे माहेरचं असून, महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. परनु त्याची माहिती महिलांना नसते . हेच काम महिला आयोगामार्फत केले जात असून आता प्रज्वला योजनेंतर्गत सरकारच्या महिलांच्या उत्थानासाठी असलेल्या योजनांच्या माध्यमातून या योजनेतून बचत गटातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने केले जाईल. राज्यभरात ही योजना राबविताना जिल्ह्यातील स्थानिक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन उद्योग व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण केले जातील. प्रज्वला बाजारच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे त्या म्हणाल्या .        

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या . सूत्रसंचालन दिनेश भाने  यांनी केले. 

चौकट :- सौ. धनश्रीताई विखे :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून मोट्या प्रमाणावर जिल्ह्यातील महिलांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले असून , ना विखे पाटील यांच्या माध्यमातून राज्यातील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रातील महिलांसाठी असलेल्या योजना राबविण्याचे काम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविताना महिलांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी निर्माण केली जाईल असे सौ. धनश्रीताई विखे यांनी सांगितले  सांगितले. 

फोटो कॅप्शन :- प्रवरानगर येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती आयोजित  महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनें अंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्रीताई विखे पाटील, प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे।सरपंच मनीषा आहेर