प्रवरा अभियांत्रिकी मध्ये शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य नोकरी भरती मेळावा.

मुलाखतीमध्ये  सहभागी होण्यासाठी  पदवीधरांनी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे – प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने 

 लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य  नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन, चाळीसपेक्षा जास्त नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुलाखतीमध्ये  सहभागी होण्यासाठी  कोणत्याही शाखेतील पदवीधरांनी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन  प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.आहे. 
          या मेगा नोकर भरतीसाठी व्हिआरडिई, इपिटोम,  इटॉन टेक्नॉलॉजी,सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज,सिद्धि फोर्ज ,ओमेपूल टेक्नॉलॉजी, महिंद्रा केप्लास्ट, होल्मकेके, व्हेरॉक इंजिनिअरींग, इके इलेक्ट्रॉनिक्स, बर्खार्ड कॉम्प्रेशन,एल अॅण्ड टी, एन एन नागा, यासारख्या  चाळीसहून अधिक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय  अशा कंपन्या सहभागी होणार आहेत. या बाबत अधिक माहीती देताना व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले कि, हा भरती मेळावा कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेल्या सर्व  विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेगा नोकरी भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखतीसाठी समक्ष  हजर रहाणे आवश्यक आहे.  ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/Ri5fb3V7xDttfHTm8 या लिंकचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष व  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदार संघ , प्रवरा परिसर व अहमदनगर जिल्ह्यातील  सर्व  पदवी घेतलेल्या विदयार्थी -विद्यार्थिंनीना नोकरी मिळावी या साठी या महाभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
             बोर्ड ऑफ  अँप्रेन्टीसशिप  ट्रेनिंग (BOAT) पश्चिम विभाग मुंबईचे भारत सरकार यांच्या  सहकार्यांनी होत असलेल्या या मेळाव्यासाठो (BOAT) डेप्युटी डायरेक्टर एन. एन. वडोदे उपस्थित राहणार असून या प्रसंगी लार्सन एंड टूब्रोचे जनरल मॅनेजर श्री अरविंद पारगावकर , विखे पाटील पॉलिटेक्निचे माजी विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद डिस्टिलरी वालचंदनगरचे डायरेक्टर श्री कारण यादव ,अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि वारले कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. अनिता गुजर  आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 
        आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे तसेच यावर्षी संस्थेतील विविध महाविद्यालयामधील सुमारे  १ हजार ६२० विद्यार्थ्यांना निकालीपूर्वी नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.व या पुढेही महाविद्यालय त्यासाठी काम करत राहणार आहे. अशी माहिती  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे स्किल डेव्हलपमेंट व ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
         या मेळाव्याच्या आयोजनासाठी व यशस्वी होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, . खासदार डॉ . सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक  डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक संचालक व एसव्हीआयटी सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. के टी व्ही रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी  प्रवरा तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. विजयकुमार राठी,  डॉ. प्रदीप दिघे, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर,  संस्थेचे सर्व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे परिश्रम घेत आहेत.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात गुरुपोर्णिमा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकतीच गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या 
 वतीने महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, यांनी दिली. 

या कार्यक्रमास साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे ( पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे , अस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर , शिक्षण  संचालक प्रा. दिगंबर खर्डे , कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतामाळस,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. अशोक कोल्हे यांनी प्रत्येक स्वयंसेवकाने एक झाड दत्तक घेऊन त्याची जोपासना करण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी  प्रा संदीप पठारे, प्रा अमोल खडके, प्रा.गणेश लबडे, प्रा.वाल्मिक जंजाळ, प्रा.विक्रम राऊत, प्रा.विशाखा देवकर, प्रा. प्राची शिंदे , प्रा.प्रियांका दिघे,,प्रा.सुदाम वर्पेव सर्व स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.

फोटो कॅप्शन :-गुरु पोर्णिमेनिमित्त  लोणी येथील कृषी महाविद्यालया मध्ये वृक्षारोपण करताना. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे , अस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर , शिक्षण  संचालक प्रा. दिगंबर खर्डे , कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतामाळस,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदी.

गुरु पौर्णिमा साजरी

अगदी गर्भ संस्कारापासूनच  शिक्षणाची सुरुवात करून,आपल्या अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करणारी आई हि  खरी गुरु असून , जिवनात चांगल्या वाईट गोष्टी शिकविवणारेही आपले गुरूच असून ,आपल्याला जीवनात  जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा साजरी केली जाते असे प्रतिपादन  बाभळेश्वर येथील सदगुरु नारायनगीरीजी गुरुकुलचे संंस्थापक ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के यांनी केले. 
       लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल मध्ये गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरु पूजन व व्यास पूजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के बोलत होते. या वेळी  सैनिकी स्कुलचे कमांडंट कर्नल डॉ. भारत कुमार यांनी “सबसे बडा गुरु ‘आणि गुरु शिष्य परंपरा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी  ह.भ प.अर्जुन महाराज डमाळे , बाबा बागळे ,भास्कर थेटे , संजय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. 
ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के म्हजनाळे कि, आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि जीवनामध्ये भेटणारा प्रत्येक जण गुरूच असतो असे सांगताना. जी भूमी पवित्र सैनिकांच्या रक्ताने माखली असून आपल्या पोटामध्येनांगर खुपसून अन्न पनुयाची सोया करते त्या धरणी मातेलाही विसरता येणार नाही. म्हणूनच वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचर्ये या न्यायाने पर्यावरणाविषयी प्रबोधन केले . या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना  मिठाई भरवली .महेश डहा ळके, 
फोटो कॅप्शन :-  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल मध्ये गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरु पूजन व व्यास पूजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के , सैनिकी स्कुलचे कमांडंट कर्नल डॉ. भारत कुमार ,प्राचार्य सुधीर मोरे  ह.भ प.अर्जुन महाराज डमाळे , बाबा बागळे आदी.

स्पर्धा परीक्षा पास होणे हे एक तंत्र – नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात

स्पर्धा परीक्षांसाठी घोकंपट्टी करण्यापेक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे अभ्यासाचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, ग्रुप स्टडी, अवांतर वाचन व व्यक्तिमत्व विकास ह्या बाबींचा विद्यार्थ्यांनी अंतर्भाव करायला हवा असा मूलमंत्र नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी दिला.
           लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे,  कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, पॅक्स समन्वयक डॉ. शैलेश कवडे,प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे उपस्थित होते, प्रास्ताविक कु. मोनिका आंधळे यांनी केले. 
     प्रशासकीय सेवेतील निवडीचे व  कामकाजाचे अनुभव  विद्यार्थ्यांसमोर मांडताना डॉ. यशवंत थोरात म्हणाले कि, परीक्षा पास झाल्यानंतरच्या मुलाखतीसाठी सामोरे जाताना समयसूचकता व हजरजबाबीपणा महत्वाचा असतो. मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणाऱ्याच्या हाती जर मुलाखत नियंत्रणाचे तंत्र असेल तोच यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. प्रा.  रविंद काकडे यांनी आभार व्यक्त  केले.
फोटो कॅप्शन :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या वतीने एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात.समवेत भारत घोगरे,  डॉ. अशोक कोल्हे,  डॉ. के. टी. व्ही रेड्डी,  प्रा. .दिगंबर खर्डे,  डॉ. मधुकर खेतमाळस,  डॉ. शैलेश कवडे,प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे आदी. छाया..

विविध मंडळाची स्थापना

विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण,व्यक्तिमत्वविकास , भाषिक कौश्यल्य आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विविध बहुआयामी मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगताना, या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठद्वारे  विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या नवनवीन प्रयोगांना चालना मिळून  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्स्वास निर्माण होईल असा विश्वास प्रवरा पब्लिक स्कुलचे संचालक कर्नल डॉ. के जगन्नाथन यांनी व्यक्त केला.        

कर्नल डॉ.के जगन्नाथन  आणि प्राचार्य सयाराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा पब्लिक स्कुलमध्ये चालू शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मध्ये असलेल्या संशोधकवृत्तीला चालना देण्यासाठी विविध मंडळाची स्थापना करण्यात आली. या उपक्रमा बद्दल  माहिती सांगताना  कर्नल के जगन्नाथन म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी  भाषा विकासासाठी “पब्लिक स्पिकिंग व ड्रायम्याटिक क्लब,मराठी नाट्य मंडळ,मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्ती विकसित  करण्यासाठी सायन्स क्लब,माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कौशल्य विकासासाठी,टिंकरिंग क्लब,हस्तकला व शिल्पकला यांच्या धर्तीवर आर्ट-क्राप्ट  व पॉटरी क्लब,पक्षी निरीक्षण क्लब,विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी अस्ट्रलॉजी क्लब, संगीताची आवड जोपासण्यासाठीम्युझिक क्लब, गणितीय प्रक्रिया व वैदिक मॅथ्स सजवून घेण्यासाठी  मॅथ्स क्लब अस्या बहुआयामी मंडळांची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

 फोटो कॅप्शन :- स्थापनेतून सृजनशील विद्यार्थी घडविण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये स्थापन करण्यात आलेल्या  विविध मंडळामध्ये रमलेले विद्यार्थी 

शनी डोंगरावर १५१ वृक्षांची लागवड

‘निसर्गाचे संतुलन अबाधित तर मानव अबाधित’  या न्यायाने  वैयक्तिक जीवन, घरची जबाबदारी, नोकरी या सर्व गोष्टी सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात बाळगून लोणीतील तरुणानीं’झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर सुट्टीच्या दिवशी  १५१ वृक्षांची लागवड करून  सोशल मिडीयाच्या लोभात अडकलेल्या तरुणाईला निसर्ग संवर्धनाचा वेगळा संदेश दिला.      

सध्या पावसाळा सुरु आहे. या दिवसातील बहरलेला निसर्ग पाहण्यासाठी,पर्यटकांची वर्दळ सुरु होते, लहान-मोठे धबधब्यांनी निर्सगप्रेमींना भुरळ पडते. परंतु दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असल्याने  निसर्गाचा हा सगळा अनमोल ठेवाच नाहीसा होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड. म्हणूनचजबादार नागरिक म्हणुन निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारताना लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये सेवेत असलेल्या सुरेश जाधव , प्रशांत काकड, निलेश चित्ते, दीपक विखे , संपत चेचरे , भगवान शिंदे, श्रीराम कदम, अंबादास मगर, गंगाराम धनवटे, महेश गायकवाड, अक्षय डोके, प्रवीण गायकवाड, नितीन ब्रम्हाने, उच्चशिक्षित तरुणांनी      

 शनिवार दि.१३ जुलै २०१९ रोजी  गोगलगाव येथील उजाड  शनिडोंगरावर दिवसभर खड्डे खोदून यात माती टाकून १५१ झाडे लावून अनोखा उपक्रम साजरा केला. या झाडांना पाणी घालण्यासाठी या तरुणांना दूरवरून पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परंतु गोगलगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मिळालेलता या १५१ वृक्षाची लागवड पूर्ण करण्यासाठी या तरुणांमध्ये आलेले चैत्यन्य हे खरोखरच अभिनंदन करण्यास पात्र असेच होते.

 निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर, झाडे लावा झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल. असा संदेशत्यांनी दिला.

 फोटो कॅप्शन :-गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर १५१ वृक्षांची लागवड  करताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवक….

लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घेतली तंबाखू मुक्तीची सामुहिक शपथ

लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याच्या मोहिमे अंतर्गत तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली.    

या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी व्यवसाय यावस्थापन महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.भाग्यश्री कोल्हे हिने सर्व  विध्यार्थ्यांना  सामूहिकरित्या तंबाखू मुक्तीची शपथ घालून दिली. 

कार्यक्रमात सहभागी झालेल्या  विद्यार्थ्यांना  तंबाखू मुक्ती संदर्भात जनजागृती करण्याच्या  हेतूने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल विखे यांनी  संबोधित केले. त्याच बरोबर तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारा एक लघुपट हि दाखविण्यात आला. या वेळी आपले मित्र, नातेवाईक व समाज यांनाही  तंबाखू सेवनापासून परावृत्त करण्याचा संकल्प सहभागी विद्यार्थानी केला.

औषधनिर्माणशास्र महाविद्यालय (महिला), चिंचोली, चा १००% निकाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल-मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत “ लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे औषधनिर्माणशास्र महाविद्यालय (महिला), चिंचोली, ता. सिन्नर, जि. नाशिक या महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारुशीला भंगाळे यांनी दिली. यावेळी व्दितीय वर्ष व  तृतीय वर्षाचा निकाल १००% लागलेला आहे. 

          यात व्दितीय वर्ष अभ्यास क्रमातून एकूण ६२ विद्यार्थ्यान पैकी ५० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणीत १२ विद्यार्थी उतीर्ण झाले व तृतीय वर्ष अभ्यास क्रमातून ६३ विद्यार्थ्यान पैकी ५६ विद्यार्थी विशेष प्रणाली सह प्रथम श्रेणी घेऊन उतीर्ण झाले. यात व्दितीय अभ्यास क्रमातून अनुक्रमाने कु.कोमल काळे  नामदेव एस.जी.पी.ए. ८.१४३, कु. नम्रता कांगणे  सुदाम एस.जी.पी.ए.८.०३६, कु. प्रतिभा शिंदे  संजय एस.जी.पी.ए ८.०००.

 तृतीय वर्ष अभ्यास क्रमातून अनुक्रमे कु. करिष्मा संध्यान्शे   एस.जी.पी.ए.८.०९७, कु. अश्विनी सानप  शिवाजी एस.जी.पी.ए. ८.०३२ , कु. सुजाता आगळे सूर्यभान एस.जी. पी.ए ७.८७१. गुण मिळवून विशेष प्रविण्यासाहित प्रथम व्दितीय, तृतीय क्रमाने उतीर्ण झाले. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय  चिंचोलीच्या विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन करीत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली 

ह्या सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष ना.  श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महासंचालक डॉ .यशवंत  थोरात, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा ना. .शालिनीताई विखे पाटील,  खासदार डॉ.सुजय विखे, स्कुल डायरेक्टर  सुश्मिता माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे, टेक्निकल डायरेक्टर डॉ.रेड्डी   शिक्षकांनी अभिनंदन केले. 

इंटीग्रेटेड एम. एस्सी-पी. एचडी. साठी हैद्राबाद विद्यापीठाच्या बायॉकेमिस्ट्री व मॉलेक्युलर बायोलॉजी विभागात निवड झालेल्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु. विद्या वर्धिनी हिचे मान्यवरांकडून अभिनंदन

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनी कु. विद्या वर्धिनी हिची हैद्राबाद विद्यापीठाच्या बायॉकेमिस्ट्री व  मॉलेक्युलर बायोलॉजी विभागात इंटीग्रेटेड एम. एस्सी. -पी. एचडी. साठी निवड झाल्याबद्दल नाबार्ड चे माजी चेअरमन आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले.    

हैदराबाद  विद्यापीठामध्ये उच्च पदवी शिक्षणासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे ६ जागेसाठी एकूण ६० विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग नोंदविला होता यात कु. विद्या वर्धिनी हिची अंतिम सहा मध्ये निवड झाली व त्यासाठी तिला विद्यावेतनही मिळणार आहे.   

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ. धनंजय आहेर, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  अंतिम वर्षातील  कु. विद्या वर्धिनी विद्यार्थीनीची  हैद्राबाद विद्यापीठाच्या बायॉकेमिस्ट्री व  मॉलेक्युलर बायोलॉजी विभागात इंटीग्रेटेड एम. एस्सी. -पी. एचडी. साठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करताना  नाबार्ड चे माजी चेअरमन आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी,  कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे प्राचार्य निलेश दळे आदी…

ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राच्या उदघाटन

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे  हीच  ज्ञानाची पहिली पायरी आहे.  जो पर्यन्त आपल्याला काय ज्ञान मिळवायचे हे कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची आदान प्रदान होणार नाही असे सांगताना  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  बही:शाल शिक्षण मंडळ राबवित असलेले उपक्रम सर्वांच्याच उपयुक्ततेचे ठरतील असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ यशवंत थोरात यांनी केले.                  

 लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राच्या उदघाटन प्रसंगी डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहिःशाल शिक्षण मंडळ व जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे, प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर ,डॉ. भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्या डॉ. अनुश्री दुबे यांनी प्रास्ताविक केले.          

या कृतिसत्रासाठी जिल्ह्यातील सर्व वक्ते,ग्रंथ अन्वेषक आणि केंद्रवाह  यांनी या चर्चा सत्रासाठी उपस्थित होते   संचालक डॉ. नवनाथ तुपे हे या दोन दिवस चालणाऱ्या कृतीसत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.शेवटी महिला महाविद्यालयाच्या केंद्रवाह प्रा. अर्चना घोगरे यांनी केले आहे. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथे गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय व बही:शाल शिक्षण मंडळ ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने वक्ते, ग्रंथ अन्वेषक व केंद्र वाहक संयुक्त कृतीसत्राचे उदघाटन करताना बही:शाल शिक्षण मंडळ , डॉ नवनाथ तुपे,महासंचालक डॉ यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे,प्राचार्य डॉ शशिकांत कुचेकर,उपप्राचार्या अनुश्री दुबे,केंद्रावाह प्रा अर्चना घोगरे 

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल- मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्रच्या अंतिम  परीक्षेत  लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयाने  उज्वल निकालाची परंपरा कायम राखत. यशाची कमान  उंचावत  नेली असल्याची माहिती  प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.          

या वर्षी  द्वितीय वर्ष. तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष बी. फार्मसी या तीनही वर्षांचा  निकाल१००% लागला आहे, यात द्वितीय वर्ष अभ्यास्क्रमातून एकूण ६२ विध्यार्थ्यांपैकी ५० विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, १२ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले , तृतीयवर्ष अभ्यास्क्रमातुन एकूण ६३विध्यार्थ्यांपैकी ५६  विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ७  विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले व चतुर्थ  वर्ष अभ्यास्क्रमातुन एकूण ६३विध्यार्थ्यांपैकी६०   विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ३ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले.          

यात द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातअनुक्रमे कु.श्रद्धा काशिद  ( एस. जी. पी.ए. ८.७८६), कु.स्नेहल राहाते  ( एस. जी. पी.ए. ८.५७१), कु.  रेखा शिंदे ( एस. जी. पी.ए. ८.३२१) व कु. अंजली सोनवणे( एस. जी. पी.ए. ८.३२१), तृतीय वर्ष अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. वैष्णवी वाघ   ( एस. जी. पी.ए. ८.८०६), कु.  कांचन जंगम ( एस. जी. पी.ए. ८.४८४),व कु. चैत्राली काळे  ( एस. जी. पी.ए. ८.३५५) तसेच चतुर्थ वर्ष अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. प्राजक्ता तांबे  ( सी. जी. पी.ए. ८.४१९), कु. प्रभाकर कातकाडे  ( सी. जी. पी.ए. ८.३१४), कु. श्रद्धा मंडलिक  ( सी.जी. पी.ए. ८.२८४) गुण मिळवून विशेष प्रविण्यासहित प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले.     

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष  ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्यास परिषदेच्या अध्यक्ष्या  ना. सौ.शालिनीताई विखे पाटील,  खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक   डॉ. यशवंत  थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री . भारत घोगरे, तांत्रिक-शिक्षण संचालक, डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, यांनी तसेच  सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची आय.सी .आय.सी .आय बँकेमध्ये निवड.

 लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच  विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर या पदावर नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.        

.यामध्ये कु.अमृता आढाव,कु.ऋतुजा बहिरट,कु.  पूजा थोरात,मनीष गोलाईटकर ,योगेश धोंडगे यांची आय.सि.आय.सि.आय बँकेमध्ये सिनियर ऑफिसर म्हणून निवड झाली असून प्लेसमेंट अधिकारी प्रा.शेळके  प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे ग्रहनिर्माण मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खा.डॉ.सुजय विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, संस्थचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे यांनी विशेष अभिनंदन केले..