प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट

इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग क्षेत्रात प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या असून, मागील सलग तीन वर्षांपासून या विभागातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

महाविद्यालयामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या  कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे पुणे येथील प्राज इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड  या कंपनीमध्ये सौरभ शिंदे या विद्यार्थ्याला वार्षिक ४ लाख रुपये तर, नाशिक येथील  इमर्सन एक्स्पोर्ट इंजिनीरिंग  या कंपनीमध्ये अजय बाबर या विद्यार्थ्याला वार्षिक ३ लाख ७५ हजार रुपये पगाराचे प्याकेज निकलापूर्वीच मिळाले आहे.  प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना नोकऱ्या प्राप्त होण्यासाठी अनेक नामांकित कंपन्याबरोबर  करार केले असल्याचे सांगताना प्राचार्य डॉ गुल्हाने म्हणाले की, या आधीही इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाच्या किरण धायगुडे, शार्दूल खपके, राहुल नेहे विद्यार्थ्यांची वर्चुसो प्रोजेक्ट्स अँड इंजिनीरिंग लिमिटेड पुणे तर पूजा घोरपडे, ऐश्वर्या धावणे, अभिमन्यू खेडकर, सौरभ शिंदे या विद्यार्थ्यांची टेकलोगोज ऑटोमॅशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे  या नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.

इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कडू म्हणाले की,  मागील तीन वर्षांपासून इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग या विभागातील  १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून सध्या जगात तंत्रज्ञानात चालू असलेल्या बदलामुळे भविष्यात इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत मोठी मागणी असणार आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे पदमश्री राहीबाई पोपेरे,  ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे , तांत्रिक संचालक डॉ. के टी व्ही रेड्डी, प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर,  डॉ. आण्णासाहेब वराडे, प्रा. वर्षा गायकवाड, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले

प्रवरा शैक्षणिक संकुलातील पंधरा महाविद्यालयांचा शनिवार दि २९ फेब्रुवारी २०२० रोजी एकत्रित पदवीग्रहण समारंभ

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. प्रवरामनगर ,शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूट,राहता,जनसेवा फाउंडेशनलोणी बुद्रुक आणि प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या   संलग्नित एकून पंधरा महाविद्यालयांचा एकत्रित पदवीग्रहण  समारंभ शनिवार दि २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला  असल्याची माहिती या महाविद्यालयांच्या वतीने देण्यात आली.

प्रवरा कन्या शैक्षणिक संकुलातील गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियम मध्ये होणाऱ्या  या पदवीदान समारंभामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. प्रवरामनगर ,शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूट,राहता,जनसेवा फाउंडेशनलोणी बुद्रुक आणि प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संलग्नित महाविद्यालयांतिल  स्नातकांना  पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून यावेळी आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ, शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील संस्थेचे विश्वस्त व सचिव श्री आबासाहेब खर्डे पाटील,प्रवरा अभिमत विदयापीठाचे प्र. कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील आदी प्रमुख मान्यवर  उपस्थितीत  राहणार आहेत.

शैक्षणिक परिश्रमातून विद्यार्थ्यांना  मिळणारी ‘ पदवी ’ हा त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदी व समाधानाचा असणारा क्षण.  उज्वल भविष्याची वाटचाल करताना  नवनवीन नोकरीच्या संधी प्राप्त करणे तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करणे या साठी विद्यार्थ्याने घेतलेली पदवी ही  महत्वाची असते. म्हणूनच.सहकारी साखर कारखानदारीच्या यशस्वी उभारणीनंतर  पद्मश्री विखे पाटील यांनी खेड्यातील मुले पदवीधर व्हावीत या उद्देशाने  १९६४ साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करून शेतकरी,शेतमजूर आणि बहुजन समाजातील मुलांना सुरवातीला पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयच्या माध्यमातून उच्च  शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.

त्यानंतर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माद्यमातून सर्वांगीण शिक्षणाचा मोठा विस्तार केला.आज लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. संस्थेच्या  विविध शाळा महाविद्यालयातून सुमारे ४२हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यातील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शिक्षण देणारे लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. आश्वी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय , कोल्हार येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तसेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण औषध  निर्माणशास्र महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण आर्किटेक्चर महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण शारीरिक शास्र महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्र महाविद्यालय आणि सिन्नर येथील सर विशवेसरय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी महाविद्यालय),मोहू येथील आर्किटेक्चर महाविद्यालय, राहता येथील शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूटचे कला विज्ञान व ,राहता,जनसेवा फाउंडेशन लोणी बुद्रुक या संस्थेचे शेंडी (अकोले ) येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, तसेच प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाचे पुणतांबा येथील कला, वाणिज्य महाविद्यालय,सवंस्तर येथील कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय  आदी महाविद्यालामधील स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

या पदवीदान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक  डॉ.के टी व्ही  रेड्डी, डॉ हरिभाऊ आहेर, प्रा दिगंबर खर्डे विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. प्रदीप दिघे, अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने , औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. प्रिया राव, कला वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय चे  प्राचार्य डॉ. सोपानराव  शिंगोटे, प्राचार्य डॉ.राम पवार, प्राचार्या जयश्री शिणगर , आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्या राजेश्वरी जगताप,  प्रवरा ग्रामीण शिक्षण शास्र महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. विद्या वाजे,  शारीरिकशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य विजय आमरे,डॉ. बाबासाहेब सलालकार,डॉ. सय्यद डॉ. सदाफळ यांनी केले.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील प्रवरानगर येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सेन्टर प्रकल्पाचे यश

विज्ञानाचे प्रयोग मुलांनी स्वत: करून पाहिले, तर ते त्यांना चांगल्या पद्धतीने समजून येतात. परंतु त्यासाठी मुलांना ते करून पाहण्याची संधी बालवयातच मिळायला हवी, या साठी  पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षणाच्या सर्व सुविधा परिपूर्ण पद्धतीने मुद्दाम खेड्यातच निर्माण करताना आणखी एक पाऊल पुढे टाकून  खेड्यातील मुलांमधील कुतुहल आणि वैज्ञानिक जिज्ञासेला आकार देण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने प्रवरानगर येथे नगर जिल्ह्यातील पहिल्या सायन्स सेंटरची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याच हस्ते सन २०१५  लोणी खुर्द येथिल सैनिक स्कूलच्या शेजारी साडेसात  एकराच्या परिसरात या सायन्स सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले होते. केंद्र सरकार  आणि  प्रवरा शिक्षण संस्थेच्या सहभागातून  अवघ्या एक वर्षाच्या आत डिसेंबर २०१६ मध्ये  अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर,यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर उभारणीची झाली. डॉ काकोडकर यांच्याच हस्ते  या सेंटरचे उदघाटन होऊन मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर ग्रामीण भागात हे सायन्स सेन्टर उभे राहिले. मिसाईलमॅन ‘ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर ‘ असे नाव या सेंटरला देण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील मुलांना ज्या प्रमाणात शहरात सुविधा मिळतात तस्याच शैक्षणिक  सुविधा गावात मिळाव्यात हे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे पहिल्यापासूनच धोरण होते. मग ते विनाअनुदानतत्वावरील राज्यातील पहिले पॉलिटेक्निक ( तंत्रनिकेतन) असेल,मुलींसाठी स्वतंत्र गृहविज्ञान, संगणक ,फार्मसी, औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय),अग्री पॉलिटेक्निक( कृषी तंत्रनिकेतन) याबरोबरच सैनिकी स्कूल, क्रीडाप्रबोधिनी, स्पोर्ट कॉम्लेक्स असे वेगळे पण,महात्वाकांशी प्रकल्प खेड्यात सुरु करून ग्रामीण भागातील मुलांना वेगळ्या सुविधा निर्माण केल्या आहेत. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच विज्ञानाची गोडी लागावी, त्याच्यातील शोधक बुद्धिला चालना मिळावी हा मुख्य उद्देश या सायन्स सेंटरच्या उभारणी मागे विखे पाटील यांचा होता.

राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, कोलकाता येथील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद तसेच मुंबईचे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि प्रवरा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने लोणी येथे कार्यरत असलेल्या या सायन्स सेंटरची मध्ये दररोज ६० विद्यार्थ्यांना  तज्ञ मार्गदकांच्या मार्गदर्शनाखाली  विज्ञानाबद्दलची जिज्ञासा समक्ष पडताळुन पाहता येत आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या  विद्यार्थ्यांना या सेंटरचा फायदा घेत  आहे. राज्यातील कोणत्याही शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लोणीचे सायन्स सेंटर खुले असून  नाममात्र शुल्कामध्ये दररोज जिल्ह्यातील विदयार्थी  आणि उदयाचे शास्त्रज्ञ विज्ञानातील संशोधनाचेधाडे गिरवत आहेत.

वैज्ञानिक शोधांची अद्भुत दुनिया. असलेल्या या सायन्स सेंटर मध्ये सूर्य का उगवतो? रबर कसे बनते? लाकूड पाण्यात का तरंगते? आकाश निळे का दिसते? नूटनचे नियम, आर्किमिडीस चे सिद्धांत, प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस यांच्या  पासून विज्ञानावर आधारित मनोरंजनातून विज्ञान शिकताना  वर्गात जे शिकविले गेली ते प्रत्यक्ष करून बघण्याची संधी या सेंटर मुले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निर्माण झाली आहे. वैज्ञानिक खेळाच्या माध्यमातून भविष्यात  पक्ष्यांप्रमाणे हवेत झेपावणारे विमान… टाळीच्या आवाजावर काम करणारा रोबो… स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून घेतलेला आकाशाचा वेध … “यम्मी’ चॉकलेट्‌सचा टेस्टी बुके… जपानी आणि कोरियन बाहुल्या… आफ्रिकन ड्रम्स. हे सगळे भविष्यात अनुभवण्यास मिळणार आहे. शिक्षणाची  पंढरी  समजल्या प्रवरानगर येथील   डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेन्टर हे खेड्यातील उत्साही बच्चे कंपनीची. मनोरंजनातून विज्ञान शिकण्याबरोबरच स्वतःच्या हाताने रोबोपासून दुर्बिणीपर्यंत उपकरणे बनवण्याची अनोखी संधी घेऊन येणारे ठरेल.

चौकट :-भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी प्रख्यात शास्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. ग्रामीण भागातील एकमेव असलेल्या प्रवरानगर येथील ‘ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर ‘२८ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी कुळे राहणार असल्याचे या सेंटरचे समन्वयक डॉ. सुधीर मोरे यांनी सांगितले.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु.दिप्ती शेळके आणि ओमप्रकाश रमाकांत शेटे या स्वयंसेवकांची ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ या राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबीरासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.
          

हे शिबीर २४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत शेंदूरणी, ता -जामनेर येथे संपन्न सुरु आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने १४ स्वयंसेवकांचा संघ पाठविण्यात आला आहे. सदर संघात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथील  स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि चि.ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची निवड महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या वतीने करण्यात आली. सदर निवडीसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  विद्यापीठाच्या  विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ.महावीरसिंग चव्हाण सर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

त्यांच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.  श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय  विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, महासंचालकाच्या सहायक सचिव सौ.सुष्मीता माने, सहसचिव भारत घोगरे, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, आस्थापना प्रमुख डॉ.हरिभाऊ आहेर, डॉ.दिगंबर खर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

तांत्रिक शाखांमधून शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यात एक सक्षम अभियंता व्हावा- सौ. शालिनीतली विखे पाटील. प्रवरा अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यानी बनविलेल्या कारला देशात पहिले क्रमांक.

तामिळनाडू (कोईम्बतूर) येथे पार पडलेल्या देशपातळीवरील ‘गो कार्ट्स झिझाईन चॅलेंज’  स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातीच्या  मेकॅनिकल विभागातील मिळाला असल्याचे सांगताना देशभरातुन सहभागी झालेल्या  सुमारे १५० टीम  बरोबर स्पर्धाकरताना मिळालेला प्रथम क्रमांक हा प्रवरेला मिळालेला मोठा बहुमान असल्याचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले. 

नुकत्याच १० ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधी मध्ये तामिळनाडू करी  मोटार स्पिडवे येथे पार पडलेल्या ‘गो कार्ट्स झिझाईन चॅलेंज’ या स्पर्धेत देशभरातील सुमारे ३० संघ सहभागी झाले होते. प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. राजेंद्र  खर्डे,प्रा. पद्माकर कडबूके प्रा. निलेश मनकर  यांच्या मार्गदर्शनाखाली  कॅप्टन प्रदयुमन  घोरपडे,व्हाईस कॅप्टन वैभव सोनावणे, चालक लॉरेन्स बनसोडे,सोमेश ठोंबरे,ऋषिकेश वाघचौरे,प्रितेश पाटील,विकास घोडेराव,प्रसाद बनसोडे.आशिष तुपे, नरेश कदम,सुयोग टिळेकर,सलमान घोणे,कु. अस्विनी मंडलिक,कु. अदिती जगदाळे,मुकुंद मरकड सत्यम भांगे,प्रणित बांगर,राहुल धनवटे,शुभम शेळके,जय, अकोलकर,निवास मुक्ते, हितेश शिंगले,प्रतीक पाटील, प्रीतम सिनारे,प्रसाद गायकवाड,संकेत गुंजाळ,निखिल गडादे अक्षय गाडेकर या मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील उत्साही आणि मेहनती विद्यार्थ्यांनी हि कर बनवली आहे. या साठी सुमारे १ लाख ५० हजार इतका खर्च आलेला आहे.

प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने म्हणाले कि, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार  या पूर्वीही  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल ठरली होती.  तसेच  हैद्राबाद येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या मानाच्या देशपातळीवरील स्पर्धेत या कार्ल बहुमान मिळाला होता असे सांगितले.

चौकट:  प्रवरेतील तांत्रिक शाखांमधून शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यात एक सक्षम अभियंता व्हावा यासाठी संस्थेचा नेहमीच प्रयन्त असतो असे सांगताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणाऱ्या प्राध्यापक आणि सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सौ. शालिनीतली विखे पाटील यांनी अभिनंदन केले.

प्रवरेच्या विद्यार्थिनीची समर फेलोशिपसाठी मैसूर येथे निवड.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. भावना बापू शिंदे हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उन्हाळी संशोधन फेलोशिप -२०२० योजनेअंतर्गत मैसूर येथील सेंट्रल फूड टेकनोलॉजिकल इन्स्टिट्यूट मैसूर, बँगलोर येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी कु. भावना शिंदे या विद्यार्थिनीला प्रति महिना दहा हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ फुड सायन्स येथील वैज्ञानिक डॉ. नांनजप्पा गणेश यांचे तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील व प्रथम वर्षांपासून महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका योजनेत काम करून शिक्षण घेणारी कु. भावना शिंदेच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीला  प्रा. स्वरांजली गाढे, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. अमोल सावंत, प्रा. प्रविण गायकर, प्रा. श्रद्धा रणपिसे व प्रा. मिनल शेळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कु. भावना  शिंदे या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, विश्वस्त श्री. आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहायक सचिव सौ. सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना प्रमुख डॉ. दिगंबर खर्डे, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. धनंजय आहेर, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळावा (सुवर्ण चतुष्कोण)

साठच्या दशकातील स्वात्रंत्र्याच्या उंबरठ्यावर पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम प्रवरा परिसरातील बेचाळीस गावाच्या  शेतकरी,शेतमजूर आणि समाजजीवनासाठी क्रांतिकारक ठरले. म्हणूनच, आज या परिसरातील सुमारे ७० तरुण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात काम करीत असल्याचे सांगताना. आज देशपातळीवर सेंद्रिय शेती उत्पादनाला महत्व दिले जात असल्याने शेती करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पायरेन्स संस्थेचे डायरेक्टर डॉ.बी.बी दास यांनी केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) डॉ दास बोलत होते.या प्रसंगी कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, पालक आणि भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,विलास पासले, नंदकुमार चौधरी.सिध्दार्थ निकम आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात  पालक व शिक्षकामध्ये सवांद व्हावा, विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्वेषाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती  पालकांना देण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा आणि प्रक्षेत्राला भेटी देऊन उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली.

डॉ. दास म्हणाले कि,प्रवरेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जागतिक स्पर्ध्येमध्ये सुलभ सहभाग घेता यावा या साठी प्रत्येक विद्यार्थ्याला  पुस्तकी ज्ञान देतानाच व्यवहारिक ज्ञानाची जोड आणि जागतिक पातळीवर जलद गतीने होणाऱ्या  बदलांची माहिती करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम नेहमीच राबविले जात असल्याचे सांगताना प्रवरेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असल्याचे ते म्हणाले. 
     

या वेळी काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी दिलीप बारी यांनी विद्यार्थी हे पालकांपासून दूर असून केवळ शिक्षकांवरच अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अडचणी समजावून घेऊन त्या सोडविल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सिद्धार्थ निकम यांनी परिस्थितीनेच माणूस घडत असल्याचे सांगून परिस्थिती मुळे शिक्षणापासून  वंचित राहू नये यासाठी प्रवरा शैक्षणिक संकुलात राबविण्यात येणाऱ्या कमवा आणि शिका योजनेचे कौतुक करताना.गरीब कुटुंबातील मुलं-मुली काम करून शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तर, प्रवरेत विद्यार्थी घडविण्याचे काम होत असल्याचे नंदकुमार चौधरी म्हणाले. पायरेन्स संस्थेच्या सेमिनार हॉल मध्ये झालेल्या  या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संखेने उपस्थित होते,शेवटी क्रीडा संचालक प्रा. सिताराम वरखड यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन:- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) मार्गदर्शन करताना पायरेन्सचे संचालक डॉ. बी. बी दास, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर,  भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,विलास पासले, नंदकुमार चौधरी.सिध्दार्थ निकम आदी.

शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी मार्गदर्शन मिळेल – सौ. शालिनीताई विखे

कल्पकतेला महत्व देणारा पेटंट जगभर कायद्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असून ग्रामीण भागातील शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी विश्वासार्ह मार्गदर्शन मिळेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील   (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य,अर्थशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पेटंट भरणे: प्रक्रिया व कायदेशीर पैलू” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.शालिनीताई विखे बोलत होत्या.महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोनई (नेवासा) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस. एल. लावरे,पुणे येथील  इंडिअन पेटंट एजंट. श्रीमती आशा गुरुळे. अकोले येथील अगस्ती महाविद्यलयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.एस. जी. वावले, आदी मान्यवर उपस्थित होते.   या वेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थी सुविधा केंद्राचे व पोस्टर प्रेसेंटेशनचे उद्घाटन करण्यात आले.

सौ विखे म्हणाल्याकी,  आज ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी पेटंट बद्दल माहिती मिळविणे व स्वतः पेटंटची नोंदणी करणे फार गरजेचे आहे. आजची कार्यशाळा त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, कारण त्यांच्याकडे पेटंट कायद्यानुसार लागणारी बुद्धीमत्ता ही  कला आहे. पण त्याची नोंदणी कशी करावी  व बौद्धिक हक्क कसा  संपादन करावा याची  माहिती त्यांना मिळणार आहे .त्यामुळे ते आपली  शेती उत्पादने व फळावर प्रक्रिया करून आपली पेटंट नोंदणी करू शकतात . ग्रामीण भागात नवीन व्यवसाय करून रोजगार निर्माण करू शकतात.हे सांगून परिसरात बचत गटाच्या माध्यमातून कोणकोणते नवीन व्यवसाय यशस्वीपणे सुरु आहेत ते सांगितले आणि  हेच  पदमश्री व पद्मभूषण विखे पाटील यांचे स्वप्न आहे व ते आपले विद्यार्थीदेखील पेटंट नोंदणी करून पूर्ण करतील असा मला विश्वास सौ.शालिनीताई विखे पाटील यांनीव्यक्त केला.

उपस्थित मार्गदर्शकांनी पेटंट म्हणजे काय,त्याचा इतिहास ,भारतातील पेटंट कायदा ,कोणत्या बाबी पेटंट मध्ये येत नाहीत, कायद्यानुसार झालेल्या नवीन दुरुस्त्या ,पेटंट मिळवण्याची पद्धती ,पेटंटचा कालावधी,शोधकर्त्याला त्याचे मिळणारे फायदे व त्याच्या अधिकारावरील मर्यादा इ. बाबी प्रश्नउत्तराच्या मार्गाने शंकांचे निरसन करून सांगितल्या

सदर कार्यक्रमासाठी डॉ.सोमनाथ घोलप, प्रा.दिनकर घाणे, श्री महेंद्र तांबे  कार्यालय अधीक्षक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक यांनी परिश्रम घेतले,सदर कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी  ,विद्यार्थिनी बहुसंख्येने हजर होते .सूत्रसंचालन डॉ.अनंत केदारे आणि प्रा.सुसर यांनी तर उपप्राचार्य प्रा.दिपक घोलप यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन:- सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य,अर्थशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पेटंट भरणे: प्रक्रिया व कायदेशीर पैलू” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ.शालिनीताई विखे ,सोनई (नेवासा) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस. एल. लावरे,पुणे येथील  इंडिअन पेटंट एजंट. श्रीमती आशा गुरुळे. अकोले येथील अगस्ती महाविद्यलयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.एस. जी. वावले,महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर आदी.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ए.आय.सी.टी.ई.न्यू दिल्ली यांच्या सहकार्याने एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण.

भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारा सुरु असलेल्या एस.टी. व एस. सी. स्कील डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रासाठी विविध कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचा चांगला उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळविण्या करिता होणार असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.

लोणी येथील  प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम  आयोजित करण्यात आला होता. या वेळी  पुणे येथील  प्रशिक्षण ट्रेनिंग हे इम्पॅक्टचे प्रशिक्षक  श्री. पंकज मित्तल तसेच नाशिक येथील फ्लाय हाय अप्टिट्यूड् ट्रेनिंग सर्विसेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओंकार जगदाळे,पूजा सनार, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर प्रा. अब्दुल हमीद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षणाअंतर्गत  विद्यार्थांना कम्युनिकेशन स्कील, रिझ्युम रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्याच्या  मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन व  ऍप्टिट्यूड  टेस्ट अश्या विविध प्रकारच्या गोष्टींचे कौशल्य प्राप्त करून देण्यात आले.त्याचा उपयोग रोजगाराच्या नवीन संधीकरिता होणार आहे.असल्याचे  प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले तसेच  यापूर्वीही अशापद्धतीचा पंधरा दिवसांचे  प्रशिक्षण  सीयु-सकसिड संस्थेकडून सर्व विभागांच्या विभागप्रमुखांच्या साहाय्याने  घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रा. निलेश कापसे, प्रा. लक्ष्मण लहामगे, प्रा. सचिन अनाप, प्रा. स्वप्निल बंगाळ ,प्रा. दिबा आफ्रीन अन्सारी, प्रा. अर्चना पवार यांनी परिश्रम घेतले.

गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन

गुणवत्ता असून देखील केवळ योग्य सादरीकरण करता येत नसल्याने ग्रामीण भागातील मुलीना अपेक्षित ध्येयप्राप्त करण्यास अडचणी येतात असे सांगताना,विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि अवगत कलागुणांचा विकास करणाऱ्या विविध सुविधा प्रवरे मध्ये ऊपलब्ध आहेत. या सुधींचा उपयोग  करून मुलींनी चंद्राला गवसणी घालण्याचे लक्ष ठेवले तर, तारे तरी नक्कीच हाती लागतील असे प्रतिपादन अमळनेर येथील प्रताप ऑटोनॉमस महाविद्यालयातील प्राध्यपिका सौ. मोनाली परजणे-पाटील यांनी केले.

लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून  सौ. मोनाली परजणे-पाटील बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या या समारंभासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर,प्रवरा गर्ल्स एजुकेशन कॅम्पसच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडिया स्कुलच्या प्राचार्या सौ. संगिता देवकर, प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्य सौ.भारती कुमकर, गृहविज्ञान विभागप्रमुख सौ. कांचन देशमुख,संगणकशास्र विभागप्रमुख सौ. राजश्री नेहे-तांबे, महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. रेखिता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी प्रास्ताविक तर, उपप्राचार्या सौ. अनुश्री खैरे-दुबे यांनी वार्षिक शैक्षणिक प्रगतीच्या अहवालाचे वाचन केले. तसेच प्रा. अर्चना घोगरे यांनी शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि प्रा. डॉ. उत्तम अनाप क्रीडा क्षेत्रामध्ये तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींच्या नावाची घोषणा केली. संगणक विभागातील कु. कोमल मेधने आणि  गृहविज्ञान विभागातील कु. उमा खरे या विद्यार्थनींना या वर्षीच्या आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.

सौ. शालिनीताई विखे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि,विद्यार्थिनींमध्ये जीवनाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून होत असल्यानेच आज अनेक विद्यार्थीदेश विदेशात महत्वाच्या क्षेत्रामध्ये उत्क्रुष्ट काम करीत आहेत असे सांगताना, गृहविज्ञान विभागामध्ये अनेक संधी असून, द्रुष्टी असेल त्या प्रमाणे सृष्टी दिसत असल्याने विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेताना,ज्ञान मिळविण्यासाठी हट्ट धरावा असे आवाहन त्यांनी केले. शेवटी प्रा. जया डबरासे यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन ;- लोणी येथे गृहविज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी  जि प माजी अध्यक्षा ना शालिनीताई विखे पाटील,माजी विद्यार्थ्यांनी मोनाली कृष्णराव परजणे पाटील अमळनेर,प्रवरा अभिमत विद्यपीठाचे कुलगुरू डॉ जयराज,प्रा डॉ हरिभाऊ आहेर,प्राचार्य डॉ शशिकांत कुचेकर,उपप्राचार्य डॉ अनुश्री खैरे,संचालिका,लीलावती सरोदे,संगीता देवकर.

डॉ. राठी यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार जाहीर

हैद्राबाद येथील नामांकित ईलेट्स टेक्नोमिडीया या संस्थेतर्फे या वर्षीचा आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील डॉ. विजयकुमार राठी यांना जाहीर झाला आहे. हैद्राबाद येथे 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक शिक्षण परिषदेत डॉ. राठी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रकी महाविद्यालयात 31 वर्षांपासून डॉ. राठी हे स्थापत्यशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून सेवेत आहेत. त्यांनी 2018 साली एसव्हीएनआयटी, सुरत येथील विद्यापीठात नॅनो मटेरीयल ईन कॉंक्रीट या विषयात पीएच.डी. पुर्ण केली. देश व विदेश पातळीवर त्यांचे 52 शोधनिबंध प्रसिध्द केले आहेत. उच्च शिक्षणाकरिता (एम.ई.) 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्याना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयात डॉ. राठी यांनी व्याख्याता, विभागप्रमुख, उपप्राचार्य व तांत्रिक संचालक, प्राचार्य अशा अनेक पदावंर काम केले आहे.

शिक्षक गौरव पुरस्कार अंतर्गत त्यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने, प्राचार्य प्रा. दशरथ मगर, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड.

शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील ३१ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.

यामध्ये सृजन बायोटेक निफाड, नाशिक मध्ये चामवड पंढरीनाथ, हिवारे वैभव, मांटे विशाल, अगवान मुकुंद, सोनवणे चंदन, चौधरी अभिजित, खेडेकर प्रदीप, भालेराव प्रकाश, भिडे हरीश तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर मध्ये शिंदे शुभम, भोसके सौरभ, शिंदे मेघराज, मिटकॉन बायोफर्मा सेंटर, पुणे मध्ये कु.भवारी हर्षदा, कु.भोसले पूजा, राज्य स्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र म.फु.कृ.वि, राहुरी मध्ये कलांगडे महेश, खंडागळे विकास,थोरात बाबासाहेब,बरबडे शुभम,कु.आंधळे मोनिका तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये वाघमारे मयुरी, बागले अस्मिता, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे मध्ये यंदे प्रेषिता, खरसे शितल, जगताप मृणाली, जाधव मैथिली, अभंग प्रतीक्षा, राख शुभम. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे मध्ये बोरसे श्रद्धा. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी गोरे पल्लवी, प. डॉ. वि. पा. सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर,
चोपडे संकेत आणि सौरभ केदार, जैवतंत्रज्ञान विभाग, डॉ. एम. पी. एस. कॉलेज, आग्रा, दिल्ली अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हे सर्व विद्यार्थी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समितीस मांडणार आहेत. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान घेऊन शिकता येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात हा कार्यानुभव उपयोगी पडणार आहे सहा. समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री  आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, महासंचालकांच्या कार्यकारी सहायक सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण व आस्थापना संचालक प्रा.. दिगंबर खर्डे, डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. विजय आहेर, प्रा. धनंजय आहेर,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस व प्राचार्य ऋषिकेश औताडे, तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, प्रा. अमोल सावंत, प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.