लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी दीपिका संजय शिंगवी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्राथमिक पासून तर इयत्ता दहावी पर्यंत दीपिकाचे शिक्षण या विद्यालयामध्ये झाल. सुरुवातीपासूनच विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक टिकवला. इयत्ता अकरावीपासूनच चार्टर्ड अकाउंटंट स्पर्धा परीक्षेची तयारी तिने सुरू केली होती. चार्टर्ड अकाउंटंट ची स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी तिने कोल्हार येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रवरा अभ्यासिके मध्ये प्रवेश घेतला.आपल्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तिने यश मिळविले. आई-वडील आणि शिक्षक त्यांच्याबरोबरच माझ्या या यशामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केलेल्या या प्रवरा अभ्यासिकेचा खूप मोठा वाटा असल्याचे दीपिका ने सांगितले.
प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची टिसीएस या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड
लोकनेते पदमभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथील अनुक्रमे एम. फ़ार्म अभ्यासक्रमातील एक आणि बी . फार्मसी अभ्यासक्रमातील पाच अशा एकूण सहि विद्यार्थ्याची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टिसीएस )या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाली . एम. फार्मसी मधून कु. आरती घोरपडे हिची पुणे येथे वार्षिक वेतन पाच लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली तर बी. फार्मसी मधून अनुक्रमे अनिकेत गाडेकर, रोहित नागरे, मोईन शेख, स्वप्नील पिंपळे आणि दिशा खंडागळे यांची वार्षिक वेतन तीन लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली. औषधनिर्माणशास्रमध्ये अतिशय महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स या विभागामध्ये प्रवरा फार्मसीच्या सहा विद्यार्थ्यांची निवड होणे म्हणजे महाविद्यलयाच्या दृष्टीने विशेष बाब आहे. महाविद्यालयाने मुलाखती पूर्वी आयोजित केलेल्या सॉफ्ट स्किल ट्रैनिंग कार्यक्रमाचा फायदा या विद्यार्थ्यांना या नोकरीसाठी झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. अंतिम परीक्षेपूर्वी नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. प्रवरा हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच अग्रभागी असते.महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षणआयोजित केले जाते.
युवकांनी आधुनिक शेतीचे नवे तंत्रज्ञान समजून घेत शेतीतून चांगले करीअर करावे विखे पाटील महाविद्यालयात आधुनिक शेती आणि युवक राज्यस्तरीय पाच दिवसीय शिबिर
युवकांनी आधुनिक शेतीचे नवे तंत्रज्ञान समजून घेत शेतीतूनही चांगले करीअर करता येऊ शकते. जे आपण पिकवितो ते आपल्याला विकता आले पाहीजे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या आधुनिक शेती आणि युवक या राज्यस्तरीय शिबीराच्या माध्यमातून मिळणा-या ज्ञानाचा उपयोग करुन कृषि उद्योजक व्हावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आधुनिक शेती आणि युवक या अंतर्गत शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा भाग्यविधाता या अंतर्गत पाच दिवसीय शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतांञिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, कॅम्पचे संचालक डॉ. राम पवार,कार्यक्रम समन्वयक डॉ बाळासाहेब मुंढे, उपप्राचार्य डॉ. बी. डी. रणपिसे, डॉ. ए. एस. वाबळे, डॉ. सी. एस. गलांडे आदीसह राज्यभरातून १६ विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शैलेश देशमुख म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषि धोरणामुळे आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, समूह शेतीला प्रोत्साहन दिले जाते. शेतीक्षेत्रात तरुणांना मोठी संधी असून रोजगार संधीही मोठी आहे. शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
नगरच्या महासंस्कृती महोत्सवात प्रवरेच्या कृषी आणि कृषी संलग्नित महाविद्यालयाचा सहभाग
अहमदनगर येथे पार पडलेल्या महासंस्कृती आणि कृषी महोत्सवात लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाने सहभाग घेतला. यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या उद्यान विद्या विभागाने वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांची , फळझाडांची तसेच औषधी वनस्पतींची विक्री करण्याचा प्रयत्न केला.त्याच बरोबर दुग्धशास्त्र विभागाने सुमारे दहा ते बारा प्रकारच्या वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, पेढा ,खवा, व्हे ड्रिंक , लस्सी, मठ्ठा, गुलाबजाम इ . पदार्थांची तसेच कीटक शास्त्र विभागाने जैविक कीटकनाशके आणि सेंद्रिय खते यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या उती संवर्धनाचे रोपे, अळंबी उत्पादने विक्रीचा प्रयत्न केला .यावेळी अंतिम वर्षातील विद्यार्थी ज्ञानेश्वर थोरात , नेताजी शिंदे , हर्षद हांगे , पल्लवी शिंदे , चेतना जाधव, प्रशांत कोल्हे , सूरज घोलप ,सचिन दाभाडे औदुंबर झिंजूकेॅ, शुभम मोहिजे यांनी सहभाग नोंदवला.
चिचोंलीच्या प्रवरा फार्मसी महिला कॉलेजच्या दहा विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेज (महिला) चिंचोली (ता. सिन्नर) येथील अंतिम वर्ष पदवी आणि एम. फार्मसीच्या दहा विद्यार्थिनींची विविध नामांकीत कंपन्यामध्ये निवड झाली. महाविद्यालयामार्फत स्वतंञ प्लेसमेंट सेल कार्यरत या अंतर्गत वेनश्योर फार्मास्युटिकल,मुंबई,टाटा कसल्टेसी,पुणे आणि जेनोन बायोटेक सिन्नर या कंपनीच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये रिया टकले, तनवी वाटपाडे,. प्रियंका बोबडे,निकिता महापुरे, वर्षा पांगळे, सेजल म्हसे, जागृती सोनवणे, सोनल गोंदकर,आदिती जोशी, हर्षदा गुरगुडे यांची कंपनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये चांगल्या वेतनावर निवड झालेली आहे.सदर मुलींमध्ये काही विद्यार्थिनी चतुर्थ वर्षाच्या असून त्यांना लगेचच रुजू होण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे.
प्रवरेची कावेरी संसारेची शूटिंग हॉलीबॉल वर्ल्ड कपसाठी निवड
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या एफ. वाय. बी.ए या वर्गातील विद्यार्थिनी कु. कावेरी बाळासाहेब संसारे या विद्यार्थिनीची शूटिंग हॉलीबॉल वर्ल्ड कप साठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. या स्पर्धा दिल्ली येथे होणार आहे. सदर वर्ल्डकप स्पर्धा यावर्षीपासूनच सुरू झालेली आहे. यामध्ये भारत ,पाकिस्तान ,बांगलादेश, नेपाळ, कॅनडा, न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया ,अफगाणिस्तान यासारखे १९ देश सहभागी आहेत. या विद्यार्थिनीने यापूर्वी जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कु.संसारे हिने यापूर्वी ४१ वी जूनियर नॅशनल शूटिंग बॉल चॅम्पियन २०२३ सवाई मानसिंग स्टेडियम ,जयपुर (राजस्थान) येथे सहभाग घेतला होता.तसेच आतापर्यंत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. प्रवेरच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षणांसोबतचं संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेळासही महत्व दिले आहे शिवाय प्रत्येक शाळा महाविद्यालय क्रिडागंण प्रशिक्षिकत क्रिडा अधिकारी,खेळाचे साहीत्य त्याचबरोबर राज्य पातळी आणि देश पातळीवर पोहचण्यासाठी खेळाडूला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
कृषी पदवीधारकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी हितासाठी करावा
कृषी शिक्षण घेत असतांना कृषी पदवीधर हे कृषी संबंधित आधुनिक ज्ञान प्राप्त करत असतात. हे ज्ञान भविष्यात त्यांनी शेतकरी हितासाठी वापरावे व त्यामधून शेतकऱ्यांना मदत व्हावी असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि संलग्नीत महाविद्यालयाच्या कृषितरंग २०२४ निमित्त आयोजित सांस्कृतिक आणि वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात सौ.शालीनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषिभूषण ग्रोव्हर कंपनी, नाशिक चे चेअरमन भूषण निकम , गेन अकॅडमीचे संतोष वाघमारे,संस्थेचे संचालक श्री.शिवाजीराव जोंधळे,सहसचिव भारत घोगरे, डॉ.उत्तमराव कदम, कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल बेंद्रे,माजी विद्यार्थी भाऊसाहेब पवार, तुषार गोंदकर, प्रगती इंगळे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात श्री.भूषण निकम यांनी कृषि पदवीधरांना सध्या कृषी आधारितअनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या अनेक योजना त्याला पाठबळ देत आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन केले तसेच श्री.शिवाजीराव जोंधळे यांनी विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील बदलांचा स्वीकार करून त्यात कारकीर्द करावी असे मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांनी प्रास्ताविकांत कृषि संलग्नित महाविद्यालयांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल पाटील, कृषी महाविद्यालयाचा ऋतिका अनाप तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा अहवाल धिरज कळमकर यांनी सादर केला. यावेळी क्रिडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय सादरीकरण केलेल्या कृषी महाविद्यालय,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले तर कृषी महाविद्यालयास उपविजेते पद प्राप्त झाले.
प्रवरा आर्किटेक्चरच्या प्रविण फेरंग याची गडचिरोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड…
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोणी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक प्रविण फेरंग या विद्यार्थ्याची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
सदर शिबिरासाठी पुणे विद्यापीठातून रसेयो विभागाचे पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन जिल्ह्यातून एकूण पंचाहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. त्यापैकी पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनी नगर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये आपल्या ग्रामीण भागातून अशा शिबिरासाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय बारामती येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय लोणी येथील संघाने एकूण ३६ गुणांची कमाई करून सर्वसाधारण उपविजेतेपद तर कृषी महाविद्यालय पुणे संघाने ३७ गुण मिळवत विजेतेपद पटकाविले माहिती कृषी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयातील खेळाडू गौरव शिंदे यास सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत गौरव शिंदे यांनी १०० मी धावणे व उंच उडी मध्ये सुवर्णपदक मिळवले. संजीवनी पावरा हीस १०० व २०० मीटर धावणे या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले तर प्रसाद नलावडे, तेजस साखरे, गौरव ठाकरे यांनी अनुक्रमे १००, २०० व ४०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकाविले तर पुष्कराज पवार याने थाळीफेक या स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळाले.तसेच महाविद्यालयाच्या मुलांच्या रिले संघामध्ये ४ x १०० मी रिलेमध्ये सुवर्णपदक तर ४ x ४०० मध्ये रोप्य पदक मिळविले.
प्रवरा ग्रामीण अभियांञिकी महाविद्यालयातील “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी” विभागाच्या पाच विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड…
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ” विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांची इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक व जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या बहुराष्ट्रीय कंपण्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून ५.६० लाखांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
यामध्ये प्राजक्ता मोटे, भैरवी राऊत, निरंजना कडू आणि ऋषिकेश मोरे या विद्यार्थ्यांची ‘इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक’ आणि अभिषेक घोरपडे या विद्यार्थ्याची ‘जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या कंपन्यांमध्ये निवड झाली. तसेच ते म्हणाले, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले जाते.यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट,ऍप्टीट्युड टेस्ट, सॉफ्टवेअर व स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, एंटरप्रीन्यूअरशिप इंटरनॅशनल प्रोग्रॅम, करियर गायडन्स, सराव मुलाखत इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे.
प्रवरेच्या गृहविज्ञान आणि संगणकशास्ञ महाविद्यालयातील निकिता जवरे यांची निवड…
लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ,लोणी या संस्थेतील गृहविज्ञान आणि संगणकशास्त्र महिला महाविद्यालय, लोणी येथील संगणकशास्त्र या शाखेतील विद्यार्थिनी कु .निकिता बाळासाहेब जवरे हिची स्पायजेट लिमिटेड,हरियाना,दिल्ली या विमान क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये दिल्ली येथे निवड झाली .
प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी शाळेचा मुलींचा हॉकी संघ राज्यपातळीवर करणार पुणे विभागाचे नेतृत्व
कोळपेवाडी ता.कोपरगाव येथे झालेल्या विभागीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर चा १९ वर्ष वयोगटाचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सेमीफाइनल स्पर्धा प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी विरुद्ध (अहमदनगर ग्रामीण) , पुणे ग्रामीण (बारामती) यांच्यात झाली. या सामन्यात प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या खेळाडूंनी २-० गोलने पुणे ग्रामीणचा पराभव करून संघ फायनल ( अंतिम ) स्पर्धेसाठी पात्र ठरला. फायनल स्पर्धा प्रवरा कन्या विद्या मंदिर विरुद्ध पुणे शहर यांच्यात झाली. यात प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या संघाने पुणे शहर संघाचा ३-० गोलने दणदणीत पराभव करत विजय प्राप्त केला.या संघामध्ये कु.हर्षदा कुरूमकर, कु. कोमल चौधरी , कु. स्नेहा खंडागळे , कु. वैष्णवी काळाने, कु.पूनम गंधाक्षे ,कु. समीक्षा लगड , कु. आर्या शिंदे, कु. श्रुती फलके, कु. श्रेया काजळे, कु. ज्ञानेश्वरी गुट्टे ,कु. श्रावणी आमटे,कु.काव्या चव्हाण ,कु. तनिक्षा शिशोदीया, कु. राधेश्वरी वसावे,कु.संस्कृती लोहगळे, कु.वैष्णवी गुठे ,कु. वैष्णवी घोडके या विद्यार्थ्यीनींच्या संघाने सहभाग घेतला होता
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदीर शाळेचा संघाची निवड झाली आहे.