लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे केडेट्स आणि विद्यार्थ्यांनी प्रथम गावामधून वृक्ष दिंडी आयोजित केली. या कार्यक्रमाचे उदघाटन लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचेजल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी आस्थापना संचालक डॉ हरिभाऊ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे १३५ स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे८५ केडेट्स यांनी सहभाग घेतला. वृक्ष दिंडीनंतर जनजागृती अंतर्गत पर्यावरणशास्र विभागाचे प्रमुख डॉ. गोरक्षनाथ पोंधे यांनी मार्गदर्शन केले. या नंतर झालेल्या परिसंवादात स्वयंसेवक आणि कॅडेट्स यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ डी. एस तांबे,यांनी प्रास्तविक केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले . महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
फोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे , उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे, डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख डॉ. गोरक्षनाथ पोंधे, डॉ डी. एस तांबे, डॉ. राजेंद्र पवार आदी..
प्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा
युवकांच्या हाताला काम मिळावे या साठी विशेष कौशल्याचे प्रशिक्षण- प्रा. धनंजय आहेर.
भविष्यातील रोजगार संधी ओळखून तरुणांमधील उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी प्रवरेतील विविध महाविद्यालयांमधील प्रत्येक युवक-युवतींना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळावे या साठी विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रवरा कौश्यल्य विकास विभागाचे संचालक प्रा धनंजय आहेर यांनी दिली.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा करण्यात आला. प्रा. धनंजय आहेर बोलत होते. या प्रसंगी प्रा. ए.एच. अन्सारी सर, शैलेश कुलधरण व संस्थेचे विविध शाखेतील सर्व समन्वयक उपस्थित होते .या वेळी प्रा. आहेर यांनी कौशल्य काळाची कशी गरज आहे व ते विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कशी पोहचेल या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच. प्रा. अन्सारी यांनी कौशल्य विकास मध्ये असणारे विविध योजना बद्दल माहिती सांगून त्या योजनेचे फायदे सांगितले.व सर्वाना कौशल्य विकास दिनाच्या शुभेच्या दिल्या
प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणीच्या ९ विद्यार्थांची नामांकीत कृषी कंपन्यामध्ये निवड
प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणी महाविद्यालयात झालेल्या बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनी चे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले यामध्ये कृषी तंत्रनिकेतन च्या पाच विद्यार्थ्यांचे फिल्ड ऑफिसर या पदावर नोकरीसाठी निवड झाली तसेच च्यार विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
यासाठी प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर.आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,संचालक कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालये डॉ.मधुकर खेतमाळस,विद्यालयाच्या प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिंनदन केले.
फोटो कॅप्शन :- प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये आणि च्यार विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. त्यांच्या समवेत डॉ.मधुकर खेतमाळस, प्रा. धनंजय आहेर,प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड,प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर आदी …
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी निवड
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना क्रिडा मार्गदर्शक प्रा. खुरंगे ,प्रा. सुनिल गागरे, सुनिल आहेर सर, भाऊसाहेब बेंद्रे सर,हनुमंत गिरी आदी .
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉक कार्यक्रमात स्टुडन्ट पार्टनर द्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमवण्याची विद्यार्थ्यांना संधी- इंटरशालाचा उपक्रम
प्रोत्साहितया संस्थेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी काम उपलब्ध करून देताना विशिष्ठ मोबदल्या बरोबरच अनुभव प्राप्त केलेल्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “इंटर्नशीप टॉक” द्वारे जुनिअर विद्यार्थ्यांना इंटर्नशालाची इंटर्नशीप करण्याबाबत प्रोत्साहित केले.
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून महाविद्यालयात इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय आहेर याने केले.
इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर विक्रमसिंह पासले,भालेराव, मेघना गुरव व प्रशांत बटुळे यांनी अतिशय सुलभपणे समजावून सांगितले.या विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती.त्याचाच एक भाग म्हणून या इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते.आदित्य जोंधळे याने आभार व्यक्त केले.
फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या विक्रमसिंह पासले,कु. ऋतुजा भालेराव, कु. मेघना गुरव व प्रशांत बटुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना .सोबत शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे आणि विद्यार्थी.
महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
महिलांचे संरक्षण आणि स्वाभिमानासाठी काम करीत असलेले राज्य महिला आयोग आता प्रज्वला योजनेच्या माध्यमातून महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आले असून, बचत गटातील महिलांना नियोजनबद्ध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन, स्थानिक संसाधनांच्या उपलब्धते नुसार जिल्हा निहाय उद्योग-व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण करून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे सांगताना, महिलांच्या उत्थानामध्ये अग्रेसर असलेल्या प्रवरा परिसर आणि साईंची पुण्यभुमी असलेला अहमदनगर जिल्हा बचतगटांच्या उत्पादित मालाला व्यापक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रज्वला योजनेअंतर्गत.जनसेवा फाउंडेशन आणि राहता तालुका पंचायत समितीयांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात बचतगटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर बोलत होत्या. या प्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, सभापती सौ. हिराताई कातोरे, उपसभापती बबलू म्हस्के, प.स सदस्य संतोष ब्राम्हणे,उमेश जपे, सुवर्ण तेलोरे, सौ. मनीसध्दा आहेर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचे सह पंच्यात समितीचे सदस्य ,विविध गावचे सरपंच, महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थत होत्या. शामकुमार कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अडव्होकेट स्मिता देशमुख यांनी महिला संरक्षणाच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले तर, मंजुषा धिवर यांनी हि मार्गदर्शन केले.
विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या कि, जेथे महिला राहतात तेथे साक्षात देव वास करतो असे म्हटले जाते इतका सन्मान महिलांना मिळतो. असे असले तरी महिलांच्या अनेक समस्या असतात. आणि त्या समस्याची सहसा वाच्यता माहेर सोडून कुठे केली जात नाही. राज्य महिला अयोग्य हे महिलांचे दुसरे माहेरचं असून, महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. परनु त्याची माहिती महिलांना नसते . हेच काम महिला आयोगामार्फत केले जात असून आता प्रज्वला योजनेंतर्गत सरकारच्या महिलांच्या उत्थानासाठी असलेल्या योजनांच्या माध्यमातून या योजनेतून बचत गटातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने केले जाईल. राज्यभरात ही योजना राबविताना जिल्ह्यातील स्थानिक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन उद्योग व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण केले जातील. प्रज्वला बाजारच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे त्या म्हणाल्या .
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या . सूत्रसंचालन दिनेश भाने यांनी केले.
चौकट :- सौ. धनश्रीताई विखे :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून मोट्या प्रमाणावर जिल्ह्यातील महिलांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले असून , ना विखे पाटील यांच्या माध्यमातून राज्यातील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रातील महिलांसाठी असलेल्या योजना राबविण्याचे काम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविताना महिलांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी निर्माण केली जाईल असे सौ. धनश्रीताई विखे यांनी सांगितले सांगितले.
फोटो कॅप्शन :- प्रवरानगर येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती आयोजित महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनें अंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्रीताई विखे पाटील, प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे।सरपंच मनीषा आहेर
प्रवरा अभियांत्रिकी मध्ये शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य नोकरी भरती मेळावा.
मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी पदवीधरांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे – प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने
लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन, चाळीसपेक्षा जास्त नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधरांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.आहे.
या मेगा नोकर भरतीसाठी व्हिआरडिई, इपिटोम, इटॉन टेक्नॉलॉजी,सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज,सिद्धि फोर्ज ,ओमेपूल टेक्नॉलॉजी, महिंद्रा केप्लास्ट, होल्मकेके, व्हेरॉक इंजिनिअरींग, इके इलेक्ट्रॉनिक्स, बर्खार्ड कॉम्प्रेशन,एल अॅण्ड टी, एन एन नागा, यासारख्या चाळीसहून अधिक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय अशा कंपन्या सहभागी होणार आहेत. या बाबत अधिक माहीती देताना व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले कि, हा भरती मेळावा कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेगा नोकरी भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखतीसाठी समक्ष हजर रहाणे आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/Ri5fb3V7xDttfHTm8 या लिंकचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदार संघ , प्रवरा परिसर व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदवी घेतलेल्या विदयार्थी -विद्यार्थिंनीना नोकरी मिळावी या साठी या महाभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बोर्ड ऑफ अँप्रेन्टीसशिप ट्रेनिंग (BOAT) पश्चिम विभाग मुंबईचे भारत सरकार यांच्या सहकार्यांनी होत असलेल्या या मेळाव्यासाठो (BOAT) डेप्युटी डायरेक्टर एन. एन. वडोदे उपस्थित राहणार असून या प्रसंगी लार्सन एंड टूब्रोचे जनरल मॅनेजर श्री अरविंद पारगावकर , विखे पाटील पॉलिटेक्निचे माजी विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद डिस्टिलरी वालचंदनगरचे डायरेक्टर श्री कारण यादव ,अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि वारले कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. अनिता गुजर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे तसेच यावर्षी संस्थेतील विविध महाविद्यालयामधील सुमारे १ हजार ६२० विद्यार्थ्यांना निकालीपूर्वी नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.व या पुढेही महाविद्यालय त्यासाठी काम करत राहणार आहे. अशी माहिती प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे स्किल डेव्हलपमेंट व ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी व यशस्वी होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, . खासदार डॉ . सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक संचालक व एसव्हीआयटी सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. के टी व्ही रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रवरा तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. विजयकुमार राठी, डॉ. प्रदीप दिघे, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर, संस्थेचे सर्व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे परिश्रम घेत आहेत.
प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात गुरुपोर्णिमा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकतीच गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या
वतीने महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, यांनी दिली.
या कार्यक्रमास साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे ( पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे , अस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर , शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे , कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतामाळस, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ. अशोक कोल्हे यांनी प्रत्येक स्वयंसेवकाने एक झाड दत्तक घेऊन त्याची जोपासना करण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा संदीप पठारे, प्रा अमोल खडके, प्रा.गणेश लबडे, प्रा.वाल्मिक जंजाळ, प्रा.विक्रम राऊत, प्रा.विशाखा देवकर, प्रा. प्राची शिंदे , प्रा.प्रियांका दिघे,,प्रा.सुदाम वर्पेव सर्व स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शन :-गुरु पोर्णिमेनिमित्त लोणी येथील कृषी महाविद्यालया मध्ये वृक्षारोपण करताना. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे , अस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर , शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे , कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतामाळस, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदी.
गुरु पौर्णिमा साजरी
अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात करून,आपल्या अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करणारी आई हि खरी गुरु असून , जिवनात चांगल्या वाईट गोष्टी शिकविवणारेही आपले गुरूच असून ,आपल्याला जीवनात जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा साजरी केली जाते असे प्रतिपादन बाभळेश्वर येथील सदगुरु नारायनगीरीजी गुरुकुलचे संंस्थापक ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के यांनी केले.
लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल मध्ये गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरु पूजन व व्यास पूजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के बोलत होते. या वेळी सैनिकी स्कुलचे कमांडंट कर्नल डॉ. भारत कुमार यांनी “सबसे बडा गुरु ‘आणि गुरु शिष्य परंपरा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी ह.भ प.अर्जुन महाराज डमाळे , बाबा बागळे ,भास्कर थेटे , संजय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के म्हजनाळे कि, आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि जीवनामध्ये भेटणारा प्रत्येक जण गुरूच असतो असे सांगताना. जी भूमी पवित्र सैनिकांच्या रक्ताने माखली असून आपल्या पोटामध्येनांगर खुपसून अन्न पनुयाची सोया करते त्या धरणी मातेलाही विसरता येणार नाही. म्हणूनच वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचर्ये या न्यायाने पर्यावरणाविषयी प्रबोधन केले . या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मिठाई भरवली .महेश डहा ळके,
फोटो कॅप्शन :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल मध्ये गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरु पूजन व व्यास पूजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के , सैनिकी स्कुलचे कमांडंट कर्नल डॉ. भारत कुमार ,प्राचार्य सुधीर मोरे ह.भ प.अर्जुन महाराज डमाळे , बाबा बागळे आदी.
स्पर्धा परीक्षा पास होणे हे एक तंत्र – नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात
स्पर्धा परीक्षांसाठी घोकंपट्टी करण्यापेक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे अभ्यासाचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, ग्रुप स्टडी, अवांतर वाचन व व्यक्तिमत्व विकास ह्या बाबींचा विद्यार्थ्यांनी अंतर्भाव करायला हवा असा मूलमंत्र नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी दिला.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, पॅक्स समन्वयक डॉ. शैलेश कवडे,प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे उपस्थित होते, प्रास्ताविक कु. मोनिका आंधळे यांनी केले.
प्रशासकीय सेवेतील निवडीचे व कामकाजाचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना डॉ. यशवंत थोरात म्हणाले कि, परीक्षा पास झाल्यानंतरच्या मुलाखतीसाठी सामोरे जाताना समयसूचकता व हजरजबाबीपणा महत्वाचा असतो. मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणाऱ्याच्या हाती जर मुलाखत नियंत्रणाचे तंत्र असेल तोच यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. प्रा. रविंद काकडे यांनी आभार व्यक्त केले.
फोटो कॅप्शन :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या वतीने एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात.समवेत भारत घोगरे, डॉ. अशोक कोल्हे, डॉ. के. टी. व्ही रेड्डी, प्रा. .दिगंबर खर्डे, डॉ. मधुकर खेतमाळस, डॉ. शैलेश कवडे,प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे आदी. छाया..
विविध मंडळाची स्थापना
विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण,व्यक्तिमत्वविकास , भाषिक कौश्यल्य आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विविध बहुआयामी मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगताना, या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठद्वारे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या नवनवीन प्रयोगांना चालना मिळून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्स्वास निर्माण होईल असा विश्वास प्रवरा पब्लिक स्कुलचे संचालक कर्नल डॉ. के जगन्नाथन यांनी व्यक्त केला.
कर्नल डॉ.के जगन्नाथन आणि प्राचार्य सयाराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा पब्लिक स्कुलमध्ये चालू शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मध्ये असलेल्या संशोधकवृत्तीला चालना देण्यासाठी विविध मंडळाची स्थापना करण्यात आली. या उपक्रमा बद्दल माहिती सांगताना कर्नल के जगन्नाथन म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा विकासासाठी “पब्लिक स्पिकिंग व ड्रायम्याटिक क्लब,मराठी नाट्य मंडळ,मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी सायन्स क्लब,माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कौशल्य विकासासाठी,टिंकरिंग क्लब,हस्तकला व शिल्पकला यांच्या धर्तीवर आर्ट-क्राप्ट व पॉटरी क्लब,पक्षी निरीक्षण क्लब,विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी अस्ट्रलॉजी क्लब, संगीताची आवड जोपासण्यासाठीम्युझिक क्लब, गणितीय प्रक्रिया व वैदिक मॅथ्स सजवून घेण्यासाठी मॅथ्स क्लब अस्या बहुआयामी मंडळांची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन :- स्थापनेतून सृजनशील विद्यार्थी घडविण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विविध मंडळामध्ये रमलेले विद्यार्थी
शनी डोंगरावर १५१ वृक्षांची लागवड
‘निसर्गाचे संतुलन अबाधित तर मानव अबाधित’ या न्यायाने वैयक्तिक जीवन, घरची जबाबदारी, नोकरी या सर्व गोष्टी सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात बाळगून लोणीतील तरुणानीं’झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर सुट्टीच्या दिवशी १५१ वृक्षांची लागवड करून सोशल मिडीयाच्या लोभात अडकलेल्या तरुणाईला निसर्ग संवर्धनाचा वेगळा संदेश दिला.
सध्या पावसाळा सुरु आहे. या दिवसातील बहरलेला निसर्ग पाहण्यासाठी,पर्यटकांची वर्दळ सुरु होते, लहान-मोठे धबधब्यांनी निर्सगप्रेमींना भुरळ पडते. परंतु दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असल्याने निसर्गाचा हा सगळा अनमोल ठेवाच नाहीसा होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड. म्हणूनचजबादार नागरिक म्हणुन निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारताना लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये सेवेत असलेल्या सुरेश जाधव , प्रशांत काकड, निलेश चित्ते, दीपक विखे , संपत चेचरे , भगवान शिंदे, श्रीराम कदम, अंबादास मगर, गंगाराम धनवटे, महेश गायकवाड, अक्षय डोके, प्रवीण गायकवाड, नितीन ब्रम्हाने, उच्चशिक्षित तरुणांनी
शनिवार दि.१३ जुलै २०१९ रोजी गोगलगाव येथील उजाड शनिडोंगरावर दिवसभर खड्डे खोदून यात माती टाकून १५१ झाडे लावून अनोखा उपक्रम साजरा केला. या झाडांना पाणी घालण्यासाठी या तरुणांना दूरवरून पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परंतु गोगलगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मिळालेलता या १५१ वृक्षाची लागवड पूर्ण करण्यासाठी या तरुणांमध्ये आलेले चैत्यन्य हे खरोखरच अभिनंदन करण्यास पात्र असेच होते.
निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर, झाडे लावा झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल. असा संदेशत्यांनी दिला.
फोटो कॅप्शन :-गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर १५१ वृक्षांची लागवड करताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवक….