औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिन

औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानामित्त लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयामध्ये प्रवरा औषध निर्माण शास्र महाविद्यालयाच्या वतीने औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

या चर्चा सत्रासाठी विद्यालयातील सर्व विध्यार्थी- विध्यार्थिनी तसेच मुख्याधापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते . यावेळी महाविद्यालयाचे मुख्याधापक निवृत्ती येणगे यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.डॉ. संजय भवर यांनी औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम अधोरेखीत करून त्यासंबंधित मार्गदर्शन केले त्यात त्यांनी औषधांचा होणारा गैरवापर कसा टाळावा व मानवी जिवनावर होणारे दुष्परिणाम कसे टाळावे यासंबंधी जनजागृती केली, सदर सत्राचे आभार प्रा. मयूर भोसले यांनी मानले.

योग्य मार्गदर्शन, मेहनत, आणि स्मार्ट स्टडी ही यशाची गुरुकिल्ली

आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडतीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताने आयुष्यातील आनंदही अनुभवावा,असे प्रतिपादन लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी भाग्येश जावळे यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमा अंतर्गत भाग्येश जावळे बोलत होते. श्री जावळे हे सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसाद कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विदयार्थीशी बोलताने भाग्येश जावळे म्हणाले की, कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्याक्रमाचे प्रस्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे यांनी केले, सुत्रसंचालन सौरभ केदार यांनी केले तर महाविदयालयाच्या माजी विदयार्थी समन्वयक प्रा. सारिका पुलाटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, शिक्षक व शिक्षक्केतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमा अंतर्गत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी आणि सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत असलेले भाग्येश जावळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असतांना स्टाफ बरोबर .

प्रवरेत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न – शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा-सौ.सुजाता थेटे

लांबी,रुंदी आणि खोली शिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही, आपल्या जीवनाचे हि तसेच आहे. असे सांगताना तरुण पिढीने दीर्घ जीवणासाठी प्राप्त केलेल्या ज्ञान आणि अर्थार्जतुन दुसऱ्याला मदत होईल या भावनेने काम केले तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता थेटे यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी यथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी सौ. सुजाता थेटे बोलत होत्या.या प्रसंगी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आणि आणी शिक्षक उपस्थित होते.

सौ.सुजाता थेटे म्हणाल्या कि, जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही वस्तू पूर्ण केव्हा होते तर जेव्हा लांबी, रुंदी आणि खोली असते तेव्हा आपल्या जीवनातही निर्मिती पूर्ण झाल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, यानिमित्त लांबी म्हणजे दीर्घ जीवन, रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्ती करा पदव्या प्राप्त करा आणि पैसे मिळवा, खोली म्हणजे दुसऱ्या काही करणे आपले ज्ञान पदव्या,पैसा यातील काही भाग तरी दुसऱ्याच्या भल्यासाठी उपयोग होयला आहे तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे त्या म्हणाल्या.

यावेळी प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतले आहे त्या बळावर त्यांनी आपल्या स्वत:चा अवकाश निर्माण करावा, केवळ नशीबावर अवलंबून न राहता आपली क्षमता दाखवून द्यावी व उच्च ध्येय ठेऊन पुढच्या काळासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबरोबर सर्वांगिण विकास महत्त्वाचा आहे. समाजात उपयोगी आयुष्य जगतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तसेच ज्ञानाला शालिनतेचि जोड मिळाल्यास आदर्श व्यक्तीमत्व घडतील असे प्रतिपादन प्रा.गायकर यांनी केले.

अंतिम वार्षितील विद्यार्थी सोनाली बनकर,विद्या वर्धीनी,आभा मुसळे, अश्विनी सोळुंके,सौरभ फुलपगार,अतुल जांभुळकर, सौरभ भालके,चेतन मोरे यां विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून निरोप समारंभात गहिवरून आले व या महाविद्यालयात येऊन आम्हाला आमचे शाळेतील दिवस आठवले व येथे खूप नविन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या व परत या महाविद्यालयात येता येणार नाही याची पण खंत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.सूत्र संचालक तृतीय वर्षातील विद्यार्थी स्वप्नील गावडे व प्रेषिता यंदे यांनी केले व शेवटी आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मानले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. सुजाता थेटे,संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आदी.

राजश्री शाहू महाराज हे लोकशाहीचे आदर्श राजे प्रा.गायकर – कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले आणि आधुनिक समाज उभा करणेसाठी राजर्षी शाहू महाराजांनी सरळ कायदे बनवुन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली व जगापुढे नवीन आदर्श उभा केला. तसेच राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीचे राजे होते त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी आभ्यासावे आणि अंगिकरावे असे आवाहन रासयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी केले.

लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पदभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी विभागाचे श्री.कांबळे साहेब यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा.प्रविण गायकर बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.औताडे ऋषिकेश, प्रा. विशाल केदारी, प्रा.निलेश सोनूणे,आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व बिद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी कु.ऋतुजा भालेराव आणि दीप्ती शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक कु.जयश्री भुसारे यांनी केले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.औताडे ऋषिकेश यांनी मार्गदर्शन केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.प्रविण गायकर आणि सर्व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. आभार स्वयंसेवक सचिन वाघ यांनी मानले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती प्रा.ऋषिकेश औताडे , रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,प्रा.विशाल केदारी, प्रा.निलेश सोनूणे,आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बिद्यार्थी.

रासेयो स्वयंसेवकांनी वारकऱ्यांचे प्रबोधन,आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणाचा संदेश

ह.भ.प भानुदासमहाराज बेलापूरकर यांनी १८३६ साली सुरु केलेल्या श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर ते पंढरपूर या संत निवृत्ती महाराज यांच्या पालखी पायी दिंडीचे आगमन प्रवरा परिसरात झाल्यानंतर लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेऊन ग्रामसफाई बरोबरच वारकऱ्यांचे प्रबोधन,आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्याचे काम केले.

सुरवातीला स्वयंसेवकांनी दिंडीचा मुक्काम असलेल्या गोगलगाव आणि लोणी खुर्द गावामध्ये साफसफाई केली. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना नास्ता-चहापाणी वाटप केले. वारकऱ्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने वारकऱ्यांच्या आरोग्या विषयी प्रबोधन करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा या साठी कृतीतून संदेश दिला.

पद्मश्री विखे पाटील मंहाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सैदव समाजाप्रती आपली बांधिलकी जपत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उप-प्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ,डॉ. जयसिंगराव भोर,प्रा. दत्तात्रय थोरात,यांचेसह रा.से.योजनेचे कार्यकारी अधिकारी डॉ. दिनकर तांबे,प्रा. रोहित भडकवाड आणि डॉ. प्रतिभा कानवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो कॅप्शन :- श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर ते पंढरपूर या दिंडीचे प्रवरा परिसरात आगमन झाल्यानंतर,ग्रामसफाई बरोबरच वारकऱ्यांचे प्रबोधन,आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देताना लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक

लोणी येथील कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालयामध्ये जागतिक योगा दिनानिमित्त विविध उपक्रम

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला व या दिनानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यावेळी कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी योगा व प्राणायमाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच नियमित योगासने करण्याचे आहवान केले. तसेच महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिशक प्रा. एस.जी.वरखड यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून दाखविले व आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्राणायमाचे फायदे सांगितले.

या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर,कृषीजैवतंत्रानं महाविद्यालाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण गायकर, प्रा. राहुल विखे, प्रा. संदीप पठारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ चा लाभ घ्यावा –सौ. धनश्रीताई विखे पाटील

खगोलीय माहिती, वैज्ञानिक प्रयोग आणि संकल्पनांची विविध माध्यमांद्वारे सर्वंकष पद्धतीने ओळख ही शालेय जीवनातच व्हावी यासाठी,प्रवरानगर येथील ‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन ब्रिलीयंट बर्ड स्कुलच्या संचालीका सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.

प्रवरानगर येथे लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक कमिशन महाराष्ट्र राज्य यांच्या सुक्त विद्यमाने सन २०१५ मध्ये जिल्ह्यातील एकमेव असलेल्या हे ‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ सुरु झाले. विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना विज्ञानातील विविध तत्वांची ओळख व्हावी, काही वैज्ञानिक खेळातील आनंद स्वत:लाही लुटता यावा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून काही उत्सुकतावर्धक अशा विज्ञान विषयी माहिती व्हावी या उदेशाने लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी या सायन्स सेंटरची स्थापना केली होती. सौ. धनाश्रीताई विखे पाटील यांनी या सेंटरला भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.यावेळी सैनिक स्कुलचे कमांडण्ट कर्नल डॉ.भरत कुमार, सायन्स सेंटरचे समन्वयक प्राचार्य सुधीर मोरे, सुदाम तुपे यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य सुधीर मोरे यांनी या वेळी सांगितले कि, २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिवस या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो.वर्षभर सुट्या वगळता सकाळी ९ ते ५ हे सायन्स सेन्टर विद्यार्थ्यांसाठी खुले असते.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश दिला जातो. नगर सह नाशिक जिल्हयातील विद्यार्थीही या ठकाणी भेट देण्यासाठी येत असतात. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून काही उत्सुकतावर्धक अशा विज्ञान खेळांची माहिती या ठिकाणी दिली जाते.अनेक उपकरणे,चिल्ड्रेन्स पार्क,इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी प्रयोगशाळा आणि काही वैज्ञानिक खेळातील आनंद याठिकाणी लुटता येतो. बहुतांश विज्ञान चमत्कार समोर असलेल्या फलकावरील माहिती वाचून त्याचा अनुभव घेता येतो. शेवटी असे का घडले? याची माहिती देणारा तक्ताही प्रत्येक उपकरणासमोर असल्याने या उपकारानाकडे विज्ञानाच्या नजरेने पाहतानाच प्रत्येकजण कुतूहल आणि जिज्ञासेपोटी तो खेळ खेळतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामुळे खूप फायदा होत आहे. अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी येथे अनेक प्रकल्प उपलब्ध असल्याचे प्राचार्य मोरे यांनी सांगितले.

विद्यानाची अनुभूती घेण्यासाठी प्रवरानगर येथील भव्य अस्या सायन्स सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भेट द्यावी व मनोरंजनातून विज्ञान समजून घ्यावे, त्या साठी सुदाम तुपे ९५११२१६१६६ यांचे संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य मोरे यांनी केले.

चौकट:-प्रवरानगर येथील सायन्स सेन्टर विद्यार्थ्यांना आनंददाई विज्ञानाची अनुभूती देण्यासाठी कृतीयुक्त्त अध्ययन आणि प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी वेगवेळ्या चार विभागात उपलब्ध आहे.

*इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी क्लब – या विभागात विविध शास्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध,आणि प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी असून रोबोटिक्स,मायक्रोप्रोसर,इलेक्ट्रोनिक्सया विषयावरही कृतियुक्त प्रयोग करण्याची संधी मिळते. या ठिकाणी तोड-फोड-जोड हि संकल्पना विद्यार्थी काबाड से जुगाड वर आधारित करतात.

*बहुदेशीय हॉल- विविध शास्त्रज्ञांचे शोध, जीवनचरित्र पुस्तकांचे ग्रंथालय ,एल सी.डी प्रोजेक्ट सुविधा.

*खेळातून विज्ञान- विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी ग्राव्हिटी लेव्हल,मोरी प्याटर्न.क्रेझी मेझं,प्लाझ्मा ग्लोब,जम्पिंग डिस्क,कुरी पॉईंट,लेझी कॉईन अँट्रोब्याटीक स्टिक विविध उपकरणे.

*बाल विज्ञान उदयान- सीसॉ, मुझीकाल ट्युब,सिम्पाथेटीकस्विंग, कॅमेरा ऑब्सकुश,पुली लिफ्ट लोड, एक्शन रिएक्शन इत्यादी खेळांचे उपकरणे द्वारे विद्यार्थ्यांना आनद लुटता येतो

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम

पद्मभुषण खा. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सलग सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे काम सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी केले त्यात सर्व प्रथम कॉलेज परिसरात कल्पवृक्ष रोपण मा. बन्सी तांबे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तसेच सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली, दुसर्या दिवशी लोहारे येथील आश्रम शाळेतील मुलांना आरोग्य व स्वच्छता याबाबत माहिती देऊन जनजागृती करणात आली. तिसर्या दिवशी लोणी गावात फेरीचे आयोजन करून विविध ठिकाणी जाऊन प्लास्टिक बंदी बाबत विध्यार्थी व शिक्षक यांनी नागरिकांना माहिती दिली व त्यापासून होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. चौथ्या दिवशी दुधेश्वर देवस्थानयेथे माजी विध्यार्थ्यान्तर्फे भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या सोयी साठी १००० लिटर ची टाकी भेट दिली तसेच मंदिर परिसराची स्वच्छता केली व बिजरोपण केले.पाचव्या दिवशी महाविद्यालयीन शिक्षकांनी प्रवरा माध्यमिक विद्यालय, दुर्गापूर येथे सर्व विध्यार्थ्यांना शारीरिक स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले तसेच सहाव्या दिवशी हसनापूर येथे धावपळीच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याचे जनजागरण व त्यासाठी उपलब्ध असलेल्या तपासण्या करण्यात आल्या त्यात २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. अशेविविध सामाजिक उपक्रम राबवून मा. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर सर्व उपक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

फोटो कॅप्शन :- ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करताना विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रतिक चौधरी या विद्यार्थ्याची इस्राईल येथे इंटर्नशीपसाठी निवड

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थी प्रतिक चौधरी याची इस्त्राईल येथे किबुत्स स्वयंसेवक कार्यक्रमासाठी तेल अविव, इस्त्राईल येथे निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.

१९६७ साली सहा दिवसांच्या युद्धानंतर, संपूर्ण जगभरातील स्वयंसेवकांचा एक भाग इस्राईलमध्ये येण्यास सुरवात झाली. त्यांचा मुळ उद्देश इस्राईल लोकांकडे किबुत्स स्वयंसेवक बनून त्यांना प्रोत्साहित करणे हा होता. एक समाजवादी समाजाच्या खऱ्या तत्त्वांचे पालन करणाऱ्या किबुत्स समाजाची कल्पना, सर्व कार्य, संपत्ती आणि त्यांच्या सदस्यांसह समान वाटा मिळवून देणारे कार्य स्वयंसेवकांना प्रोत्साहित करते. या विशिष्ट समुदायाचा भाग बनण्याची इच्छा परदेशींमध्ये सुद्धा आज वाढली आहे. थोड्याच कालखंडात विविध देशातील हजारो स्वयंसेवक इस्रायलमध्ये किबुत्स स्वयंसेवक बनण्याच्या उद्देशाने दरवर्षी येतात. याचाच भाग म्हणून एकूण एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत प्रतिक चौधरी हा दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन यामध्ये एक हजार गायी व दीड लाख कुकुट पालन यांमधून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीसाठी काम करत असताना त्याला प्रतिमाही रु. एक्कावण हजार विद्या वेतनही मिळत आहे. अशा नामांकित संस्थेत स्वयंसेवक म्हणून इंटर्नशीप करण्याची संधी पदवी प्राप्त होण्या अगोदरच मिळाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व यामुळे महाविद्यालयाचे परदेशातही नावलौकिक होत आहे.

या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ. धनंजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विदयार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हिव द्वारे मोठ्या प्रमाणावर नोकर्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग शुभम शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलेकम्युनिकेशन विभागाच्या मयुर कुटे, हिमांशु भदाणे यांचे तिरूमला ऑटोमेशन पूणे व केमिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रविण खेमनर याचे कॅटाफार्मा नाशिक, रोहीदास कराड याचे पारस कॅड प्रा.ली. मुंबई येथे निवड झाली आहे.अशी माहिती प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले.

या प्रसंगी संस्थेचे ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर म्हणाले कि संस्थेचे अध्यक्ष श्री.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यान नोकर्या उपलब्ध व्हाव्यात या साठी प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतो ज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत.या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा नाम. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार श्री. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, राजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्थासात साजरा

योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली असुन, सर्वानीच नियमित योगसाधना करून या प्राचीन शास्त्राचे अगणित फायदे धोडले पाहिजेत असे सांगताना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे प्रतिपादन योगशास्राच्या शिक्षिका ज्योती रावत यांनी केले.

लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्थासात साजरा करण्यात आला, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांच्या मार्गदर्शनाखालीआणि योगा शिक्षिका ज्योती रावत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालायाचे सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त महाविद्यालयातील सर्व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने कॉलेज परिसर योगमय झाला होता.

ज्योती रावत या वेळी म्हणाल्या योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे, आपण सर्व जन नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणित फायदे शोधूयात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल तसेच त्यांनी योगाचे महत्व व विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली. यामुळे प्रवरेतील योगसाधनेच्या या परंपरेला आणखी प्रेरणा मिळाली.सदर दिनी महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगा शिक्षिका ज्योती रावत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी,विद्यार्थिनी..

लोणी आय.टी.आय.च्या १५ विद्यार्थ्यांची जॉन-डियर मध्ये नोकरीसाठी निवड


जॉन डीर-डियर या ट्रॅक्टर उत्पादक बहुराष्ट्रीय कंपनीत मध्ये नोकरी साठी निवड झालेल्या लोणी येथील अदयोगिक प्रशिक्षण संस्थे(आय.टी.आय) मधील विद्यार्थ्यांसावेत्त प्राचार्य जयंत धर्माधिकारी,ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर, को-आर्डिनेटर प्रा. राजेंद्र निंबाळकर, जॉन-डियर कंपनीचे एच. आर मॅनेजर श्रीकांत जाधव आदी.

लोणी येथील अदयोगिक प्रशिक्षण संस्थे(आय.टी.आय) च्या १५ विद्यार्थ्यांची जॉन-डियर या ट्रॅक्टर उत्पादक बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी साठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी दिली.

प्रवरा शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर आणि को-आर्डिनेटर प्रा. राजेंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच जॉन डियर कंपनीचा कॅम्पस् इंटरव्ह्यू पार पडला. यामध्ये डिझेल मेकॅनिक कोर्सच्या ११ व पेंटर कोर्सच्या ४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून. निवड झालेले विद्यार्थी त्यांच्या अंतिम परीक्षेनंतर लगेचच कंपनीत रूजू होणार आहेत. कंपनीचे एच. आर मॅनेजर श्रीकांत जाधव यांनी कंपनीच्या वतीने सदर इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे, डॉ रेड्डी, डॉ हरिभाऊ आहेर आदिंची अभिनंदन केले.