प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाचा उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी जनजागृती कार्यक्रम

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकरी वर्गात जनजागृती होण्यासाठी कोल्हार खुर्द ता. राहुरी येथे शेतकरी मेळाव्याने करण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली. .

यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, प्रवरानगराचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात , कोल्हार खुर्द चे सरपंच श्री. प्रकाश पाटील शिरसाठ, उपसरपंच श्री. किशोर घोगरे, अनिल पाटील शिरसाठ, सुरेश पाटील शिरसाठ, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयचेप्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदि मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गृहनिर्माण मंत्री. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करणार आले होते.

श्री. संजय काचोळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील कृषीदूत व कृषीकन्या यांच्या माध्यमातून उसावरील हुमणी कीड नियंत्रण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. तरशास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात यांनी हुमणी कीड नियंत्रण करण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना राबविल्या हव्यात याची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. या वेळी सरपंच श्री. प्रकाश पाटील शिरसाठ, अनिल पाटील शिरसाठ यांनी देखील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा.निलेश दळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रमेश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कार्यांसाठी प्रा.अमोल खडके, प्रा.वाल्मिक जंजाळ,प्रा. संदीप पठारे, प्रा. विक्रम राऊत आदी वग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील कृषीदूत व कृषीकन्या यांचे सहकार्य लाभले.

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयास उत्क्रुष्ट श्रेणी प्रदान

लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या,लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ , मुंबई यांचे कडून नुकतीच उत्क्रुष्ट श्रेणी प्रदान करण्यात अली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी दिली.या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षासाठी शैक्षणिक कामकाज व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उत्क्रुष्ट सुविधांबद्द्ल शैक्षणिक मंडळाच्या देखरेख समितीने महाविद्यालयास भेट देऊन समाधान व्यक्त केले. आणि आता त्यासाठी उत्कृष्ट श्रेणी देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.

महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ,ग्रँथालय,खेळाची मैदाने ,जिमखाना,सेमिनार हॉल प्रयोगशाळा,संगणक कक्ष ,ट्रेनिंग व प्लेसमेंट सेंटर सेल, औद्योगिक सहल, हॉस्पिटल व्हिजिट,सिडीटीपी योजना,या सारख्या सुविधा पुरविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डो. सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील,शिक्षण संचालक डो. रेड्डी ,डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण , प्रा. दिगंबर खर्डे, आदींनी अभिनंदन केले.

‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावरील व्याखान


प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. के. बी. लिंगे, संचालक कर्नल डॉ. के.जगन्नाथन, प्राचार्य सयाराम शेळके आदी.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शिस्त आणि संस्काराची खरी रुजवणूक हि शालेय जीवनातच होत असल्याने प्रवरा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्लबच्या माध्यामातून विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संचालक कर्नल डॉ. के.जगन्नाथन यांनी दिली.

शिक्षण प्रक्रिया ही ज्ञानरचनावादी आणि उपक्रमशील आसली पाहिजे म्हणूनच शिक्षणक्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचे स्वागत करताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरची माहिती होऊन आपल्या आवडीच्या कलेची जोपासना करता यावी या साठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये विविध उपक्रम राबविले जात असून याचाच एक भाग म्हणून,संस्थेचे अध्यक्ष ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपांना बरोबरच इंग्रजी निबंध स्पर्धा आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. के. बी. लिंगे यांचे ‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावरील व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेत सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्लबच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना नवीन वातावरणामध्ये समायोजन कसे करावे, शालेय जीवनापासून वेगवेगळ्या समस्यांना संयमाने सामोरे जाता यावे,दुसऱ्यावर अवलंबून ना राहता स्वावलंबीवृत्ती निर्माण होणे, विचारांची देवाण घेवाण होऊन सृजनशीलता या मुल्यांची रूजवणूक होणे, नवीन मित्र तयार करणे,या साठी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणे का या उपक्रमामागचा खरा उदेश असल्याचे प्राचार्य सयाराम शेळके या वेळी म्हणाले.

पथनाट्याद्वारे पर्यावरण सौंरक्षणाबाबत जनजागृती


“पर्यावरण सौंरक्षण, देश का रक्षण” या पथनाट्याद्वारे जनजागृती करताना लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिशमिडीयम स्कूल अँन्ड जुनियर कॉलेज मधील विद्यार्थीनी,ग्रामपंचायत सदस्य अशोक आहेर,प्राचार्या सौ.संगिता देवकर, सौ. रेखा रत्नपारखी आदी.

पर्यावरण संरक्षण हि काळाची गरज ओळखून लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिशमिडीयम स्कूल अँन्ड जुनियर कॉलेज मधील इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थीनिनी लोणी येथे “पर्यावरण सौंरक्षण, देश का रक्षण” या पथनाट्याद्वारे पर्यावरण सौंरक्षणाबाबत जनजागृती केली असल्याची माहिती प्राचार्या सौ.संगिता देवकर यांनी दिली.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा गर्ल्स इंग्लिशमिडीयम स्कूलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून सामाजीक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त लोणी खुर्द येथील वेताळबाबा चौक येथे “पर्यावरण सौंरक्षण, देश का रक्षण” या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्कुल कमेटी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य श्री अशोक आहेर,माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षक सौ. रेखा रत्नपारखी आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. शिक्षिका सौ.एस आर.शेख,सौ. एम एम गायकर,सौ. एस ए.शेख यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

औषधनिर्माणशास्र महिला महाविद्यालयाच्या चार विद्यार्थीनी विद्यापीठात टॉपर

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महिला महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा निकाल ९२ टक्के लागला असून,कु. स्वप्नाली आभाळे (७७.५४टक्के),कु. निकिता सोनवणे(७६.३१ टक्के) आणिकु. गितांजली गलांडे (७५.६२ टक्के) गुण मिळवून एस.एन.डी टी विद्यापीठामध्ये अनुक्रमे पहिल्या तीन टॉपर आहेत. तर ,कु. प्राजक्ता महाजन(७४ टक्के) गुण मिळवून विद्यापीठामध्ये पाचवी आली असल्याची माहिती प्राचार्या डॉ. चारुशीला भंगाळे यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डो. सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील,शिक्षण संचालक डो. रेड्डी ,डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण , प्रा. दिगंबर खर्डे, आदींनी अभिनंदन केले.

कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील- ना.सौ. शालिनीताई विखे पाटील

२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जग गतीने प्रगती करीत आहे. आता चार भिंतीतील शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील असा विस्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड आरोमॅंटिक प्लांटस, लूखनऊ (सिमॅप) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ना.सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याच्या नियोजनासाठी सौ. रुपाली लोंढे व डॉ. विशाल केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सिमॅप व जनसेवा फौंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांनी चार दिवसीय अभ्यास दौऱ्यादम्यान महाविद्यालयाच्या चार भिंतीतील विचार सोडून व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी शुभेच्छा भेटीदरम्यान केले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या अंतर्गत सिमॅप ही एक संशोधन प्रयोगशाळा असून सण १९५९ पासून ती औषधी व सुगंधी वनस्पतीपासून संशोधनातून समाज उपयोगी उत्पादने निर्माण करून त्याचे औद्योगिकीकरण करून मोठया प्रमाणावर उत्पादन घेत आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी ३३ विद्यार्थी व सात शिक्षक रवाना झाले असून १५ ते १८ जून दरम्यान सिमॅप मधील शास्रज्ञद्वारे निर्मित तंत्रज्ञान ओळख व संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड आरोमॅंटिक प्लांटस, लूखनऊ (सिमॅप) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ना.सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य प्रा. निलेश दळे,प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर व प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे आदी…

गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत एप्रिल २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या गृहविद्यान परीक्षेमध्ये लोणी येथील प्रवरा गृहविज्ञान व संगणकशास्र महिला महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य डो. शशिकांत कुचेकर यांनी दिली.

या मध्ये गृहविज्ञानशास्राच्या दुसर्या वर्षातील कु. ऋतुजा भारत जगताप ८६. ४० गुण मिळवून प्रथम ,कु. प्रीती बापूसाहेब काळबांडे ८४. २० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि कु. स्नेहल दीपक वाणी ८१. ३० गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाल्या आहेत.तसेच, तृतीय वर्षामधील फूड सायन्स नुटरीशियन या विषयामधील कु. पूजा सदाशिव केदार ८४. ४३ टक्के,कु. भक्ती बद्रीनारायण सारडा ८२.४३ टक्के, आणि कु. गायत्री अण्णासाहेब गहिरे ८० १९ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाल्या आहेत. तर, टेक्सटाईल विभागातील कु. प्रतिभा सुनील कदम ८१.९० टक्के, कु. दिपाली चांगदेव वराळे ७४.३९ टक्के,आणि कु. रोहिणी कचरू निकाळजे ७२. ७८ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाल्या आहेत.

संगणक विभागाचा निकाल ९२.०० टक्के लागला असून या मध्ये तृतीय वर्षातील कु. मयुरी तुकाराम नेहे ७६.७५ टक्के,कु. ज्ञानेश्वरी मछिन्द्र हिने ७५.२९ टक्के आणि कु. मंजुषा साहेबराव अपसुंदे ७४.२७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाल्या आहेत.याच विभागातील द्वितीय वर्षातील कु. कोमल साहेबराव मेधने ७५. ७० टक्के कु. रेखिता अनिल वाघ ७२ टक्के आणि कु. मयुरी दत्तात्रय शेळके ६९.२४ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाल्या आहेत. या विद्यार्थिनींना उपप्राचार्या डो. अनुश्री खैरे,प्रा. कांचन देशमुख प्रा. राजश्री नेहे. परीक्षा अधिकारी प्रा. संजय वाणी प्रा. रुपाली नवले, श्री सुनील अल्हाट यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खासदार.डॉ.सुजयदादा विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोकराव कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर आदींनी अभिनंदन केले.

आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना नोकरया

इंडस्ट्रीना पाहिजे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न प्रवरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आय.टी.आय.) मध्ये होत असल्यानेच इंडस्ट्री आणि प्रशिक्षण संस्थांमधील अंतर कमी होऊन प्रवरा आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरया उपलब्ध होत असल्याबद्दल ब्रीलीयंट बर्ड स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

लोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लिनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये औरंगाबाद येथील एन.आर.बी. बेअरिंग्स , व्हेरॉक इंडस्ट्रीज व ऋचा इंजिनीरिंग या कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या भारती मेळाव्यामध्ये सुमारे ९५ विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड झाल्याने सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी याविद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या पूर्वीही मोठ्या प्रमाणावर नोकर्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी या वेळी सांगितले.

परीक्षेनंतर लगेचच या कंपनीमध्ये रुजू होणार्या विद्यार्थ्यांमध्ये वेल्डर विभागातील १९ वायरमन विभागातील ४ इलेकट्रीशियन विभागातील ३५, फिटर विभागातील २१, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील १३ व मोटार मेकॅनिक विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. प्रवरेचे जास्तीत जास्त विद्यार्थी कंपन्यांमध्ये नोकरीला लागावे याकरिता प्लेसमेंट सेल कार्यरत असल्याची माहिती प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली. कंपनीच्या वतीने श्री. गिराम सर, श्री. शिसोदे सर, श्री.रामपल्लीवार सर व श्री. उऱ्हेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कंपनीबद्दल माहिती दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्या सौ. शालिनीताई विळे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य. कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , टेक्निकल डायरेक्टर डॉ. रेड्डी, डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी अभिनंदन केले.

प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी, येथे केंद्रभूत प्रवेश प्रक्रिये साठी सेतु सुविधा केंद्र सुरू

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत शैक्षणिक वर्ष२ ०१९-२० साठी तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषीशिक्षण, मत्स्यवदुग्ध, कला शिक्षण या विभागांतर्गत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रराज्यातील विविध जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन / समुपदेशन आणि मुळकागदपत्राची पडताळणी करण्यासाठी शुक्रवार, दि. ०७जून, २०१९ पासून प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी, लोणी येथे सेतू सुविधा केंद्राची मान्यता मिळाली आल्याची माहिती प्राचार्याडो प्रिया राव यांनी दिली.

प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा कॉलेज कोड ५१८५ असून या सेतु सुविधा केंद्रा मध्ये जिल्हयातील विविधभागातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबत सोय होणार आहे. प्रवेशप्रक्रिया सुरळीत सुरुहोणेसाठी महाविद्यालयाने अर्जस्विकृती केंद्रासाठी स्वतंत्र अद्यावत संगणक लॅब व कौंसेलिंग हॉलची व्यवस्था केलेली आहे. अर्ज स्विकृतीच्यावेळी इयत्ता दहावी आणि बारावी चेगुणपत्रक , विद्यालय सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जातपडताळणी दाखला, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, सी.ई.टी/नीट हॉलतिकीट, सी.ई.टी/नीट गुणपत्रक व अॅप्लिकेशन फॉर्म, ए.टी एम आणि आधारकार्ड ही कागदपत्रे तयार ठेवावी. या फेऱ्यांसाठी होणाऱ्या फ्रिज, स्लाईड व फ्लोटींग या पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेमध्ये काही अडचण येत असल्यास त्यांनी प्रा.डॉ. नचिकेत दिघे (९८९०२१५७२९) यांचेशी संपर्क करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित इतर राष्ट्रीय प्रवेशपरीक्षा दिलेल्या आहेत अश्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दिनांक ०७ जून, २०१९ पासून www.mahacet.org (SAAR P०rtal: SETU Assisted Admission Registration for A.Y. 2019-20) या संकेतस्थळावर जाऊन विहित लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर स्वत: निवडलेल्या सेतू सुविधा केंद्रा मध्ये पूर्वनियोजन केलेल्या वेळी भेट देऊन प्रवेश प्रक्रिया अर्ज व त्यासंबंधीत आवश्यक असणारी कागदपत्रे तपासणी करून घ्यावीत. संकेतस्थळावर तसेच आपल्या लॉगइनमध्ये प्राप्त झालेल्या सूचना, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक/ शासकीय परीपत्रके यांचे नियमित अवलोकन करावे. तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये (CAP) शी संबंधीत वेळापत्रकाबाबत संकेतस्थळावर भेट द्यावी.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सेतु सुविधाकेंद्रामध्ये भरावेव त्यानंतर सेतुसुविधाकेंद्रातून कागदपत्रे तपासून घ्यावे याचा फायदा विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे अवाहन प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी केले आहे.

वाढदिवसानिमित्त शैक्षणिक,सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम

माजी मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते डो. बाळासाहेबविखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून विविध शैक्षणिक,सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुभेच्छा देण्यात आल्या.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य कार्यालयात वृक्षारोपणा बरोबरच अववाय दानावर शॉर्ट फिल्म दाखवून शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. अवयव दानाचे महत्व सांगण्यात आले. सचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डो. अशोक कोल्हे, अस्थापना संचालक डो. हरिभाऊ आहेर,प्रा. विजय आहेर, विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.

संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, औषध निर्मान्शास्र महाविद्यालये, कृषी सलग्नित महाविद्यालये,तंत्रनिकेतन, वास्तुशास्र महाविद्यालय, गृह वा संगणक महिला महाविद्यालय, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय,सैनिकी स्कुल, प्रवरा पब्लिक स्कुल, सेन्ट्रल पब्लिक स्कुल, गिर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कुल या सह प्रवरा परिसरातील विविध शाळा, सिन्नर येथील शिक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालये आदी ठिकाणी हे उपक्रम राबविण्यात आले.

प्राचार्य कृषी संचालक डो. मधुकर खेतमळस,शिक्षण संचालक प्रा.दिगंबर खर्डे, पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल डो. के. जगन्नाथन , सैनिक स्कूलचे संचालक डो. प्राचार्य डो. संजय गुल्हाने, प्राचार्या डो. प्रिया राव ,प्राचार्य डो.राठी , प्राचार्य ऋषिकेश औताडे , प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहित उंबरकर , डो. प्रदिप दिघे, डो. अण्णासाहेब तांबे, प्रा. जयंत धर्माधिकारी, प्राचार्य डो शशिकांत कुचेकर, सौ लीलावती सरोदे, सौ विद्या वाजे,सौ. संगितादेवकर, सयाराम शेळके, प्राचार्य शिंदे यांचे सह शिक्षक ,शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

फोटो ओळी :- माजी मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळा महाविद्यालयांमधून विविध शैक्षणिक,सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील सचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डो. अशोक कोल्हे, अस्थापना संचालक डो. हरिभाऊ आहेर,प्रा. विजय आहेर, विविध विभागांचे प्रमुख…..