कृषी व संलग्नित शिक्षण पदवी प्रवेशासाठी प्रवरा परिसरात सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित

महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान, कृषी, उद्यानविद्या, वनविद्या,मत्स्यशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमाना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्या नुसार चालू शैक्षणिक वर्षासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित झाले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी दिली.

कृषी पदवीच्या १४ हजार ६९७ जगाचे प्रवेश यंदा सर्वंकष अशा सामायिक प्रवेश परीक्षेतूनच (सीईटी) होणार आहे. राज्यात चार कृषी विदयापिठातील आठ विद्याशाखामध्ये १७७ महाविद्यालयात प्रवेशासाठी यंदाची प्रवेश-सेतू केंद्राच्या मदतीने प्रवेश प्रक्रिया ०७ जुन पासून सुरु झालेली आहे.

प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्तळावर विध्यार्थ्याला नोंदणी करावी लागणार असून नोंदणी करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्ग विषयक माहिती द्यावी लागेल. त्याच्याशी संबधित कागदपत्रेदेखील प्रवेश सेतू केंद्राद्वारे स्कॅन करून अपलोड करावे लागतील. या प्रवेशप्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निवडक महाविद्यालयात सेतू केंद्र सुरू झाले असून प्रवरा परिसरामध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी, प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ बिसनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनीस्ट्रेशन व पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॅाजी, आय. टी. आय. कॅम्पस, चंद्रापुर रोड, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. प्रवेश-सेतू केंद्रावर नोंदणी नंतर कृषी व संलग्नित प्रवेशासाठी २० जून ते ७ जुलै या दरम्यान Maha-agriadmission.in या संकेतस्तळावर विध्यार्थ्याला महाविद्यालयाचे विकल्प भरता येईल. प्रवेशासाठी ऑनलाईन चार फेऱ्या होतील. उर्वरित रिक्त जागांसाठी जागेवरील प्रवेश फेरी होईल.

तरी विध्यार्थ्यानी प्रवेशाकरिता नोंदणी केल्यापासून प्रवेश निश्चित होईपर्यंत प्रवेश-सेतू सुविधा केंद्रामध्ये संपर्क साधावा व तसेच कृषि व कृषी संलग्नित अभ्यासक्रमा बाबत अधिक माहितीसाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, लोणी येथे संपर्क करावा असे आवाहन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी केले. तसेच, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र असून त्याबाबतच्या माहितीसाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी येथे संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी केले.

चौकट: व्यावसाईक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवरा शैक्षणिक संकुलातील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ बिसनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनीस्ट्रेशन व पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॅाजी, आय. टी. आय. कॅम्पस, चंद्रापुर रोड, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.

कॅम्पस इंटरव्हीव्यू चे आयोजन

लोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये शनिवार दि. १५ जून २०१९ रोजी सकाळी ९;वा पुणे येथील नामांकित लॉगीपूल इन्फोटेक प्राव्हेट लि या कंपनीने संगणक विषयातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्हीव्यू चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.

श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त लोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित करणाऱ्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरे,रुक्षारोपण या सारखी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ प्रदीप दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हीव्यू सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षी बी.एस्सी(कॉप्युटर सायन्स),बी.सी.एस, बी.सी.ए ,एम सी एस, एम सी ए, एम एस्सी(कॉप्युटर सायन्स), बी ई (कॉप्युटर सायन्स,इलेक्ट्रिकल,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी),डिप्लोमा इन इंजिनियरिंग (इलेक्ट्रिकल,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,कॉम्पुटर ), एम टेक (ऑल ब्रॅंचेस) पास झालेल्या विद्यार्थ्यांना लॉगीपूल इन्फोटेक प्राव्हेट लि या कंपनी मार्फत मुलाखती घेऊन जावा डेव्हलपर,वेब डिझायनर,फ्रंट एण्ड बॅक एण्ड डेव्हलपर टेकनिकल सपोर्ट या पोस्ट साठी निवड करून सुमारे २ लाख ४० हजाराचे वार्षिक पॅकेज देणार आहेत.

तरी प्रवरा परिसरातील उपरोक्त शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांनी लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाचे श्री शेळके सर मो.न ९८९०५८७९०९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ प्रदीप दिघे यांनी केले आहे.

लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये सन २०१९-२० शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेसाठी सेतु सुविधा केंद्र सुरू

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कला शिक्षण या विभागांतर्गत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन-समुपदेशन आणि मुळ कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्र सुरु झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली .

अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कोड ५१३९ असून या सेतु सुविधा केंद्रामध्ये जिल्हयातील विविध भागातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिये बाबत सोय होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरु होणेसाठी महाविद्यालयाने अर्ज स्विकृती केंद्रासाठी स्वतंत्र अद्यावत १०० संगणकांची लॅब व कौंसेलिंग हॉलची व्यवस्था केलेली आहे. अर्ज स्विकृतीच्या वेळी इयत्ता दहावी आणि बारावीचे गुणपत्रक, विद्यालय सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे तयार ठेवावी. या फेऱ्यांसाठी होणाऱ्या फ्रिज, स्लाईड व फ्लोटींग या पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असल्यास त्यांनी प्रा. कपिल ताम्हाणे (९९६०४२४२४७), प्रा.अनिल लोंढे (९८५०२०९६४३), प्रा.प्रदिप नळे ९९६०६८८९४३, प्रा.पंकज चित्ते(९०९६३५०१०१) यांना संपर्क करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या आहेत अश्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दिनांक ०७ जून, २०१९ पासून www.mahacet.org (SAAR P०rtal: SETU Assisted Admission Registration for A.Y. 2019-20) या संकेत स्थळावर जाऊन विहित लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर स्वत: निवडलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये पूर्वनियोजन केलेल्या वेळी भेट देऊन प्रवेश प्रक्रिया अर्ज व त्या संबंधीत आवश्यक असणारी कागदपत्रे तपासणी करून घ्यावीत. संकेतस्थळावर तसेच आपल्या लॉग इन मध्ये प्राप्त झालेल्या सूचना, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक/ शासकीय परीपत्रके यांचे नियमित अवलोकन करावे. तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये (CAP) शी संबंधीत वेळापत्रकाबाबत www.mahacet.org (SAAR P०rtal: SETU Assisted Admission Registration for A.Y. 2019-20) या संकेत स्थळावर भेट द्यावी.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑन लाईन अर्ज सेतु सुविधा केंद्रामध्ये भरावे व त्यानंतर सेतु सुविधा केंद्रातून कागदपत्रे तपासून घ्यावे याचा फायदा विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे अवाहन प्रवरा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले आहे.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४’ या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड

Vikram Pasale

Rutuja Bhalerav

Prashant Batule

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी चि.विक्रमसिंह पासले,कु.ऋतुजा भालेराव व द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.प्रशांत बटुळे यांची नुकतीच ‘इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४’ या दोन महिन्यांच्या पेड इंटर्नशीप प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली….

इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.प्रत्येक वर्षी इंटर्नशाला ही संस्था देशभरातील मोजक्या व नामांकित महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची आपल्या या कार्यक्रमासाठी ‘स्टुडन्ट पार्टनर’ म्हणून निवड करत असते.याच कार्यक्रमासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या विद्यार्थ्यांना ४ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत या कार्यक्रमाचे स्टुडन्ट पार्टनर म्हणून काम पहायचे आहे व त्यासाठी त्यांना त्यांच्या प्रगती अहवालानुसार इंटर्नशाला या संस्थेकडून विशेष मानधन ही मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खासदार.डॉ.सुजयदादा विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोकराव कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, संस्थचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषीकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

आव्हान २०१९ शिबिरासाठी निवड


कु. उमा शिवाजीराव खरे

लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयातील द्वितीय वर्ष गृहविद्यान शाखेची कु. उमा शिवाजीराव खरे या विद्यार्थिनीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मध्ये “आव्हान २०१९ या राज्यस्थरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी स्वयंसेवक म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शशिकांत कुचेकर यांनी दिली.

“आव्हान २०१९ या राज्यस्थरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन या वर्षी नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी दि. ३ ते १२ जून २०१९ या कालावधी मध्ये होणार आहे. यास शिबिरामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अहमदनगर ,पुणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यामधून रा.से योजनेचे ९० स्वयंसेवक सहभागी होणार असून,यामध्ये लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयातील द्वितीय वर्ष गृहविद्यान शाखेची कु. उमा शिवाजीराव खरे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला एन.एस.एस अधिकारी प्रा. रुपाली नवले विद्याथी विकास अधिकारी डो. अनुश्री खैरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थिनीचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण संचालक प्रा दिगंबर खर्डे , प्राचार्य डो. प्रदिप दिघे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल

महाराष्ट्र राज्य माद्यामिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९३.३१ टक्के इतका लागला असून च्यार विद्यार्थांनी वेगवेगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले असल्याची माहिती प्राचार्य डो. अण्णासाहेब तांबे यांनी दिली.

विज्ञान शाखेमधील स्वप्नील चंद्रभान नळे याविद्यार्थ्याला ८६.७६ टक्के गुण मिळवून प्रथम ,कु. प्रज्ञा भास्कर यलमामे ८५. २३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर अथर्व सुनील मिसाळ ८४. ९२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये तृतिय क्रमांकाने पास झाले आहेत. अनिमल सायन्स या विषयामध्ये शंतनू राजेंद्र सांबरे आणि अनिस करीम शेख या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले, तर रोहित बाबासाहेब गांधले या विद्यार्थ्याला क्रॉप सायन्सया विषयामध्ये १०० पैकी १०० तसेच कु. शेजल कैलास वाकडे या विद्यार्थीनीला डेअरी सायन्स या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळून या विद्यार्थ्यांनी संबधीत विषयामध्ये पुणे बोर्डात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

याच कनिष्ट महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचा निकाल ९१. २० टक्के इतका लागला असून कु. शेजल सुनील वाणी ८५.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षद सदाशिव जगदाळे ७९.३८ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि समृद्ध कचेश्वर धीवर ७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. कला शाखेमधेही गोकुळ हंगे ८१.३८ टक्के, कु. चिन्मयी जोशी ७१.६९ टक्के,ज्ञानेश्व्वर गायके ६५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने पास झाले आहेत. एम सी व्ही सी.विभागामध्ये कु. ऋतुजा पवार ७६.४६ टक्के, कु. स्नेहल आदक ७५. ५३ टक्के, कु. महिमा पवार ७५. ५३ टक्के आणि अमृता ढोकचौळे ७४ टक्के गुण मिळविले आहेत.

या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण संचालक प्रा दिगंबर खर्डे , प्राचार्य डो. प्रदिप दिघे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना नोकरीची संधी


विखे पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे,प्राचार्य डॉ.विजय राठी, प्रा.धनंजय आहेर, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी… छाया- दत्ता विखे

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक मधून २०१८-१९ या वर्षभरामध्ये एकवीस कंपन्यांतून परिसर मुलाखतीद्वारे शेवटच्या वर्षातील शिक्षण पूर्ण होत असतानाच सुमारे ३०९ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असल्याने पालक वर्गात समाधानाचे वातावरण आसल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय राठी यांनी दिली

संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत परिसर मुलाखतींचे आयोजन केले जात असून त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी होत आहे. टाटा मोटर्स लिमिटेड पुणे, मित्सुबिशी इलेक्ट्रिक भोसरी, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड मुंबई, सिपला फर्मा कुरकुंभ पुणे, धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद जय हिंद इंडस्ट्रीज लिमिटेड आकुर्डी, टेक्नॉलॉजी चिंचवड पुणे, पॅगो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडबारामती, घरडा केमिकल्स लोटे परशुराम, कारगिल लिमिटेड कुरकुंभ, रिंडीट इंडिया प्रायव्हेटलिमिटेड वडोदरा गुजरात आदींसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या परिसर मुलाखती विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या. यामध्ये ३०९ विद्यार्थ्यांची नोकरीची संधी उपलब्ध झाली असून चांगले पॅकेज देखील मिळाले असल्याचे प्राचार्य डॉ. राठी यांनी सांगितले

संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने मुलाखती, प्रशिक्षण, शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जात असल्याने मुलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होत आहे. ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट संचालक प्रा.धनंजय आहेर, प्रा.राजेंद्र निंबाळकर यांनी यासाठी परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण संचालक प्रा दिगंबर खर्डे , सर्व प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले

प्रवरेच्या विद्यार्थ्यांची आय.सी .आय.सी .आय बँकेमध्ये निवड


अनिकेत जगदाळे

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेने लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्ये घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत जगदाळे या विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर म्हणून निवड केली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष. श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते .खासदार .डॉ.सुजय विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोकराव कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, संस्थचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे यांनी विशेष अभिनंदन केले.

बारावी परीक्षेचा निकाल

Desarda Khushi Prakash

90.46%

First Rank

Pawar Yash Sanjay

90.31%

Second Rank

Korde Subham Sunil

88.77%

Third Rank

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ग्रामीण भागातिल शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध १७ उच्चमाध्यमिक विद्यालयामधून परिक्षेसाठी बसलेल्या २ हजार ५११ विद्यार्थ्यांपैकी २ हजार २२५ विदयार्थी उत्कृष्ट श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

प्रवरा पब्लिक स्कूल. प्रवरानगर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कु. ख़ुशी प्रकाश देसर्डा ९०. ४६ टक्के, यश संजय पवार ९०. ३१ टक्के आणि शुभम सुनील कोरडे ८८. ७७ टक्के गन मिळवून संशेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय,आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल लोणी ,भगवतीमाता विद्यामंदिर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय. भगवतीपूर , प्रवरा माध्यमिक विद्यालय .वरवंडी, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय राहता आणि महात्माफुले विद्यालय दाढ या कनिष्ठ महाविद्यालयांचा विज्ञान शाखांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.

पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९२. ९९ टक्के , वाणिज्य ९१. २१ टक्के आणि कलाशाखेचा ५०. टक्के , प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल ८८. ८९ टक्के,प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल विज्ञान शाखा ९८. ०८,संगमनेर तालुक्यातील वरावंडी प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेचा ७४. १९ टक्के,शिबालापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा ९४. २९ टक्के, आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनचा कला शाखेचा ५६. १२ टक्के,विज्ञान शाखेचा ९४. ०१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६ टक्के, लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरचा कला शाखा ८६. २१ टक्के,विज्ञान शाखा ९८. ९० टक्के, राजुरी येथील श्री यशवंराव चव्हाण माध्यमिक विद्यालय कला शाखेचा६४. २९ टक्के, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूलचा विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के, पाथरे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कला शाखा९८१. २५ टक्के, विज्ञान शाखा ९९. २७ टक्के, वाणिज्य शाखा९२.८६ टक्के, दाढ बुद्रुख येथील महात्मा फुले विद्यालय कला शाखा७७. ७८ टक्के, विज्ञान शाखा१००. टक्के, कोल्हार येथील भगवतीमाता विद्यामंदिर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय.कला शाखा८२. १४ टक्के विज्ञान शाखा १०० टक्के, आणि वाणिज्य ९६. १५ टक्के, राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील कै. जनार्दन पाटील काळे विद्यालय कला शाखेचा ७२ टक्के, श्रीरामपूर तालुक्यातील फात्याबाद येथील प्रवरा विद्यानिकेतन कला शाखेचा८६. २१ टक्के लागला आहे.

* पैकीच्या पैकी मार्क्स – पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेतील शंतनू राजेंद्र सांबरे याने प्राणिशास्त्र विषयायामध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले तर याच कनिष्ठ महाविद्यालयातील रोहित बाबासाहेब गांधले या विद्यार्थ्याने क्रॉप सायन्स मध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले तसेच डेअरी सायन्स या विषयामध्ये कु. सेजल कैलास वाकडे या विद्यार्थिनीनेही १०० पैकी १०० गुण मिळविले

* १०० टक्के निकालाच्या शाळा – प्रवरा पब्लिक स्कूल. प्रवरानगर ,भगवतीमाता विद्यामंदिर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय. भगवतीपूर , प्रवरा माध्यमिक विद्यालय .वरवंडी, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय राहता आणि महात्मा फुले विद्यालय दाढ.

या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण संचालक प्रा दिगंबर खर्डे , सर्व प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले .

पायरेन्स एम.बी.ए महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड

मुंबई येथिल इंटिग्रेटेड इंटरप्राइजेस लि,या बहुराष्ट्रीय कंपनीने लोणी येथील पायरेन्स संस्थेच्या एम.बी.ए महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती पायरेन्स एम.बी.ए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी.बी दास यांनी दिली. या मध्ये कु. मयुरी बोबडे,कु. साधना वाडीतके,योगेश कटारे,गणेश मसकर,आदित्य बुर्हाडे,आकाश कोतकर,कु.प्राजक्ता घोलप,आणि कु. प्रिती मगर या विद्यार्थ्यांना या नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. थोरात म्हणाले कि, पायरेन्स च्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्रे नोकऱ्या प्राप्त होतात तेव्हा, त्यांच्या पालकांना होणारा आनंद आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना शालिनीताई विखे पाटील आदींनी अभिनंदन केले. मुख्य प्रशासकीय अधिकारी अण्णासाहेब पाचोरे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. मोहसीन तांबोळी आणि शिक्षक शिक्षकेतर सेवक या वेळी उपस्थित होते. 

प्रवरा अभियांत्रिकीच्या श्री. वसंतराव शेळके यांना सुवर्णपदक व राज्यस्तरीय स्पर्धेत निवड.

म प्रवरा ग्रामिण अभियंत्रिकी महाविदयालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असलेले श्री. वसंतराव तुकाराम शेळके यांनि योगा कल्चर असोसिएशन, अहमदनगर यांचेवतीने देण्यात येणारे सुवर्ण पदक प्राप्त केले असून मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे.

योगा कल्चर असोसिएशन, अहमदनगर यांच्या वतीने नुकतेच अकोले येथे जिल्हास्तरीय स्पर्धा व राज्य निवड चाचणीचे आयोजन केले होते

या स्पर्धेत ५० ते ६५ वयोगटात प्रवरा ग्रामिण अभियंत्रिकी महाविदयालय लोणी येथील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असलेले श्री. वसंतराव तुकाराम शेळके यांनी सुवर्ण पदक संपादन केले आहे. तसेच २ जुन २०१९ रोजी कुर्ला, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,खासदार डॉ सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक संचालक व एसव्हीआयटी सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. के.टी. व्ही. रेड्डी, प्रा दिगंबर खर्डे,प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, प्रा. आमले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कॅप्शन :- प्रवरा ग्रामिण अभियंत्रिकी महाविदयालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असलेले श्री. वसंतराव तुकाराम शेळके यांनि योगा कल्चर असोसिएशन, अहमदनगर यांचे वतीने देण्यात येणारे सुवर्ण पदक प्राप्त केले असूनत्यांचा सत्कार करताना मान्यवर….