पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे प्रा. दादासाहेब कोते यांच्या “फुलपाखरू ” या कवितेचा इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’ या पाठयपुस्तकांमध्ये समावेश

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाषा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे  प्रा. दादासाहेब कोते यांच्या “फुलपाखरू ” या   कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही सुलभ भरती मध्ये त्यांची  “झोका “ही कविता  समाविष्ठ असून  प्रा. दादासाहेब कोते यांच्यासारख्या ग्रामीण भागातील कवीच्या दुसऱ्या  कवितेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश झाल्याने अहमदनगर जिल्ह्यासह  इतर ठिकाणाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.

 विविध साहित्य संमेलनामध्ये वावर असणारे प्रा. दादासाहेब कोते यांचा ‘चांद्रगाणी,फुला-मुलांच्या कविता हे काव्यसंग्रह प्रकाशित असून, “फुलपाखरू ” या  कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश होण्यापूर्वी ‘सुलभ भरती’ मध्ये त्यांची  “झोका “ही कविता  विविध भाषेतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून समाविष्ठ आहे . त्यांच्या ‘पाखरं’या कवितेचा ‘मॉडर्न मराठी पोएट्री खंड -६ मध्ये इंग्रजी अनुवाद प्रकाशित झालेला आहे. निवडक किशोर मध्येही त्यांच्या अनेक कविता प्रसिध्द झालेल्या आहेत. तर,”शतकाची बालकविता” या संपादित ग्रंथामध्ये  ‘खेडे ‘ या कवितेचा समावेश आहे.प्रा. दादासाहेब कोते यांचे आकाशवाणीच्या पुणे आणि अहमदनगर केंद्रावरून अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. तसेच विविध वाड्मयीन दिवाळीअंकामधून त्यांच्या कविता, लेख नेहमीच प्रकाशित होत असतात. विविध वर्तमान पात्रातून त्यांच्या अनेक कविता आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत . 

प्रा. दादासाहेब कोते यांच्या  “फुलपाखरू ” या   कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश झाल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात,  भारत घोगरे, डॉ. अशोक कोल्हे, प्रा. दिगंबर खर्डे ,प्राचार्य डॉ. प्रदीप दीघे , डॉ. अण्णासाहेब तांबे , त्यांचे सहकारी प्राद्यापक , चाहते आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

आर्किटेक्चर शाखेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थीच उद्याचे आर्किटेक् बनून इतिहास घडवतील-देशमुख असोसिएटचे प्राचार्य श्री प्रशांत देशमुख

भारताच्या आर्थिक विकासामध्ये आर्किटेक्चरर यांचे योगदान मोठे असून, आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येमध्ये आता आर्किटेक्चररना  संधीची खऱ्या अर्थाने  सुरुवात असून या शाखेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थीच उद्याचे आर्किटेक्  बनून इतिहास घडविणार आहेत असे प्रतिपादन प्रशांत देशमुख असोसिएटचे प्राचार्य श्री प्रशांत देशमुख यांनी केले. 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कॉलेज मध्ये प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पालकांना  आर्किटेक्चर महाविद्यालयामधील सुविधांची माहिती व्हावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी -पालक आणि व्यवस्थापनाच्या एकत्रित मेळाव्यात  श्री प्रशांत देशमुख बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,प्रवरा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,रजिस्टार भाऊसाहेब पानसरे, प्रा. अनुराग दोशी, प्रा. श्रीकांत निकम,प्रा. दिपीका आरबट्टी, प्रा. कपील बुऱ्हाडे,प्रा. सुरेंद्र पवार,प्रा. सोनाली चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्या राजेश्वरी जगताप यांनी स्वागत भाषणात महाविद्यालयामध्ये ऊपलब्ध सुविधा,विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचा आलेख सादर केला.

ना. सौ. विखे पाटील म्हणाल्याकी,आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारताना ज्या ज्या अडचणी आल्या त्या येणाऱ्या पिढीला जाणवू नये म्हणून पदमश्री  विखे पाटील यांनी शिक्षणाचा पाया घातला ग्रामीण भागातील मुलांना विविध शैक्षणनिक सुविधा निर्माण व्हाव्यात या साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी मोठा विस्तार केला. आज ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या सर्व सुविधा खेड्यातच निर्माण झाल्या असून जागतिक पातळीवर अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत. नवीन आणि वसतिगृहामढील वातावरणाशी जुळवून घेत  अवास्तव खर्च आणि मोबाईलचा वापर या वर नियंत्रण विद्यार्थ्यांनी शिक्षण हेच उदिष्ट समोर ठेऊन अभ्यास करावा असे सांगताना पाहिजे त्या शैक्षणिक सुविधा साठी हट्ट धरणाऱ्या विदयार्थ्यांच्या गरज पूर्ण करण्यास शिक्षक आणि व्यवस्थापन नाकीयच तत्पर असेल असे त्यांनी सांगितले.

 या कार्यक्रमासाठी या वर्षी पहिल्या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालक मोट्या संख्येने उपस्थित होते. श्री देशमुख यांनी दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 
चौकट :- पुरंदर येथे होणाऱ्या नियोजीत विमानतळा साठी संपादित केलेल्या जमिनी मध्ये काही एतीहासिक वास्तु असून या वास्तूंचे मालक सध्या परदेशामध्ये स्थायिक आहेत. मात्र हा एतीहासिक ठेवा जतन करण्याची आवशकता असुन,या वास्तूंची देखभाल, संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी प्रवरेच्या आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुढाकार  घ्यावा असा प्रस्ताव ठेवताना,  हा  एतीहासिक ठेवा जतन करण्या याबाबत सरकाने निर्णय घ्यावा साठी आपण  पुढाकार घेऊ असे श्री प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमात सांगितले.

 फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कॉलेज मधील  प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पालकांना  आर्किटेक्चर महाविद्यालयामधील सुविधांची माहिती व्हावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी -पालक आणि व्यवस्थापनाच्या एकत्रित मेळाव्यात मार्गदर्शन करताना  श्री प्रशांत देशमुख,सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रा. दिगंबर खर्डे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, भाऊसाहेब पानसरे, प्रा. अनुराग दोशी, प्रा. श्रीकांत निकम,प्रा. दिपीका आरबट्टी, प्रा. कपील बुऱ्हाडे,प्रा. सुरेंद्र पवार,प्रा. सोनाली चासकर आदी.

ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी दरी नक्कीच कमी होईल- नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात. मेगाभरती मेळाव्यात ४० नामनिकत कंपन्यांचा सहभाग , आठ आजाराच्या वर विद्यार्थी सहभागी

साधारणतः  विकसित इंडिया आणि अविकसित ग्रामीण भारत असेच  चित्र आपल्या देशाचे आहे असे सांगताना , ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी असी असलेली दरी नक्कीच कमी होईल असा विश्वास नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी व्यक्त केला. 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या मेगा भरती मेळाव्याच्या उदघाट्न प्रसंगी डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, एच. ए. एल. प्रवरा च्या संचालिका सुस्मिता माने,बोर्ड ऑफ  अँप्रेन्टीसशिप  ट्रेनिंग (BOAT) पश्चिम विभाग मुंबईचेडेप्युटी डायरेक्टर एन. एन. वडोदे,विखे पाटील पॉलिटेक्निचे माजी विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद डिस्टिलरी वालचंदनगरचे डायरेक्टर श्री करण यादव ,अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि वारले कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. अनिता गुज्जर,  डीआरडीओ अहमदनगरचे श्री साबळे, विखे पाटील फौंडेशंनच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश नाईक ,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रीक विभागाचे संचालक डॉ.  के टी व्ही रेड्डी, कृषी संचालक डॉ.खेतमाळस, प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी  आदी मान्यवर उपस्थित होते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी या मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. 

या मेगा नोकर भरती मेळाव्यासाठी व्हिआरडिई, इपिटोम, इटॉन इंडिया,बॉश्च, केप्लास्ट, होल्मकेके, व्हेरॉक इंजिनिअरींग, इके इलेक्ट्रॉनिक्स, बर्खार्ड कॉम्प्रेशन,एल अॅण्ड टी, एन एन नागा, आदी  ४० हून अधिक नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित अशा कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर, सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखती मध्ये सहभाग घेतला. आणि आणखी तेव्हढेच विदयार्थी मुलाखती साठी या दिवशी हजार झाले. 

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले कि, ग्रामीण तरुण् स्वयंपूर्ण झाला पाहिजे हे विखे पाटील यांचे स्वप्न होते. आज तरुण पिढी समोर रोजगारासाठी अनेक आव्हाने आहेत. अश्या परिस्थितीमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी. करण यादव, सौ. अनिता गुज्जर यांनी आपले अनुभव सांगताना प्रवरेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच पाहिजे ती मदत केली जाईल असे सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विदयार्थीनिनी परिश्रम घेतले. 

चौकट :- * ना. सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या कि, ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात मात्र, त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो. म्हणूनच त्यांच्या मध्ये  आत्मविश्वासनिर्माण करण्याची आवश्यकता असून  ग्रामीण भागातील मुलांनीही आता घराजवळ नोकरी शोधण्यापेक्षा बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. * भरती मेळाव्यासाठी ४० हुन अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग * पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखतीमध्ये सहभाग तर, आणखी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनाही मुलाखतीमध्ये सामावून घेण्यात आले. 

नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

 बालवयातील मुलांचा भविष्यातील कल ओळखून तो कल सर्वार्थाने विकसित करण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा या नव्या पिढीचे जीवन घडविणाऱ्या अस्याच असल्याचे सांगताना. तणावमुक्त वातावरण असलेल्या  या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या  क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांना आपल्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिला.        

अभिनेते सयाजी शिंदे हे साईबाबांच्या दर्शनानिमित्त शिर्डी येथे आले असता त्यांनी श्री अमोल जाधव आणि बाळासाहेब आहेर यांच्या समवेत प्रवरा पब्लिक स्कुलला सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रवरा पब्लिक स्कुलमधील विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या. येथील प्रशस्त मैदाने,आणि अत्याधुनिक सुविधांचे त्यांनी कौतुक केले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वसतीगृह जीवन अभ्यासासाठी सर्वात आदर्श वातावरण प्रदान करते. विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ आणि योग्य वातावरण मिळते असे सांगताना  तणावमुक्त मनाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.      

प्राचार्य सयाराम शेळके यांनी सयाजी शिंदे यांचा पुष्प गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. या वेळी उपप्राचार्य के.टी अडसूळ,एम ई जोसेफ,सौ. मीना जगधने,सौ. सिमा क्षिरसागर, एस व्ही गोडगे,एस.एस.झोटिंग भाऊसाहेब गटकळ यांचेसह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्तित होते.  

फोटो कॅप्शन :-प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा पब्लिक स्कुल ला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी स्वागत करताना प्राचार्य सयाराम शेळके,उपप्राचार्य के.टी अडसूळ, श्री अमोल जाधव,बाळासाहेब आहेरएम ई जोसेफ,सौ. मीना जगधने,सौ. सिमा क्षिरसागर, एस व्ही गोडगे,एस.एस.झोटिंग भाऊसाहेब गटकळ आदी.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम

मानवाने विकासासाठी निसर्गाचा केलेला ऱ्हास आणि पर्यायाने  निसर्गाचा ढासळलेला समतोल रोखण्यासाठी तसेच मानव जातीच्या उज्वल भविष्यासाठी पृथ्वीला तिचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी  वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली या प्रसंगी डॉ. खेतमाळस बोलत होते. याप्रसंगी  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालक अप्पासाहेब दिघे साहेब,लोणी खुर्द गावच्या सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच श्री. सुवर्णा घोगरे,ग्रामविकास अधिकारी संतोष ठिगळे,कामगार तलाठी श्री.कोळगे ,सामाजिक वाणीकरणाचे फॉरेस्ट रेंज अधिकारी बबनराव फटांगरे,  तालुका कृषि मंडळ अधिकारी नारायण लोळगे,सर्व शिक्षक वृंद आणि रासेयो चे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.मधुकर खेतमाळस म्हणाले कि,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंगोपन केले पाहिजे, वृक्षांमुळे शुद्ध हवा मिळते तसेच प्रदूषण रोखले जाते, आजारांपासून बचाव: दम्याची शक्यता ३३% कमी होते, हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते अश्या विविध फायदे होतात म्हणून वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे असे ते म्हणाले.            

राहता कृषि मंडळ अधिकारी  नारायण लोळगे म्हणाले की,   वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही   प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे असे सांगताना कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.            

कार्यक्रम यशस्वी  पार पाडण्यासाठी प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.विशाल, केदारी,प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.मिनल शेळके,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा आदिक, प्रा.श्रद्धा रणपिसे, रा.सो.यो चे सर्व स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन ;- लोणी येथील  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली या प्रसंगी सहसचिव भारत घोगरे,डॉ.मधुकर खेतमाळस, संचालक अप्पासाहेब दिघे साहेब, सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच सुवर्णा घोगरे, संतोष ठिगळे,श्री.कोळगे , बबनराव फटांगरे,  नारायण लोळगे  आदी.

विजय दिन साजरा

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे विविध कार्यक्रम आयोजित करून विजय दिन साजरा करण्यात आला असी माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.            

प्रारंभी भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़. विद्यालयाचे माजी सैनिक डी. एस निबे यांनी. कारगिल युध्दाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हरेश भांडारकर आदर्श रठोड , भूषण पारीख यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. प्रथमेश साळुंके आणि अनुराग राऊत यांनी “चिठ्ठी अति है, या गीताद्वारे देशभक्तीपर भावना व्यक्त करून उपस्थितांची माने जिंकली. तसेच ऋषिकेश शिंदे,जयदीप दुशिंग, अवधूत गिमावकर यांनी देशभक्ती बात मार्गदर्शन केले.        

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सैनिकांच्या मुलांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देताना. त्यांनीही  वडिलांचा वारसा पुढे चालवावा असी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.सूत्रसंचालन प्रा. राजेश माघाडे आणि प्रा. रमेश दळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील एन सी.सी. छात्रांना प्रशिक्षण देणारे ५७ महाराष्ट्र बटालियनचे सुबेदार सुरेंद्रसिंग आणि हवालदार गौतम जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. कारगिल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याची शौर्यगाथा दाखविणारा ‘एल.ओ सी (लाईन ऑफ कंट्रोल)’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल विजयी  दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम सादर करताना विदयार्थी.

लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती प्राचार्य  ऋषिकेश औताडे यांनी दिली.              

या कार्यक्रमात  तृतीय वर्षातील विद्यार्थी व रा.से.यो.स्वयंसेवक  विक्रमसिंह पासले याने दोन्ही महापुरुषांचे देशप्रेम, दुरदृष्टी व त्याग आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांसमोर मांडला.तर केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती व शिवजयंती व गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना एकोपा निर्माण करण्याचे काम केले तर चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी प्राण पणाला लावले असे प्रतिपादन स्वयंसेवक सचिन वाघ याने केले.यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे, रा.सो.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे , शिक्षक  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अवंतिका सानप हिने केले तर आभार दिप्ती शेळके हीने मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक ओमप्रकाश शेटे,सचिन वाघ,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया मध्ये  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करताना संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे,  प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे ,  अवंतिका सानप  दिप्ती शेळके ओमप्रकाश शेटे,सचिन वाघ,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे आदी.

पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा

अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकाचे कौशल्यज्ञान महत्वाचे आहे. कोणत्याही एका कौशल्यावर आपले पुढील करीयरची दिशा ठरते. जिद्द व मेहनत घेतल्यास यश हमखास मिळत असल्याचे मत अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे यांनी व्यक्त केले.       

पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वियार्थ्यांना मार्गदर्शन करतान ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक बन्सी तांबे पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा.धनंजय आहेर, उपप्राचार्य प्रा.नामदेव गरड, प्रा. सोमनाथ लव्हाटे, विभाग प्रमुख राजेंद्र साबळे, विभाग प्रमुख प्रा.डी.के.शिरसाठ, प्रा. इ.आर.घोगरे, प्रा.आर.व्ही.लावरे, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.         

बन्सी पाटील तांबे म्हणाले की, प्रवरेत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारानेच प्रवरेची घोडदौड सुरू असून संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नविन उपक्रम सुरू आहेत. प्रवरेतील विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक महत्वांच्या पदांवरती कार्यरत आहेत. देशातील अग्रगण्य संस्था म्हणून प्रवरेचे नाव आहे.       

प्राचार्य डॉ. विजय राठी म्हणाले की, उत्कृष्ठ अभियंता होण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान देखील मिळविणे गरजेचे आहे. या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व क्षेत्रात परिपुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध कंपन्यामधून विद्यार्थ्यांना दरवर्षी भेटी व प्रशिक्षण दिले जात असल्याने मुलाखतीच्यावेळी विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कँम्पस मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.       

यावेळी प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.रवींद्र काकडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.सोमनाथ लव्हाटे यांनी आभार मानले.      

फोटोकॅप्शन – पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थी व पालकमेळाव्यात मार्गदर्शन करताना अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे, समवेत प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी.

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

लोणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली. 

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी प्रा. राहुल विखे यांनी लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र व  त्यांची स्वातंत्र्यासाठीची चळवळ  या विषयी माहिती दिली तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले. 

फोटो कॅप्शन :-लेणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक  कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले.

जल शक्ति अभियान

 लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी  महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी दिली.      

प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये   राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काॅॅॅलेज कॅॅॅॅम्पस दिवस साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थीनी महाविद्यालयातील उत्तर परिसर ते दक्षिण परिसर या या दरम्यान वृक्ष दिंडी काढण्यात आली होतीं या वृक्ष दिंडीची सांगता महाविद्यालयात करण्यात आली  महाविद्यालयातील स्थापत्य विभागाच्या विद्यार्थीनी पर्यावरणावर आधारित जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले वाढती वृक्षतोड, पर्यावरणाचे असंतुलन त्यामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जल है तो कल है यासाठी पाणी बचतीचे महत्व,वृक्ष संवर्धन आदि विषयावर विद्यार्थीनी या पथनाट्याद्वारे जनजागृती केली या पथनाट्याचा उद्देश सृष्टी भाबड या विद्यार्थीनीने मांडला तर पथनाट्याचा शेवट तुकाराम पवार व गौरी विखे यांनी केला    

अभियांत्रिकी महाविद्यालयालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांनी वृक्ष दिंडीचा समारोप करताना सांगितले की दिवसेंदिवस पर्यावरणाचा ह्रास वाढत असल्याने त्याचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे भविष्यत पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थीनी शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करण्याचे त्यांनी आवहान करीत पथनाट्याचे कौतुक केले   

 स्थापत्य विभागाचे प्रमुख आर पी आमले,प्रा एल के लहामगे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले शेवटी प्रा एन ए कापसे यांनी सर्वांचे अभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले      

फोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आदी  .

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातविविध कार्यक्रमाचे आयोजन करून  गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

     महाविद्यालयातील पदवीच्या शेवटच्या वर्षातील  विद्यार्थ्यांनी या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन एक आगळा वेगळा सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली  मनोगते  व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित करत, गुरु – शिष्याची चालत आलेली परंपरा यावर विचार मांडले, सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये  गुरुपोर्णिने निम्मित आयोजित कार्यक्रम प्रसंगी  प्राचार्या डॉ. प्रिया राव, प्रा. नचिकेत दिघे, प्रा संजय भवर, प्रा सुनयना विखे,प्रा रवींद्र जाधव आणि विद्यार्थी. 

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची  माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.    

या कार्यकर्माचे  महाविद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले व महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली  मनोगते  व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, लोकमान्य टिळकांचे समाजकार्य तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अधोरेखित केले तसेच थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्यासंघर्षमय काळातील त्यांची कायदेभंगाची चळवळीतील सहभाग अश्या अनेक प्रमुख बाबींना उजाळा दिला , सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  साजरीकरताना  प्राचार्या डॉ. प्रिया राव समवेत शिक्षक आणि विद्यार्थी