स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल उद्योगांच्या मागे उभे राहील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देशात उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी प्रवरा रिचर्स इनोव्हेशन स्टार्टअप्स आणि सुक्ष्म लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्टार्टअप्स डे निमित्त इनोव्हेटिंग फॉर इंडीया आणि इनोव्हेटिंग फ्रॉम इंडीया अंतर्गत विविध नवं उद्योजकांशी संवाद साधतांना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे तांञिक अधिकारी डॉ. प्रविण कदम, सेन्टींग फ्रिडम टेक्नालॉजी, पुणेयेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी विद्यार्थी राहुल हुडेकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, इनोव्हेशन कॉसिल्सचे अध्यक्ष डॉ. संजय कुरकुटे, समन्वयक डॉ. सुभाष मगर, आयआयटी मुंबई टिगर्स लॅबचे समन्वयक आर. आर भांबारे आदीसह विभाग प्रमुख आणि उद्योजक उपस्थित होते.
देशात आज स्टार्टअप्सची निर्मिती मोठ्या प्रमाण होत आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पानेला बळकटी देतांना नवोद्योगांनी विविध क्षेत्रात रोजगाराच्या लाखो संधी निर्माण केल्या आहेत. असे ना. विखे पाटील यांनी सांगून ग्रामीण भारत हा लवकरचं उद्योगशील होणार आहे. स्टार्टअप्स च्या माध्यमातून सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी शासकीय विविध योजना, विद्यापीठ संशोधन, विविध कंपन्याचे तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून मद्दत ही होत असल्याने राज्यासह ग्रामीण भागात ही नवोद्योगांची संख्या वाढत आहे. असे सांगून प्रवरेच्या या केंद्राचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी डॉ. प्रविण कदम आणि राहुल हुंडेकरी यांनी थेट संवादातून विविध अडचणी आणि यावर उपायोजना सुचविल्या. प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी प्रवरा अभियांत्रिकीच्या माध्यमातून सर्वाना नवीन स्टार्टअप्स साठी मार्गदर्शन केले जात आहे. विविध सुविधा त्याना उपलब्ध असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकांत डॉ. संजय कुरकुटे यांनी प्रवरेच्या इनोव्हेशन संशोधन केंद्राचा आढावा घेत सप्टेंबर 2022 पासून ६३ स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे यामध्ये ग्रामीण युवक, प्राध्यापक, उद्योजक यांचा सहभाग महत्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवीन शिक्षण पद्धती नुसार अभियांत्रिकाची वाटचाल सुरू झाली आहे. यावेळी स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या उद्योजकांचा गौरव ना. विखे पाटील यांनी केला.
प्रजासत्ताक संचलनासाठी प्रवरेच्या वैष्णवी मापारी यांची निवड..
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाची तृतिय वर्ष बीसीए विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी वसंत मापारी हिची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचलनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चमुमध्ये निवड झाली आहे ती १७ जानेवारीपासून सहभागी होणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी दिली.
तिच्या या निवडीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली नवले उपप्राचार्य प्रा . राजश्री तांबे, विभाग प्रमुख प्रा संजय वाणी , डॉ कांचन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या निवडी बद्दल महसूल मंञी आणि संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.
प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याची माहीती प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी दिली.
दर्जेदार शिक्षण आणि शिक्षणासोबतचं व्यक्तीमत्व विकासावर विविध व्याख्याने, विषयांतील विविध करीअर संधी यामुळे प्रवरेतील विद्यार्थी हे जगाच्या विविध विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत अंतीम परिक्षेत यश संपादन करणारे हितेश दिनेश पाटील यांची कॉव्हेन्टरी युनिव्हर्सिटी यु.के. येथे मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट,प्रथमेश प्रशांत मोहोळे यांची अल्गोमा युनिव्हर्सिटी कॅनडा येथे मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट आणि प्रेरणा संदीप भोकनळ यांची अल्गोमा युनिव्हर्सिटी कॅनडा येथे मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यासाठी निवड झाली आहे.
त्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,संस्थेचे विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत अंतर्गत विज्ञान, गणित आणि कलाप्रदर्शन…
गणित-विज्ञान हा विषय जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. हा विषय मुलांच्या कल्पना शक्तीला संधी देणारा आहे. प्रदर्शनामुळे मुलांना हा विषय सोपा होत असून यामुळे विषयाची आवड मुलामध्ये निर्माण होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत अंतर्गत विज्ञान, गणित आणि कलाप्रदर्शन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालय येथे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या प्रवरेतील शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी होणारे हे प्रदर्शन माहीती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रयोगांची माहीती मिळते. हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. म्हणूनच शालेय जीवनातून या प्रदर्शनाची गरज आहे. शेतक-याची मुले आज उच्च शिक्षणातून पुढे जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेत असतांना विविध उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविल्याने आज नगर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आघाडीवर असल्याचे सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी स्पर्धेच्या युगात प्रवरेचे शैक्षणिक उपक्रम हे विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण ठरत असून यामुळे त्याच्या कला गुणाला मोठी संधी मिळते.
प्रास्ताविकामध्ये संजय देशमुख यांनी प्रदर्शनाचा आढावा घेत यामध्ये प्रवरेच्या १०० शाळामधुन १६२ उपकरणे सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक इलग यांनी तर आभार सुभाष कडू यांनी मानले.
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचे कृतीसत्र
लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राचे आयोजन बुधवार दि. १० ते गुरवार दि ११ जुलै २०१९ या कालावधीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी दिली.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून बहिःशाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे हे या दोन दिवस चालणाऱ्या कृतीसत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व वक्ते,ग्रंथ अन्वेषक आणि केंद्रवाह यांनी या चर्चा सत्रासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महिला महाविद्यालयाच्या केंद्रवाह प्रा. अर्चना घोगरे यांनी केले आहे.
Education Leadership Award
Pravara Rural Engineering College, Loni received “EDUCATION LEADERSHIP AWARD”
The award is in recognition of leadership, development, marketing an institute and industry interface.
The 10th ABP NEWS National Education Awards 2019 are well researched and chosen by an independent jury and a panel of professionals who believe in nurturing Talent and in recognizing the best of the best …
Award was presented in a grand award ceremony on 4th July, 2019 at Taj Lands End, Bandra, Mumbai, Mr.Kapil Tamhane & Mr. Digambar Rane received the honour on behalf of Dr. Sanjay Gulhane, Principal.
प्रवरेच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये उत्तुंग यश
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेंअंतर्गत नुकत्याच प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेज मध्ये संपन्न झालेल्या औरंगाबाद येथील हर्मन फिनोकेम लिमिटेड या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये ४६ मुलांची नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
हर्मन फिनोकेम लिमिटेड या कंपनीतर्फे कंपनीचे मिस. नीलांजन भट्टाचार्य एच. आर. ए. पी. आय., एच. आर. मिस. स्वाती थोरात व त्यांची टीम इंटरव्ह्यूसाठी आली होती. यावेळी संस्थेतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. इंटरव्ह्यूसाठी ११८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी संस्थेत शिकत असलेल्या ४६ मुलांची निवड करण्यात आली आहे. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती संपन्न झाल्या. .
प्रा. धनंजय आहेर यांनी म्हणाली कि, कि संस्थेचे अध्यक्ष.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मुलांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतो ज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत.या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांनी सांगितले कि आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे व या पुढेही महाविद्यालय त्यासाठी काम करत राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेजचे सन २०१८-१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग व इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निकालापूर्वी नोकरी मिळाल्या आहे.
वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा न. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डो. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.