प्रवरा फार्मसी लोणी येथेराष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला असल्यावही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

प्रारंभी मेजर ध्यानचंदयांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याह स्ते “ फिटइंडियामुवमेंट “ या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण महाविद्यालयात करण्यात आले तसेच त्या अंतर्गत १०,००० पावले (स्टेप) चालण्याचा उपक्रमव १०० मीटर धावण्याची स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आली.

तसेच हॉकी चेजादुगार मेजरध्यानचंद यांच्या जन्म  दिना निमित्त दर वर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अंतर्गत महाविद्यालयात इंटरक्लास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या मध्ये महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांप्रसंगी प्राचार्या डॉ. प्रिया राव आणि विद्यार्थी. 

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा भित्तीपत्रक स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले याने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास भारतातून  प्रथम पारितोषिक मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी दिली.             

या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण ३८  भित्तीपत्रिकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये  लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून ५ विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये विक्रमसिंह पासले याला प्रथम क्रमांकाचे रु.३००० पारितोषिक व प्रशस्तीपत्रक मिळाले.या यशासाठी त्याला प्रा. महेश चंद्रे, प्रा.श्रद्धा रणपिसे,डॉ.अभिजीत दसपुते व प्रा.सारिका पुलाटे यांचे मार्गदर्शन लाभले तर सुप्रिया काळे,कोमल कुलत,धनश्री टेके व शिवांजली वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.या स्पर्धेतून मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील मुक्त ग्रंथालयास पुस्तके भेट देणार असल्याचे विक्रमसिंह पासले याने जाहीर केले.               

या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री  आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन : सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील भारतातून  प्रथम पारितोषिक . मिळविलेला तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले. 

सार्वजनिक गणेश उत्सवाला “सामाजिक प्रबोधनाची’ जोड देतानाच खेड्यातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास करणाऱ्या ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सवा’चे आयोजन

राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज प्रबोधनाबरोबरच प्रवरा परिसरातील मुला-मुलींच्या उपजत कला,क्रिडा गुणांना वाव देताना स्थानिक नागरिकांना आपल्याच मुलांच्या सादरीकरणातून मनोरंजन व्हावे आणि  खेड्यातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वासही  निर्माण व्हावा या करिता सोमवार दिनांक २ ते गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सव २०१९ “चे आयोजन करण्यात आले आहे.           

प्रवरा आणि गणेश परिसरातील राहता,श्रीरामपूर, राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालये, गणेश प्रसारक मंडळ, सेंट जॉन स्कूल ,प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल , नगर पालिकांच्या शाळा आदींसह  विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना या  सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवामध्ये सामावून घेण्यात आलेले आहे. यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागाबरोबरच प्रवरा परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या  विविध कमिट्या  स्थापन करून अतिशय सुसुत्रतबद्ध आणि नेटके  नियोजन करण्यात आले आहे.               

सोमवार दिनांक २ सप्टेंबर  रोजी प्रवरा परिसरातील लोणी, प्रवरानगर,कोल्हार,सात्रळ, आणि आश्वी या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना होऊन या महोत्सवाला सुरवात होणार आहे.   सार्वजनिक गणेश उत्सवाला  “सामाजिक प्रबोधनाची’ जोड देऊन  सामाजिक शांततेची पावती ” ठरणाऱ्या या   ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सवा’च्या माध्यमातून  तरुणांमधील सांघिक भावना व्यापक करताना त्यांच्यातील कलागुणांचा विकास होण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहेच परंतु मनोरंजनासाठी व्यावसायिक कलाकारांकरिता  होणारा  खर्च टाळून तो आपल्याच  मुला-मुलींसाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी होत असल्याने खेड्यातील मुलांमध्येही आत्मविश्वास निर्माण करणारा ठरेल आणि  स्थानिक नागरिकांनाही आपल्या मुला – मुलींचे कौतुक पाहताना येईल आणि मनोरंजन होईल विशेषतः महिलांना मनोरंजनाची संधी या माध्यमातून मिळणार आहे.       

एकंदरच खेड्यातील मुला-मुली मधील उपजत कला, क्रीडा गुणांचा विकास, स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक भावनेची निर्मिती, समाज प्रबोधकरांच्या वाणीतून सामाजिक प्रबोधन, पालकांना आपल्या मुला-मुली मधील कला-क्रीडा गुण हेरतानाच स्थानिक नागरिकांना करमणुकीचे साधन असी तरुणाईच्या अवांतर विकासाची पंच सूत्री या ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सवाच्या  माध्यमातून साधली जाणार आहे.उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी विविध बक्षिसांचे लकी ड्रॉ  ठेवण्यात आली असून गुरुवार  दि १२ सप्टेबर २०१९ रोजी सत्यनारायण पूजा होऊन गणपती वित्सर्जनाणे या महोत्सवाची सांगता होणार आहे. 

प्रा.सौ.वैशाली खिलारी –घोलप यांना पीएच.डी. पदवी प्रदान

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,प्रवरानगर  येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.सौ.वैशाली खिलारी –घोलप यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना केलेल्या संशोधनाबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान केली.त्यांना वायल्ड प्लॅंट्सच्या फळांच्या अंशतः कृती आणि पौष्टिक मूल्यांवर  संशोधन केले . 

आपल्या संशोधनामध्ये त्यांनी औरंगाबाद ,अहमदनगर, पुणे, व नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या जंगली फळांचे सर्वेक्षण करून त्यामधील प्रथिने , कर्बोदके, जीवनसत्व क ,प्रती ऑकसीडीकारक तत्व यांचे विश्लेषण करून नेहमी वापरात येणाऱ्या फळाबरोबर तुलना करून जंगली फळांचे महत्व अधोरेखित केले. याविषयीचे त्यांचे संशोधन वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत या संशोधनासाठी त्यांना इंद्रराज आर्ट्स कॉमर्स आणि सायंस महाविद्यालय सिल्लोडचे प्राचार्य डॉ. प्रमोद शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

 त्या हनुमंतगाव तालुका – राहता येथील श्री. सूर्यभान रामकृष्ण घोलप यांच्या स्नुषा असून टाकळी ढोकेश्वर तालुका- पारनेर  येथील  इंजी. विजय खिलारी यांच्या भगिनी आहेत त्यांना प्राचार्य डॉ.आर. के. आहेर ,डॉ. टी.एस. थोपटे ,डॉ.डी.आर.ठुबे ,प्राचार्य एम एस अनाप ,व डॉ.सोमनाथ घोलप यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल अड.शिवाजीराव अनभुले आणि श्री. भागवत बापुजी पा. घोलप यांनी अभिनंदन केले.

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथे वार्षिक अंतर कुलिन जलतरण स्पर्धा मध्ये १२, १४ व १७ या विविध वयोगटातील ११० विद्यार्थ्यांनी  सहभाग घेऊन या स्पर्धा . मोठ्या उत्साहात पार पडल्या. असल्याची माहिती प्राचार्य सुशील शिंदे यांनी दिली.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा अभिमत विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी डॉ.  सुनील बुलार उपस्थित होते. यामध्ये  पेशवा सदन विजयी घोषीत झाला तर द्वितीय स्थानाचे मानकरी मोरया सदन ठरले. वैयक्तिक  स्पर्धेत विररुद्रप्रताप  आहेर, धीरज खराटे ,चंद्रकांत पाटील यांनी विविध वयोगटात प्रथम स्थान पटकावले. यावेळी शाळेचे डायरेक्टर डॉक्टर के जगन्नाथन, उपप्राचार्या हेमांगी कसरेकर, निमसे सर, सदनिका प्रमुख सचिन सर, श्री आर डी शिंदे, निलेश उमक, अरुण बोधक, मनोज मांजरे,सौ. संगिता पलाल, श्रद्धा  विखे ,जब्बीन  शेख क्रीडाशिक्षक रवींद्र भणगे, राजू तांबे, स्विमिंग कोच श्रीशैल जेवरे उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन :-प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या  वार्षिक अंतर कुलिन जलतरण स्पर्धा विजयी संघासोबत  डायरेक्टर डॉ.  के जगन्नाथन प्राचार्य सुशील शिंदे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी डॉ.  सुनील बुलार, उपप्राचार्या हेमांगी कसरेकर विजयी जलतरणपटू विररुद्रप्रताप  आहेर, धीरज खराटे ,चंद्रकांत पाटील,सोबत  निमसे सर, सदनिका प्रमुख सचिन सर, श्री आर डी शिंदे, निलेश उमक, अरुण बोधक, मनोज मांजरे,सौ. संगिता पलाल, श्रद्धा  विखे ,जब्बीन  शेख क्रीडाशिक्षक रवींद्र भणगे, राजू तांबे, स्विमिंग कोच श्रीशैल जेवरे आदी.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत कॅम्पसइंटरव्हयुव मध्ये वार्षिक सात लाख रुपयांचे पॅकेजची नोकरी

शैक्षणिक प्रगतीत सतत उत्तम कामगिरी करतअसलेल्या व विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट संदर्भात नेहमीच अग्रेसरअसलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील  कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागात सध्याच्या २०१९-२० बॅचच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या अपेक्षा आहेर, मेघना देव्हारे, प्राजक्ता बेंद्रे व  विकास खेमनर यांना(टीआयएए) ग्लोबल बिझनेस सर्विसेस या बहुराष्ट्रीयनामांकित कंपनी मध्ये सात लाखांचे (७.०० लाख) भरघोस पॅकजसह तर इन्फॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगविभागाच्या विशाखा शेडगे हीची ब्ल्युपाईन्याप्पलया  बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये ३.६० लाखाच्यापॅकेजसह निवड झाली आहे. संस्थेचे संस्थापक पद्म डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंतीच्या दिवशी ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री  मा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अशी माहिती प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.  ह्या विद्यार्थांनी या यशाचे श्रेयप्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिले. त्यांना ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफीसर, प्रा. राजेंद्र निंबाळकर, डॉ. सचीन कोरडे व प्रा. दिपक साळुंके सहकार्य  लाभले.

या प्रसंगी प्रा. धनंजय आहेर यांनी सांगितले   संस्थेचेअध्यक्ष  व  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील मा. नामदार राधाकृष्ण विखेपाटील यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवराग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुलांच्याप्लेसमेंटसाठी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वविकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतोज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनानोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालयविद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारेकौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत. तसेच महाविद्यालयाने या वर्षी अनेकराष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार केला असल्याने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना  याचा नोकरीमिळण्यासाठी फायदा होणार आहे.या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरइंजिनियरींग व इन्फॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगविभागाच्या सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा   ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाम. सौ. शालिनीताई विखे पाटील,  खासदार सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीणशिक्षण संस्थेचे डायरेक्टर जनरल मा.डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, तांत्रिक संचालक वएसव्हीआयटी सिन्नरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. के टी व्ही रेड्डी, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर,  ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे, प्रा. राजेंद्र निंबाळकर, कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. शरद रोकडे,इन्फॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी  विभागाच्या विभागप्रमुख प्रा. स्वाती राऊत, डॉ. सचीन कोरडे, प्रा. दिपकसाळुंके, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रम

पूर्वीच्या काळी मुलींना शिक्षण देणे क्षम्य नव्हते मात्र,समाजधुरिणांनी खूष खस्ता खाऊन निर्माण केलेल्या सुविधांचा उपयोग करून घेणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञाचा योग्य वापर करावा असे सांगताना वर्तमान जगताना भूतकाळ आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी वाचन करा असा सल्ला यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि कवयत्री अरुणा ढेरे यांनी प्रवरेतील विद्यार्थ्यांना दिला. 

प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह पुरस्कृत आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय आयोजित सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेबरोबरच विविध प्रवेश परीक्षांमध्ये विषेश गुण  संपादन केलेल्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रमात अरुणा ढेरे बोलत होत्या. या प्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, कार्यकारी संचालक श्री ढोणे ,भारत घोगरे,बन्सी पाटील तांबे,आप्पासाहेब दिघे,किशोर नावंदर,डॉ. अशोक कोल्हे, प्रा. दिगंबर खर्डे,डॉ. प्रदीप दिघे,डॉ. रामचंद्र रसाळ,प्रा. दत्तात्रय थोरात,  डॉ. अण्णासाहेब तांबे ,कर्नल भरत कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. 

अरुणा ढेरे म्हणाल्या कि, पद्मश्री विखे पाटील यांनी शिक्षणासाठी निर्माण केलेल्या सुविधांचा उपयोग करून घेताना तंत्रज्ञानाच्या साथीने चांगले ज्ञान आत्मसात करताना विचार आणि दिशा पुस्तकांच्या बाजूने वळवा  असे सांगितले.

यावेळी  पद्मश्री विखे पाटील विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये ९५. ६० टक्के गुण प्रथम आलेल्या संचित खेमणर, प्रवरा पब्लिक स्कुल मधील कु. साक्षी शिरसाठ ९५. ४० टक्के ,प्रवरा सेंटरला पब्लिक स्कुल मधील ओम वैद्य  ९५. टक्के,तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये प्रवरा पब्लिक स्कुल मधील कु. ख़ुशी देसरडा ९०. ४६ टक्के, पाथरे येथील श्री छत्रपतीशिवाजी विद्यालयातील कु. श्रद्धा घोलप ८७. ६९ टक्के, आश्वी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनची कु. तेजाळ गायकवाड ८५.३८ टक्के,आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवरा पब्लिक स्कुल मधील यश पवार ९०.३१ टक्के, शुभम कोरडे ८८.७७ टक्के, आणि पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील अथर्व मिसा८४.९२ टक्के, तसेच एम एच टी- सी इ टी परीक्षेमध्ये  प्रवरा परिसरामधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल काळे ९९.७०, मयूर घोरपडे ९९.५३,योगेश कुमकर ९९.३८ आणि जे.इ.इ परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रवरा परिसरातील प्रवरा पब्लिक स्कूल खुषी देसरडा ९०. ३५,यश पवार ९०. १७ आणि राहता येथील कला,विज्ञान  व वाणिज्य   कनिष्ठ महाविद्यालयातील ऋषिकेश मोरे ८८.०० , नीट परीक्षे मध्ये ४१५ गुण मिळविलेल्या विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. प्रज्ञा यालमामे ,४०८ गुण  मिळविलेल्या प्रवरा पब्लिक स्कुल मधील शुभम कोरडे आणि ३८७ गुण मिळविलेल्या कु. या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वैष्णवी हिंदोळे या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. या वेळी अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोस्थाहन मिळावे या साठी सुरु करण्यात आलेल्या पद्मभूषण मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील अपंग शिष्यवृत्ती मध्ये दिक्षा रोकडे, प्रतीक्षा आगाशे ,शुभम बोऱ्हाडे ,निकिता कापकर,आदित्य कांदळकर,रवींद्र पगारे, नितीन तिखे,रोहिणी साळवे या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यात आली. 

आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले कि, प्रवरा परिसरामध्ये दर ५ कि.मी च्या आत माध्यमिक मविद्यालय सुरु झाल्या मुळेच ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षणापर्यंत पोहचवू शकल्या . आज तांत्रिक शिक्षणाचे मोठे दालन प्रवरे मध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

 फोटो कॅप्शन :-  प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह पुरस्कृत आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय आयोजित सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेबरोबरच विविध प्रवेश परीक्षांमध्ये विषेश गुण  संपादन केलेल्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण  प्रसंगी अरुणा ढेरे समवेत माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, कार्यकारी संचालक श्री ढोणे ,भारत घोगरे,बन्सी पाटील तांबे,आप्पासाहेब दिघे,किशोर नावंदर,डॉ. अशोक कोल्हे, प्रा. दिगंबर खर्डे,डॉ. प्रदीप दिघे,डॉ. रामचंद्र रसाळ,प्रा. दत्तात्रय थोरात कर्नल भरत कुमार आदी.

७३ व्या स्वतंत्रदिन प्रवरानगर

स्वातंत्र्याचे महत्व हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी वेगळे असले तरी, ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे एकसंघ भारताची प्रतिमा आता खऱ्या अर्थाने तयार झाली आहे. असे सांगताना  विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेताना प्रगतीच्या माध्यमातू देशाची ही प्रतिमा  विश्व्पटलावर नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवरच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

प्रवरा औदयोगिक, शैक्षणिक, वैदयकिय आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आयोजित केलेल्या ७३ व्या  स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार विखे पाटील बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आबासाहेब खर्डे,नंदू राठी,अनिल विखे,भारत घोगरे,सोपानराव दिघे,आप्पासाहेब दिघे, दत्ता पाटील शिरसाठ, बन्सी पाटील तांबे, डॉ. अशोक कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रारंभी परेड कमांडर कु. प्रज्ञा मुळे , पायलटअभिशेख सरोदे आणि पायलट अमोल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. विखे यांनी परेड साठी सहभागी झालेल्या सर्व ट्रूपची पाहणी केली. या नंतर लेफ्टनंट  डॉ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंत खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी,कॅप्टन सुजाता देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गितांजली  खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी मुलीं,स्वातंत्र्याचे महत्व हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी वेगळे असले तरी, ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे एकसंघ भारताची प्रतिमा आता खऱ्या अर्थाने तयार झाली असून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेताना देशाची प्रगतीच्या माद्यमातू देशाची ही प्रतिमा  विश्व्पटलावर नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवरच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

प्रवरा औदयोगिक, शैक्षणिक, वैदयकिय आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आयोजित केलेल्या ७३ व्य स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार विखे पाटील बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आबासाहेब खर्डे,नंदू राठी,अनिल विखे,भारत घोगरे,सोपानराव दिघे,आप्पासाहेब दिघे, दत्ता पाटील शिरसाठ, बन्सी पाटील तांबे, डॉ. अशोक कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रारंभी परेड कमांडर कु. प्रज्ञा मुळे , पायलटअभिशेख सरोदे आणि पायलट अमोल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. विखे यांनी परेड साठी सहभागी झालेल्या सर्व ट्रूपची पाहणी केली. या नंतर लेफ्टनंट  डॉ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंत खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी,उज्वला पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भक्ती पवार  यांच्या नेतुत्वाखालील  प्रवरा कन्या विद्यामंदिर एन सी सी,स्वातंत्र्याचे महत्व हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी वेगळे असले तरी, ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे एकसंघ भारताची प्रतिमा आता खऱ्या अर्थाने तयार झाली असून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेताना देशाची प्रगतीच्या माद्यमातू देशाची ही प्रतिमा  विश्व्पटलावर नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवरच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

प्रवरा औदयोगिक, शैक्षणिक, वैदयकिय आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आयोजित केलेल्या ७३ व्य स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार विखे पाटील बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आबासाहेब खर्डे,नंदू राठी,अनिल विखे,भारत घोगरे,सोपानराव दिघे,आप्पासाहेब दिघे, दत्ता पाटील शिरसाठ, बन्सी पाटील तांबे, डॉ. अशोक कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी परेड कमांडर कु. प्रज्ञा मुळे , पायलटअभिशेख सरोदे आणि पायलट अमोल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. विखे यांनी परेड साठी सहभागी झालेल्या सर्व ट्रूपची पाहणी केली. या नंतर लेफ्टनंट  डॉ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंत खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी,एस ए  शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राजक्ता जाधव  यांच्या नेतुत्वाखालील प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल एन सी सी, स्वातंत्र्याचे महत्व हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी वेगळे असले तरी, ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे एकसंघ भारताची प्रतिमा आता खऱ्या अर्थाने तयार झाली असून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेताना देशाची प्रगतीच्या माद्यमातू देशाची ही प्रतिमा  विश्व्पटलावर नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवरच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

प्रवरा औदयोगिक, शैक्षणिक, वैदयकिय आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आयोजित केलेल्या ७३ व्य स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार विखे पाटील बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आबासाहेब खर्डे,नंदू राठी,अनिल विखे,भारत घोगरे,सोपानराव दिघे,आप्पासाहेब दिघे, दत्ता पाटील शिरसाठ, बन्सी पाटील तांबे, डॉ. अशोक कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रारंभी परेड कमांडर कु. प्रज्ञा मुळे , पायलटअभिशेख सरोदे आणि पायलट अमोल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. विखे यांनी परेड साठी सहभागी झालेल्या सर्व ट्रूपची पाहणी केली. या नंतर लेफ्टनंट  डॉ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंत खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी,कॅप्टन सुजाता देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गितांजली  खैरणार यांच्या नेतुत्वाखालील स्वातंत्र्याचे महत्व हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी वेगळे असले तरी, ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे एकसंघ भारताची प्रतिमा आता खऱ्या अर्थाने तयार झाली असून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेताना देशाची प्रगतीच्या माद्यमातू देशाची ही प्रतिमा  विश्व्पटलावर नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवरच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

प्रवरा औदयोगिक, शैक्षणिक, वैदयकिय आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आयोजित केलेल्या ७३ व्य स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार विखे पाटील बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आबासाहेब खर्डे,नंदू राठी,अनिल विखे,भारत घोगरे,सोपानराव दिघे,आप्पासाहेब दिघे, दत्ता पाटील शिरसाठ, बन्सी पाटील तांबे, डॉ. अशोक कोल्हे  डॉ प्रदीप दिघे  आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रारंभी परेड कमांडर कु. प्रज्ञा मुळे , पायलटअभिशेख सरोदे आणि पायलट अमोल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. विखे यांनी परेड साठी सहभागी झालेल्या सर्व ट्रूपची पाहणी केली. या नंतर लेफ्टनंट  डॉ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंत खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी,कॅप्टन सुजाता देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गितांजली  खैरणार यांच्या नेतुत्वाखालील विखे पाटील महाविद्यालयातील एन सी सी मुली, उज्वला पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भक्ती पवार यांच्या नेतुत्वाखालील प्रवरा कन्या विद्यामंदिर एन  सी सी, एस ए शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राजक्ता जाधव यांच्या नेतुत्वाखालील प्रवरा गर्ल्स इंगिलश मिडीयम स्कुल एन सी सी,दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि सिद्धार्थ ठाकरे यांच्या नेतुत्वाखालील प्रवरा पब्लिक स्कुल एन सी सी,ज्ञानदेव निबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भुषण वाळुंज   यांच्या नेतुत्वाखालीलसेंट्रल पब्लिक स्कुल एन सी सी,उज्वला पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऋतुजा लांडे  यांच्या नेतुत्वाखालील प्रवरा कन्या विद्या मंदिर गर्ल गाईड ,एस ए शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ईशा ब्राम्हणे च्या नेतुत्वाखालील प्रवरा गर्ल्स इंगिलश मिडीयम स्कुल गर्ल गाईड,सी एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शंतनु  काळे  च्या नेतुत्वाखालील प्रवरा पब्लिक स्कुल स्काऊट, अशोक कुलधरण  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शंतनु  काळे  च्या नेतुत्वाखालील प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कुल स्काऊट, केतन तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयदीप कुंभार यांच्या नेतुत्वाखालील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुल एन सी सी, दीपक धोत्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्ण नाईक  यांच्या नेतुत्वाखालील महात्मा गांधी विद्यालय एन सी सी,नंदकुमार डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजेंद्र दिवे  यांच्या  नेतुत्वाखालील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था वॉच अँड वॉर्ड,नंदकुमार डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजेंद्र दिवे  यांच्या  नेतुत्वाखालील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था वॉच अँड वॉर्ड, सुशील कुमार साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिजाबापू आरगडे  यांच्या  नेतुत्वाखालील प्रवरा मेडिकल ट्रस्ट  वॉच अँड वॉर्ड, शरद मुळे  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब अनर्थे यांच्या  नेतुत्वाखालील विखे पाटील स. साखर कारखान्याच्या बॅण्ड पथकांनी ध्वजाला मानवंदना दिली.

या वेळी प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कुलच्या ७५ विदयार्थी कलाकारांनी देशभक्तीपर समूह नृत्य सादर केले तर , प्रवरा पब्लिक स्कुलच्या  ७० विदयार्थी कलाकारांनी नृत्य सादर केले. विखे पाटील महाविद्यालयाच्या ३० विदयार्थी कलाकारांनी देशभक्तीपर राष्ट्रीय एकात्मता समूह नृत्य सादर केले. प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या ९० मुलींनी योगा सादर केला तर, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूलच्या ३० विदयार्थी कलाकारांनी देशभक्तीपर समूह नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. श्रध्दा काकडे आणि कु. चैताली ढोकणे  यांनी केले.

या वेळी विविध ठकांच्या परेड साठी आणि कॅम्प साठी निवड झालेल्या शकील पठाण,यशवंत खैरनार,प्रज्ञा मुळे ,नवनाथ कोकाटे,राजेंद्र बांगर,रमेश पवार या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परेडमध्ये पदमश्री विखे पाटील महाविद्यालय मुले प्रथम विखे पाटील सैनिकी स्कुल द्वितीय  पदमश्री विखे पाटील महाविद्यालय मुली तृतीय आल्याचे जाहीर करून त्यांचाही सन्मान करण्यात आला.

 सूत्र संचालन दिनेश भाने तर आभार प्रा. दिगंबर खर्डे यांनी व्यक्त केले. 
 चौकट ;- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवरेतील विविध शाळा महाविद्यालयांमधून मोफत शिक्षण दिले जात  आहे. या मुलांसाठी पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वनिधीतून जमा केलेल्या रकमेतून गणवेशाचे वाटप करण्यात आले.

 फोटो कॅप्शन :-प्रवरा औदयोगिक, शैक्षणिक, वैदयकिय आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आयोजित केलेल्या ७३ व्या  स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉ सुजय विखे पाटील समवेत माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आबासाहेब खर्डे,नंदू राठी,अनिल विखे,भारत घोगरे,सोपानराव दिघे,आप्पासाहेब दिघे, दत्ता पाटील शिरसाठ, बन्सी पाटील तांबे, डॉ. अशोक कोल्हे, डॉ प्रदीप दिघे  आदी.

प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर तज्ञ मार्गदर्शन संपन्न

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा आवश्यक असते. आपल्या प्रत्येकामध्ये विशिष्ट गुण असतोच तो विकसित करण्यासाठी  आपण ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडायला हवे,” असा सल्ला पालघर येथील भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी यांनी प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना दिला. 

प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर नुकतेच पालघर येथील भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली  संपन्न झाले. महाविदयालयाच्या वतीने प्रा. राजेंद्र खर्डे यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी श्री. आनंद गोसावी यांनी उद्योजिकता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थांना उद्योजक बनन्या करता आवश्यक अशा पैलुंची माहिती दिली जी विदयार्थांनी अंगिकारली पाहीजे. जेणेकरून भविष्यात विद्यार्थांना त्यांचा उद्योग यशस्वीरीत्या उभारून आयुष्यात यश संपादन करता येईल. तसेच सिव्हील इंजिनिअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. रविंद्र आमले यांनी या तज्ञ मार्गदर्शन आयोजन करण्याचा उद्देश सांगताना सांगितले कि, सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी या तज्ञ मार्गदर्शनानुसार त्यांच्या आयुष्यात कसा बदल घडवावा याबद्दल सांगितले. हा तज्ञ मार्गदर्शनाचा कार्यक्रम महाविदयालयातील उद्योजिकता विकास कक्षाअंतर्गत सिव्हील इंजिनिअरींग शाखेने आयोजित केला होता.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिव्हील इंजिनीअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. रविंद्र आमले, विभागाचे उद्योजगता विकास कक्षाचे समन्वयक प्रा. अतुल जोंधळे, प्रा. निलेश कापसे व सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन:-प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना  भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी,प्रा. राजेंद्र खर्डे आणि विदयार्थी. 

PVP Sainik School Arouses International Curiosity

A delegation of teachers from University of Worcester, UK visited the Pd. Dr. Vitthalrao Vikhe Patil Sainik School Loni on 06 Aug 19 to study the system of grooming of cadets into officers of Armed Forces and other prominent professions. They were highly impressed with the facilities, curriculum adopted and methods of grooming.

The delegation of teachers Miss Elli and Miss Sharlette from University of Worcester UK also  interacted with the cadets of Sainik School. During their visit they were briefed about the functioning, facilities, curriculum and grooming methods by the Commandant Col. Dr. Bharat Kumar and Principal Mr. Sudhir More. Mr. Rajesh Maghade introduced the guest and escorted them to the various departments, Labs, and activity centers. They acquired information about various activities undertaken  by Sainik School by performing the same with cadets. 

A special visit was arranged to Dr. APJ Abdul Kalam Science Center, where they were given information about different sections, various scientific models and equipment by Mr. D. P. Anarase and Mr. Sudam Tupe.

As per them, It was areally wonderful  experience for them Cadets of Sainik School also enjoyed the interaction.

कार बनविणाऱ्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या कडून कौतुक आणि सुभेच्छा

हैद्राबाद येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या देशपातळीवरील मानाच्या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार दाखल झाली असून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या  कार माँडेल बद्दल  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली.  कार तयार करण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक कराताना  भविष्यातील  अव्वल निर्मिती साठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुभेच्छा दिल्या. 

या प्रसंगी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव भारत घोगरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे,  प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी, प्रा.मनोज परजणे यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते. 

 या बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी सांगितले कि,  प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल ठरली . आणि आता हैद्राबाद येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या मानाच्या देशपातळीवरील स्पर्धेत दाखल झाली आहे.  मॅकेनिकल विभागाचे प्रमुख प्रा.राजेंद्र खर्डे रा.निलेश मानकर, प्रा.पद्माकर काबुडकर यांचे मार्गदर्शनाखाली  मेकॅनिकल विभागामधील  सत्तावीस विद्यार्थ्यांनी ही कार तयार करण्यासाठी योगदान दिले आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी द्वितीय वर्षातील आहेत.

 फोटो कॅप्शन :-प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कारची माहिती घेताना  ना. सौ शालिनीताई विखे पाटील समवेत भारत घोगरे, डॉ.अशोक कोल्हे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी, प्रा.मनोज परजणे प्रा.निलेश मानकर, प्रा.पद्माकर काबुडकर आणि विदयार्थी. 

सुषमा स्वराज यांच्या सारख्याच विद्यार्थिनी घडाव्यात

प्रवरेच्या शाळा आणि महाविद्यालये हे खेड्यात असले तरी, जलद गतीने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर कणखरपणे टिकाव धरू शकतील असे नागरिक घडविण्यासाठी शहारातील सुविधांपेक्षा सरस आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा प्रवरे मध्ये उपलब्ध असल्याने, पाहिजे ते ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे सांगताना. सर्वच बाबतीत कणखर समजल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या सारख्याच  विद्यार्थिनी प्रवरा शैक्षणिक परिवारातून घडाव्यात असी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

प्रवरा शैक्षणिक संकुलातील शैक्षणिनिक सुविधा आणि परिसराची माहिती नवीन विदयार्थी आणि त्यांच्या पालकांनी जाणून घ्यावी. या साठी  प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांचा एकत्रित मेळाव्यात सौ. विखे पाटील बोलत होत्या. या प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक भगवंतराव घोलप , अप्पासाहेब दिघे, स्वप्नील निबे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, पतसंस्थेचे चेअरमन डॉ. सतीश तुरकणे,  ट्रेनींग आणि प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी,संगणक विभागाचे प्रा. शरद रोकडे, केमिकल विभागाचे डॉ. रवींद्र गायकवाड,सिव्हिल विभागाचे डॉ. राजेंद्र गायकवाड,माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. सौ.स्वाती राऊत,मॅकेनिकल विभागाचे राजेंद्र खर्डे, इलेक्ट्रिक विभागाच्या सौ.सिमा लव्हाटे , डॉ. चंद्रकांत कडू , रजिस्टार भाऊसाहेब पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम वर्षाचे विद्यार्थी समन्वयक प्रा. लोंढे यांनी या मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले होते. 

 प्रारंभी प्राचार्य  डॉ.संजय गुल्हाने यांनी स्वागत करून अबियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा सांगताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा -महाविद्यालयनमधून सुमारे ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगताना जगातील विविध २२ देशांमध्ये सुमारे १ लाख ४० हजार माजी विदयार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुमारे १८० विदयार्थ्यांना नोकऱ्या प्राप्त झाल्याचे ते म्हणाले . यावेळी मागील शैक्षणिक वर्षांमध्ये टॉपर ठरलेल्या कु. योगिता देशपांडे ,कु. सुजाता शिरसाठ आणि सत्यम डहाळे या विद्यार्थ्यंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या वतीने सुदर्शन भवर,कु. वैष्णवी थोरात,कु. वैष्णवी विश्वासराव या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

 सौ. विखे म्हणाल्याकी, ग्रामीण भागातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या साठी  पदमश्री विखे पाटील स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतील विदयार्थी जागतीक पातळीवर पोहोचले आहेत . बदलत्या तंत्रज्ञाशी समरस होणारे विद्यार्थी घडवील जावेत या साठी निर्माण केलेल्या परिपूर्ण सुविधा निर्माण केल्यानेच हे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या. 

डॉ. अशोक कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रवरेतील नैसर्गिक  वातावरण चांगले असल्याने विदयार्थी आजारीच पडणार नाहीत असी ग्वाही देताना क्वचित विदयार्थी आजारी पडलेच तर  आरोग्याच्या दर्जेदार सुविधाही प्रवरा मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळच उपलब्ध असल्याचे सांगितले . डॉ. कोल्हे म्हाणालेंकी, अपरिहार्य असले तरी,मोबाईलचा कामापुरताच वापर करावा , अभ्यासासाठी ग्रंथालयामध्ये २४ तास इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. 

फोटो कॅप्शन :-प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विद्यार्थी,  पालक, शिक्षक आणि संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांचा एकत्रित मेळाव्यात मार्गदर्शन करताना  सौ. शालिनीताई विखे पाटील ,समवेत जेष्ठ संचालक भगवंतराव घोलप, आप्पासाहेब दिघे, स्वप्नील निबे, डॉ. अशोक कोल्हे, डॉ. सतीश तुरकणे,   प्रा. धनंजय आहेर,  डॉ. विजयकुमार राठी, प्रा. शरद रोकडे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. राजेंद्र गायकवाड,प्रा. सौ.स्वाती राऊत, राजेंद्र खर्डे,  सौ.सिमा लव्हाटे , डॉ. चंद्रकांत कडू ,  भाऊसाहेब पानसरे आदी