दुर्गापूरच्या आनंद बाजारातून मुलांना मिळाले व्यावहारीक… हजारो रुपयांची उलाढाल…

पालकांचाही मोठा प्रतिसाद…


मुलांना आर्थिक साक्षरता मिळावी.त्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारी ज्ञान मिळावे यासाठी राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये बाल-गोपाळांनी हजारो रुपयांची उलाढाल केली.
विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे ,खाद्यपदार्थ यांची विक्रीसाठी स्टॉल मांडले होते. त्याचबरोबर स्थानिक विक्रेत्यांनीही त्यांचा माल आज बाजारासाठी आणला होता .स्थानिक दुर्गापूर हसनापूर चंद्रपूर भालेराववाडी चिंचपूर या ठिकाणाहून शेतकरी बाजारासाठी आले होते . आपले विद्यार्थी कशा तऱ्हेने माल विकतात हे बघण्याची उत्सुकत दिसून आली तसेच माल घेताना घासाघीस करणे, वजन बरोबर देतात की नाही हे बघणे मालाची योग्य पैसे घेतात की नाही याबाबत पालक जागरूकपणे चौकशी करतांना दिसले . काही विद्यार्थी आपल्या मालाची ओरडून जाहिरात करताना दिसत होते . मुख्य पाहुण्यासह विद्यालयातील शिक्षक व नागरिकांनी या बाल आनंद मेळाव्याचा आनंद लुटला.
आनंद बाजार मुलांना आनंद देणारा ठरला.वांगे घ्या..कांदे घ्या…ताजी लाल कोराची मेंथी…पालक गाजर अशा सर्वच भाजीपाला मुलांनी येथे विक्री करत आपला माल विकला.जिल्हा परिषदेच्या माजी अध्याक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रवरेच्या शैक्षणिक संकुलात सुरु आहे.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकीच्या नऊ विद्यार्थ्याची नामांकित कंपनीमध्ये निवड…

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या २०२४-२५ बॅच चे अंतिम वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांची घारडा केमिकल लिमिटेड या नामांकित व बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाली आहे. सदर निवड ही अंतिम सत्र सुरू होण्याआधीच झाली आहे. मागील वर्षी या विभागाच्या ६१ विद्यार्थ्यांची निवड नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाली होती.