आर्मी डे परेड संचालनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने दुर्गापूर गावाचे भूषण ठरलेल्या चेतनकुमार भारती याच्यावर प्रवरा परिसरातुन कौतुकाचा वर्षाव

कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून भारतीय सेना दलामध्ये रुजू व्हायचेच.या इकच इर्शेतून  लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेताना एन. सी.सी च्या माध्यमातून अनेक उपक्रमात सहभाग घेताना  मध्यप्रदेशातील सिग्नल कोर येथे खडतर आर्मी प्रशिक्षण पूर्णकेल्यानंतर सेनेमध्ये दाखल झालेल्या चेतनकुमार दत्तात्रय भारती या तरुणाला नुकताच १५ जानेवारी २०२० मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या आर्मी डे परेड संचालनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने दुर्गापूर गावाचे भूषण ठरलेल्या चेतनकुमार भारती याच्यावर  प्रवरा परिसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लहानपणापासूनच भारतीय सेनेत प्रवेश घ्यायचा असे स्वप्न बाळगणाऱ्या चेतनकुमार भारती याने लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना पहिल्या वर्षीच एन सी.सी मध्ये सहभाग घेऊन  बी.सटिफिकेट प्राप्त केले. तर,द्वितीय वर्षांमध्ये असताना २६ जानेवारी २०१४ राजी दिल्ली येथील राजपथवर झालेल्या परेड संचलनात महाराष्ट्र डायरेक्टरेट च्या ट्रूप  मध्ये प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महाविद्यालयामध्ये एन सी सी  सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करताना आपल्या मित्रांना मार्गदर्शन केले. प्रवरा आदयोगिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व अयोग्य समुहाच्यावतीने लोणी येथे होणाऱ्या स्वतंत्रदिन परेड संचालनामध्ये कमांडर म्हणून काम पहिले.राजपथवर झालेल्या परेड संचलनात प्रवरा परिवाराच्या वतीने सहभाग घेतल्याबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिवाराच्या वतीने विशेष सन्मानित केले होते. 

अदयाप एसटी बसचीही सुविधा नसलेल्या राहता तालुक्यातील दुर्गापूर या खेडेगावातील चेतनकुमार भारती याने सिग्नल कोर ,जबलपूर (मध्यप्रदेश) येथील आर्मी ट्रेनींग सेंटर मध्ये खडतर प्रशिक्षण घेऊन ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय सेनेत आपल्या देशाची सेवा  कारण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे या वेळी झालेल्या कसम परेड मध्येही चेतनकुमारला विविध ट्रूपच्या  संचलनात परेड कमांडर म्हणून सन्मान मिळाला. सिग्नल कोर ,जबलपूर येथे प्रशिक्षण घेताना ‘बेस्ट ड्रील ‘चे मेडल देऊन त्याचा सन्मानही करण्यात आला होता. केवळ जिद्द,अपार मेहनत, चिकाटी मुळेच चेतनकुमारला सेनेत दाखल होताच २ मेडल मिळाल्याने दुर्गापूर आणि प्रवरा परिसराला चेतनकुमार चा नक्कीच अभिमान आहे. 

आता २६ जानेवारी २०२० मध्ये राजपथ,दिल्ली होणाऱ्या परेड संचलनात सहभाग घेण्यासाठी जुलै २०१९ पासूनच खडतर प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या आर्मी डे परेड संचालनात सहभागी हिऱ्यांचे भाग्य चेतन कुमार याला मिळालेले आहेच. महाविद्यालयीन जीवनामध्ये कॅप्टन प्रा. सुजाता देवरे,लेप्टनंट प्रा. राजेंद्र पवार या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

चेतनकुमारच्या यशाबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,सौ. शालिनीताई विखे पाटील,डॉ. यशवंत थोरात, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे आदींसह शिक्षक आणि विदयार्थी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.