कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील- ना.सौ. शालिनीताई विखे पाटील

२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जग गतीने प्रगती करीत आहे. आता चार भिंतीतील शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील असा विस्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड आरोमॅंटिक प्लांटस, लूखनऊ (सिमॅप) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ना.सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याच्या नियोजनासाठी सौ. रुपाली लोंढे व डॉ. विशाल केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सिमॅप व जनसेवा फौंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांनी चार दिवसीय अभ्यास दौऱ्यादम्यान महाविद्यालयाच्या चार भिंतीतील विचार सोडून व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी शुभेच्छा भेटीदरम्यान केले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या अंतर्गत सिमॅप ही एक संशोधन प्रयोगशाळा असून सण १९५९ पासून ती औषधी व सुगंधी वनस्पतीपासून संशोधनातून समाज उपयोगी उत्पादने निर्माण करून त्याचे औद्योगिकीकरण करून मोठया प्रमाणावर उत्पादन घेत आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी ३३ विद्यार्थी व सात शिक्षक रवाना झाले असून १५ ते १८ जून दरम्यान सिमॅप मधील शास्रज्ञद्वारे निर्मित तंत्रज्ञान ओळख व संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड आरोमॅंटिक प्लांटस, लूखनऊ (सिमॅप) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ना.सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य प्रा. निलेश दळे,प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर व प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे आदी…