कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्य स्तरीय मायक्रोअरे तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन – विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करूनघ्यावे – दत्तात्रय पाटील शिरसाठ

विज्ञान जैवतंत्रज्ञान विकासासाठी अभ्यासात आलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसाद करून नवीन नवीन गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे असे प्रतिपादन नियोजन समितीचे संचालक श्री दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.

     लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी व पद्मश्री विखे पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज प्रवरानगर यांच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या अध्यक्षतेखाली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी प्रा.ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले.

         डॉ.मधुकर खेतमाळस यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना बायोइन्फोरमॅटिक (जैवमाहिती तंत्रज्ञान) अभ्यासात होणाऱ्या बदलाची माहिती करून दिली तसेच येणाऱ्या काळात नक्कीच या विषयावर करियर घेण्याची संधी नक्कीच वाढतील असे आवाहन केले. याचर्चासत्रामध्ये  महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातुन विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. त्यांना बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर,नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी यांचे मार्गदर्शन केले.  

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील बायोइन्फो डिपार्टमेंट प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र होत आहे.

सूत्रसंचालक केदार सौरभ, कु.माने राणी यांनी केले तसेच स्वागत गीत कु.मेघना गुरव यांनी सादर केले व शेवटी आभार प्रा.घोरपडे भाऊसाहेब यांनी केले.

फोटो कॅप्शन :- पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या सयुक्त विद्यामाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी दत्ता पाटील शिरसाठ, श्री.जितेश दोशी, डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि