कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलन

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी-कवी संमेलनाचे उदघाटन प्रसंगी कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, पोपटराव पटारे, श्रीमती संगीता फासाटे, कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयासाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे प्रा. प्रवीण गायकर आदी.

सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक आकर्षित होतात. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हटलं जाते, परंतु राजकारण,समाजकारण आणि अध्यात्मामध्येही शेती बद्द्ल प्रेम व्यक्त केलं जात असले तरी, नवीन पिढीचे शेती बाबतचे आकर्षण कमी होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाच्या रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी आणि कवी महाविरसिंग चव्हाण प्रवरा परिसरातील शब्द्धश्नेही शब्दस्नेही चे अध्यक्ष्य कवी भास्कर दादा लगड, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त कवी यशवंत धोंडिबा पुलाटे, कवी पोपटराव पटारे, कवयत्री आणि सूत्रसंचालिका श्रीमती संगीता फासाटे, सूत्रसंचालिका आणि कवयत्री कु.शिवानी शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले. .मुख्य समारंभापूर्वी माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित `कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते` ही 20 मिनिटाची चित्रफित दाखविण्यात आली.कृषी-कवी संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून या कवीसंमेलनामध्ये सादर करण्यात येणाऱ्या कवितांचे एकत्रित पुस्तक तयार करण्यात येणार आहे.

कवी संमेलनाच्या अनुशंघाने विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धा आयोजित करण्यात अली होती यामध्ये मुख्यत्वे शेतकरी व कृषी क्षेत्राशी निगडीत कवितांचे सादरीकरण करण्यात आले त्यामध्ये कु. प्रेषिता यंदे, कु. ऋतुजा भालेराव, कु. स्नेहा हराळ, कु. आरती माळवदे, कु. प्रिया गवळी, कु. भावना शिंदे, कु.धनश्री साबळे, कु.ऋतुजा ढोकचौळे, कु.रुपाली ढोकचौळे, कु. दिप्ती शेळके यांनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या. या मध्ये प्रथम क्रमांक कु. ऋतुजा भालेराव, द्वितीय क्रमांक कु. प्रेषिता यंदे आणि तृतीय क्रमांक कु. स्नेहा हाराळ. यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना पारितोषिके देण्यात आली. जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी हि शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची मांडणी असलेली आपली कविता सादर केली.

यावेळी रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण गायकर, प्रा. अमोल सावंत, साहित्य सृजन ग्रुपचे अध्यक्ष सौरभ केदारी,प्रशांत बटुळे,,गौतम पाटेकर,कु. भावना शिंदे, कु. स्वामींनी नवले, कु. निकिता म्हस्के आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.