कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत  कृषी महाविद्यालय बारामती येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय लोणी येथील संघाने एकूण ३६ गुणांची कमाई करून सर्वसाधारण उपविजेतेपद तर कृषी महाविद्यालय पुणे संघाने ३७ गुण मिळवत विजेतेपद पटकाविले माहिती कृषी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.

या स्पर्धेमध्ये कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयातील खेळाडू गौरव शिंदे यास सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत गौरव शिंदे यांनी १०० मी धावणे व उंच उडी मध्ये सुवर्णपदक मिळवले. संजीवनी पावरा हीस १०० व २०० मीटर धावणे या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले तर प्रसाद नलावडे, तेजस साखरे, गौरव ठाकरे यांनी अनुक्रमे १००, २०० व ४०० मीटर  धावणे या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकाविले तर पुष्कराज पवार याने थाळीफेक या स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळाले.तसेच महाविद्यालयाच्या मुलांच्या रिले संघामध्ये ४ x १०० मी रिलेमध्ये सुवर्णपदक तर ४ x ४०० मध्ये रोप्य पदक मिळविले.