गुरु पौर्णिमा साजरी

अगदी गर्भ संस्कारापासूनच  शिक्षणाची सुरुवात करून,आपल्या अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करणारी आई हि  खरी गुरु असून , जिवनात चांगल्या वाईट गोष्टी शिकविवणारेही आपले गुरूच असून ,आपल्याला जीवनात  जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा साजरी केली जाते असे प्रतिपादन  बाभळेश्वर येथील सदगुरु नारायनगीरीजी गुरुकुलचे संंस्थापक ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के यांनी केले. 
       लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल मध्ये गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरु पूजन व व्यास पूजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के बोलत होते. या वेळी  सैनिकी स्कुलचे कमांडंट कर्नल डॉ. भारत कुमार यांनी “सबसे बडा गुरु ‘आणि गुरु शिष्य परंपरा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी  ह.भ प.अर्जुन महाराज डमाळे , बाबा बागळे ,भास्कर थेटे , संजय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. 
ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के म्हजनाळे कि, आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि जीवनामध्ये भेटणारा प्रत्येक जण गुरूच असतो असे सांगताना. जी भूमी पवित्र सैनिकांच्या रक्ताने माखली असून आपल्या पोटामध्येनांगर खुपसून अन्न पनुयाची सोया करते त्या धरणी मातेलाही विसरता येणार नाही. म्हणूनच वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचर्ये या न्यायाने पर्यावरणाविषयी प्रबोधन केले . या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना  मिठाई भरवली .महेश डहा ळके, 
फोटो कॅप्शन :-  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल मध्ये गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरु पूजन व व्यास पूजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ प. नवनाथ महाराज म्हस्के , सैनिकी स्कुलचे कमांडंट कर्नल डॉ. भारत कुमार ,प्राचार्य सुधीर मोरे  ह.भ प.अर्जुन महाराज डमाळे , बाबा बागळे आदी.