ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राच्या उदघाटन

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे  हीच  ज्ञानाची पहिली पायरी आहे.  जो पर्यन्त आपल्याला काय ज्ञान मिळवायचे हे कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची आदान प्रदान होणार नाही असे सांगताना  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  बही:शाल शिक्षण मंडळ राबवित असलेले उपक्रम सर्वांच्याच उपयुक्ततेचे ठरतील असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ यशवंत थोरात यांनी केले.                  

 लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राच्या उदघाटन प्रसंगी डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहिःशाल शिक्षण मंडळ व जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे, प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर ,डॉ. भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्या डॉ. अनुश्री दुबे यांनी प्रास्ताविक केले.          

या कृतिसत्रासाठी जिल्ह्यातील सर्व वक्ते,ग्रंथ अन्वेषक आणि केंद्रवाह  यांनी या चर्चा सत्रासाठी उपस्थित होते   संचालक डॉ. नवनाथ तुपे हे या दोन दिवस चालणाऱ्या कृतीसत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.शेवटी महिला महाविद्यालयाच्या केंद्रवाह प्रा. अर्चना घोगरे यांनी केले आहे. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथे गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय व बही:शाल शिक्षण मंडळ ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने वक्ते, ग्रंथ अन्वेषक व केंद्र वाहक संयुक्त कृतीसत्राचे उदघाटन करताना बही:शाल शिक्षण मंडळ , डॉ नवनाथ तुपे,महासंचालक डॉ यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे,प्राचार्य डॉ शशिकांत कुचेकर,उपप्राचार्या अनुश्री दुबे,केंद्रावाह प्रा अर्चना घोगरे