ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी दरी नक्कीच कमी होईल- नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात. मेगाभरती मेळाव्यात ४० नामनिकत कंपन्यांचा सहभाग , आठ आजाराच्या वर विद्यार्थी सहभागी

साधारणतः  विकसित इंडिया आणि अविकसित ग्रामीण भारत असेच  चित्र आपल्या देशाचे आहे असे सांगताना , ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी असी असलेली दरी नक्कीच कमी होईल असा विश्वास नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी व्यक्त केला. 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या मेगा भरती मेळाव्याच्या उदघाट्न प्रसंगी डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, एच. ए. एल. प्रवरा च्या संचालिका सुस्मिता माने,बोर्ड ऑफ  अँप्रेन्टीसशिप  ट्रेनिंग (BOAT) पश्चिम विभाग मुंबईचेडेप्युटी डायरेक्टर एन. एन. वडोदे,विखे पाटील पॉलिटेक्निचे माजी विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद डिस्टिलरी वालचंदनगरचे डायरेक्टर श्री करण यादव ,अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि वारले कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. अनिता गुज्जर,  डीआरडीओ अहमदनगरचे श्री साबळे, विखे पाटील फौंडेशंनच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश नाईक ,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रीक विभागाचे संचालक डॉ.  के टी व्ही रेड्डी, कृषी संचालक डॉ.खेतमाळस, प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी  आदी मान्यवर उपस्थित होते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी या मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. 

या मेगा नोकर भरती मेळाव्यासाठी व्हिआरडिई, इपिटोम, इटॉन इंडिया,बॉश्च, केप्लास्ट, होल्मकेके, व्हेरॉक इंजिनिअरींग, इके इलेक्ट्रॉनिक्स, बर्खार्ड कॉम्प्रेशन,एल अॅण्ड टी, एन एन नागा, आदी  ४० हून अधिक नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित अशा कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर, सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखती मध्ये सहभाग घेतला. आणि आणखी तेव्हढेच विदयार्थी मुलाखती साठी या दिवशी हजार झाले. 

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले कि, ग्रामीण तरुण् स्वयंपूर्ण झाला पाहिजे हे विखे पाटील यांचे स्वप्न होते. आज तरुण पिढी समोर रोजगारासाठी अनेक आव्हाने आहेत. अश्या परिस्थितीमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी. करण यादव, सौ. अनिता गुज्जर यांनी आपले अनुभव सांगताना प्रवरेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच पाहिजे ती मदत केली जाईल असे सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विदयार्थीनिनी परिश्रम घेतले. 

चौकट :- * ना. सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या कि, ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात मात्र, त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो. म्हणूनच त्यांच्या मध्ये  आत्मविश्वासनिर्माण करण्याची आवश्यकता असून  ग्रामीण भागातील मुलांनीही आता घराजवळ नोकरी शोधण्यापेक्षा बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. * भरती मेळाव्यासाठी ४० हुन अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग * पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखतीमध्ये सहभाग तर, आणखी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनाही मुलाखतीमध्ये सामावून घेण्यात आले.