जलशक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. 
   महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे केडेट्स आणि  विद्यार्थ्यांनी प्रथम गावामधून वृक्ष दिंडी आयोजित केली. या कार्यक्रमाचे उदघाटन लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचेजल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी  आस्थापना संचालक डॉ हरिभाऊ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात  राष्ट्रीय सेवा योजनेचे १३५ स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे८५  केडेट्स यांनी सहभाग घेतला. वृक्ष दिंडीनंतर जनजागृती अंतर्गत पर्यावरणशास्र विभागाचे प्रमुख डॉ. गोरक्षनाथ पोंधे यांनी मार्गदर्शन केले. या नंतर झालेल्या परिसंवादात स्वयंसेवक आणि कॅडेट्स यांनी आपले विचार व्यक्त केले.  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ डी. एस तांबे,यांनी प्रास्तविक केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले . महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे,राष्ट्रीय सेवा योजनेच्या  कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. 
 फोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे , उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे, डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख  डॉ. गोरक्षनाथ पोंधे, डॉ डी. एस तांबे, डॉ. राजेंद्र पवार आदी..