जल शक्ति अभियान

 लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी  महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी दिली.      

प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये   राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काॅॅॅलेज कॅॅॅॅम्पस दिवस साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थीनी महाविद्यालयातील उत्तर परिसर ते दक्षिण परिसर या या दरम्यान वृक्ष दिंडी काढण्यात आली होतीं या वृक्ष दिंडीची सांगता महाविद्यालयात करण्यात आली  महाविद्यालयातील स्थापत्य विभागाच्या विद्यार्थीनी पर्यावरणावर आधारित जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले वाढती वृक्षतोड, पर्यावरणाचे असंतुलन त्यामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जल है तो कल है यासाठी पाणी बचतीचे महत्व,वृक्ष संवर्धन आदि विषयावर विद्यार्थीनी या पथनाट्याद्वारे जनजागृती केली या पथनाट्याचा उद्देश सृष्टी भाबड या विद्यार्थीनीने मांडला तर पथनाट्याचा शेवट तुकाराम पवार व गौरी विखे यांनी केला    

अभियांत्रिकी महाविद्यालयालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांनी वृक्ष दिंडीचा समारोप करताना सांगितले की दिवसेंदिवस पर्यावरणाचा ह्रास वाढत असल्याने त्याचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे भविष्यत पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थीनी शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करण्याचे त्यांनी आवहान करीत पथनाट्याचे कौतुक केले   

 स्थापत्य विभागाचे प्रमुख आर पी आमले,प्रा एल के लहामगे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले शेवटी प्रा एन ए कापसे यांनी सर्वांचे अभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले      

फोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आदी  .