ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम

पद्मभुषण खा. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सलग सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे काम सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी केले त्यात सर्व प्रथम कॉलेज परिसरात कल्पवृक्ष रोपण मा. बन्सी तांबे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तसेच सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली, दुसर्या दिवशी लोहारे येथील आश्रम शाळेतील मुलांना आरोग्य व स्वच्छता याबाबत माहिती देऊन जनजागृती करणात आली. तिसर्या दिवशी लोणी गावात फेरीचे आयोजन करून विविध ठिकाणी जाऊन प्लास्टिक बंदी बाबत विध्यार्थी व शिक्षक यांनी नागरिकांना माहिती दिली व त्यापासून होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. चौथ्या दिवशी दुधेश्वर देवस्थानयेथे माजी विध्यार्थ्यान्तर्फे भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या सोयी साठी १००० लिटर ची टाकी भेट दिली तसेच मंदिर परिसराची स्वच्छता केली व बिजरोपण केले.पाचव्या दिवशी महाविद्यालयीन शिक्षकांनी प्रवरा माध्यमिक विद्यालय, दुर्गापूर येथे सर्व विध्यार्थ्यांना शारीरिक स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले तसेच सहाव्या दिवशी हसनापूर येथे धावपळीच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याचे जनजागरण व त्यासाठी उपलब्ध असलेल्या तपासण्या करण्यात आल्या त्यात २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. अशेविविध सामाजिक उपक्रम राबवून मा. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर सर्व उपक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

फोटो कॅप्शन :- ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करताना विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी