प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणीच्या ९ विद्यार्थांची नामांकीत कृषी कंपन्यामध्ये निवड

प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणी महाविद्यालयात झालेल्या बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनी चे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले यामध्ये कृषी तंत्रनिकेतन च्या पाच  विद्यार्थ्यांचे फिल्ड ऑफिसर या पदावर नोकरीसाठी निवड झाली तसेच च्यार  विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा.  धनंजय आहेर यांनी दिली.         

यासाठी प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर.आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.       

विद्यार्थ्यांच्या  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,संचालक कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालये डॉ.मधुकर खेतमाळस,विद्यालयाच्या प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिंनदन केले.    

फोटो कॅप्शन :- प्रवरा कृषी तंत्रनिकेतन  महाविद्यालयातील  पाच  विद्यार्थ्यांची  बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये  आणि  च्यार  विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली.  त्यांच्या समवेत डॉ.मधुकर खेतमाळस, प्रा.  धनंजय आहेर,प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड,प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर आदी …